सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, June 27, 2012

बहुजनवाद: शिक्षणबंदीचे सत्यशोधन

-महावीर सांगलीकर

ब्राम्हणांनी शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला बंदी घातली हा बहुजनवाद्यांचा आणखी एक लाडका सिद्धांत आहे. शूद्रांच्या शिक्षणाला प्राचीन काळी भारतात खरेच बंदी होती काय हे आपण तपासून पाहिले पाहिजे. त्या आधी प्राचीन भारतातील शिक्षण कोणत्या प्रकारचे होते हेही पाहिले पाहिजे.

प्राचीन भारतात वेगवेगळे उद्योग-व्यवसाय करणारे लोक परंपरेने आपापला व्यवसाय शिकत असत, त्यासाठी त्यांना आजच्याप्रमाणे शाळा-कॉलेज मध्ये जायची गरज पडत नव्हती. पुरोहित लोकही त्यांना आवश्यक असणारे कर्मकांड, मंत्र वगैरे मुख्यता: परंपरेनेच घरी किंवा प्रत्यक्ष कर्मकांडाच्या ठिकाणी शिकत असत.

त्या काळात गुरुकुलेही असत. गुरुकुलांमध्ये राजघराण्यातील आणि त्यांच्याशी संबंधित मुले व तरुण शिकत असत. गुरुकुलातील शिक्षण हे वेगळ्या व विशेष प्रकारचे असे, त्या शिक्षणाचा पुरोहित वर्गाला तसेच सामान्य लोकांना कसलाच उपयोग नव्हता. त्यामुळे त्यांनी गुरुकुलात शिकण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण याचा अर्थ प्राचीन काळी गुरुकुलांमध्ये सामान्य लोकांना व शूद्रांना प्रवेश नव्हता असा होत नाही. कांही वाचक माझ्या या विधानावर आक्षेप घेत एकलव्याचे उदाहरण देतील.

एकलव्याची कथा महाभारतात येते. महाभारत हे शेकडो वर्षे लिहिले जात होते. त्याची सुरवात महावीर व बुद्ध यांच्या काळानंतर म्हणजे इसवी सन पूर्व चौथ्या शतकानंतर झाली व अगदी इसवी सनाच्या तिस-या-चौथ्या शतकापर्यंत म्हणजे सात-आठशे वर्षे त्यात भर पडत गेली. एकलव्याची कथा निश्चितच महाभारतात नंतर घुसडण्यात आलेली कथा आहे. ती खरी मानता येत नाही.

आता खालील कांही महत्वाच्या गोष्टी पहा:

* ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. त्यातील कित्येक ऋचा या स्त्रियांनी रचलेल्या आहेत.
* उपनिषिदे ही प्रामुख्याने क्षत्रियांनी लिहिली आहेत.
* रामायण हे कोळ्याने लिहिले आहे.
* महाभारत हे अनेक वेगवेगळ्या लेखकांनी भर टाकत लिहिले, पण त्यातील मुख्य लेखक व्यास हा होता, तो क्षत्रिय बापापासून कोळी स्त्रीला झालेला मुलगा होता.
*पुराणे ही सूतांनी म्हणजे शुद्रांनी लिहिली आहेत.
*अपवाद वगळता सर्व संत साहित्य हे शूद्रांनी लिहिले आहे. कुरल काव्य लिहिणारे तिरुवल्लुवर हे विणकर, मराठी साहित्याचा पाया रचणारे संत नामदेव हे शिंपी, त्याच्यावर कळस चढवणारे तुकाराम हे कुणबी, हिंदी भाषेत उत्कृष्ठ दोहे लिहिणारे संत कबीर हे विणकर ही कांही उदाहरणे आहेत.

याचा अर्थ साहित्य रचना करणे ही ब्राम्हणांची मक्तेदारी नव्हती. आता राहिला सामान्य लोकांच्या, म्हणजे आजच्या भाषेत शूद्रांच्या लिहिण्या वाचण्याचा प्रश्न.

प्राचीन काळी सुतारकाम, लोहारकाम, कपडे शिवणे, चाक बनवणे, शस्त्रे बनवणे, गवंडीकाम, कापड विणणे, कापड शिवणे, चपला बनवणे या प्रकारची सर्व कामे सामान्य लोक व शुद्र लोक करत असत. ही कामे करणा-यांना गणिताचे सामान्य ज्ञान, आकडे मोड आणि भूमितीचे सामान्य ज्ञान असल्याशिवाय करता येणे शक्यच नाही. याचाच अर्थ त्यांना याचे शिक्षण मिळत असे. वर म्हंटल्या प्रमाणे हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना ट्रेनिंग इंस्तीट्यूट मध्ये जाण्याची गरज नव्हती, ते त्यांना परंपरेने घरीच मिळत असे.

याचा अर्थ शूद्रांना शिक्षणबंदी होती असे म्हणणे हे एक थोतांड आहे.

मग शूद्र शालेय शिक्षणात मागे का पडले?
असे असले तरी शालेय शिक्षणात बहुजन समाज मागे का पडला? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याचे पहिले उत्तर म्हणजे त्यांना शालेय शिक्षणाची गरज भासली नाही, कारण त्यांची शैक्षणिक गरज परंपरेने घरीच भागवली जात असे. इंग्रज भारतात स्थिरावल्यानंतर त्यांना आपले प्रशासन आणि इतर गोष्टींसाठी भारतीय नोकरांची गरज पडू लागली, तेंव्हा त्यांनी पाश्च्यात पध्दतीचे शिक्षण द्यायला सुरवात केली. ब्राम्हणांनी यातली संधी हेरून असे शिक्षण घ्यायला लगेच सुरवात केली. पण बहुजन याविषयी उदास राहिले. जेंव्हा पारंपारिक उद्योग बंद पडू लागले, तेंव्हा बहुजनातील कांहीना या नव्या शालेय शिक्षणाचे महत्व कळू लागले, पण तो पर्यंत ब्राम्हण, कायस्थ वगैरे मंडळी बरीच पुढे निघून गेली होती.

भारतात इंग्रजांनी, समाज सुधारकांनी शाळा सुरु केल्या. समाज सुधारकांनी शाळा सुरू केल्यावर त्यांना कांही ठिकाणी ब्राम्हणांनी जसा प्रचंड विरोध केला तसाच विरोध बहूजनांनी ही केला हे बहुतेकांना माहीत नाही, माहीत होवू दिले जात नाही.

महात्मा फुले यांना बहुजन समाजातून विद्यार्थी मिळण्यास फार अडचणी आल्या होत्या. बहुजन लोक आपल्या मुला-मुलींनी शिक्षण घ्यावे या मताचे नसत, उलट त्यांच्या शिक्षणाचे विरोधकच असत. सावित्रीबाई फुले यांना खडे फेकून मारणा-यांमध्ये बहुजनही होते, त्यांची नावे प्रकाशात यायला पाहिजे. मी दुस-या एका लेखात म्हंटल्याप्रमाणे महात्मा फुले यांना त्यांच्या कार्यात मदत करणा-यांमध्ये तथाकथित बहुजन किती होते हे आपण तपासून पाहिले पाहिजे. आज महात्मा फुले यांचा आपल्या स्वार्थासाठी दुरुपयोग करणारे त्या काळात त्यांच्यापासून दूरच राहिले होते.

महात्मा फुले यांचे कार्य तर एकोणीसाव्या शतकातले, पण त्यांच्यानंतर विसाव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजात शिक्षण प्रचाराचे काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना सुरवातीला विद्यार्थी मिळत नसत. भाऊराव अक्षरश: लोकांच्या हाता पाया पडून पोरांना शाळेत पाठवा अशा विनवण्या करत असत. ' पोराला शाळेत पाठवल्यावर इथं शेतात काय तुझा बा कामाला येणार आहे का?' अशी उत्तरे भाऊरावांनी ऐकली आहेत.

ज्यांना शिक्षण घ्यायची खरेच इच्छा होती आणि त्यांना खरेच शिक्षणबंदी होती असे मानले तर त्यांनी कोणत्याही प्रकारे, गुप्तपणे शिक्षण घेतले असते. पण तसे झाल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे बहुजनांच्या शैक्षणिक मागासलेपणाला ते स्वत:च जबाबदार आहेत. तसेच ते स्लो लर्नर्स असल्याने त्याना बहुतेक गोष्टी फार उशीरा समजतात. जसे त्यांना महात्मा फुले कळायला १५० वर्षे लागली, तसेच शाहू महाराज कळायला १०० वर्षे लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अजून कळले नाहीत आणि महात्मा गांधी तर बापजन्मात कळतील असे वाटत नाही.

6 comments:

  1. सरकार या चित्रपटात अभिषेक बच्चन पोलीस कमिशनरला उद्देशून जे म्हणतो तोच प्रश्न, "कितने पहुंचे वहा से?"

    ReplyDelete
  2. असले सिनेमे बघून निष्कर्ष काढणा-यांची बौद्धिक पात्रता ती काय?

    ReplyDelete
  3. ब्रिगेड कडून येणारा मासिक हफ्ता बंद झालेला दिसतोय

    ReplyDelete
  4. सांगलीकर,
    मी anynymous लिहितोय करा म उगाचच multiple accounts तयार करू इच्छित नाही. आणि मी आधीच सांगतो की मी एक ब्राह्मण आहे. नाहीतरी तुम्ही लोक माझ्या नावावरून तोच निष्कर्ष काढणार.
    एक ब्राह्मण म्हणून मला तुमची सहानुभूती आहे.

    रामटेके आणि तुमची जवळपास सारखीच गत झाली आहे.
    ब्राह्मणांना घाल घाल शिव्या घातल्या तुम्ही लोकांनी, पण आता तुमच्याकडे नवीन मुद्देच उरले नाहीत.

    नवीन मुद्दे उरले नाहीत पेक्षा खरतर तुम्हा लोकांना हि माहिती होते के आपण ब्राह्मणांना जरा अतीच शिव्या घालतोय.
    त्या तुमच्या भाषेतील बहुजन (कारण मी बहुजनवाद मनातच नाही.. बहुजन म्हणजे १० लोकांनी मिळून एकावर म्हणजे ब्राह्मणाला शिव्या घालणे. ) ज्या ज्या लोकांचे वाचन आणि विचार जास्ती आहेत, त्यांचा असाच कधी न कधी problem होतो.
    सुरुवातीच्या काळात म्हणजे उमेदीच्या काळात तुम्ही ब्राह्मणांना धु धु धुता (शाब्दिक..). त्यावेळी तुम्ह्लाला ब्रिगेडी वगैरे टुकार लोकांची खूप वाहवा मिळते. तुम्हालाही वाटत असते की आपण फार मोठे समाजकार्य करत आहोत. खरतर सकारात्मक टीका करायला माझीही काहीच हरकत नाही. मला स्वतःला असे वाटते की ब्राह्मणी पूजा अर्चा जरा अतीच होतेय. पण तुम्ही एका अर्थाने लिहिता, आणि तुमचे स्तुतिपाठक, आणि followers त्याला वेगळ्याच अर्थाने घेतात आणि अधिक हिंसक होऊ पाहतात.
    पण जोपर्यंत तुम्हाला ह्याची जाणीव होते, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाते. (अशीच वेळ AH साळुंके ह्यांच्यावर पण आली आहे. ) अशा परिस्थितीत तुम्हाला पण कळते की आपण ब्राह्मणांवर आवश्यकतेपेक्षा खूपच अन्याय करत आहोत. आणि आपले वाचक आणि supporter तर हिंसाच करू इच्छ्छितात. त्यामुळे तुमच्यासारख्यांची भूमिका थोडी मवाळ व्हायला सुरु होते. पण ब्रीगेदिन्सारख्या आणि अन्य जातीय टुकार लोकांना हे मान्य नसते, आणि मग तुमच्यासारखी लोक "भटाळलेली" म्हणून हिणवली जातात.
    आणि मग कुठे तुमच्या (म्हणजे तुम्ही, रामटेके, साळुंके इत्यादी) डोक्यात प्रकाश पडतो आणि तुम्हाला कळते की इतके दिवस ब्राह्मणांवर टीका केली ते आरामात खपून गेला (एखाद दुसरा अपवाद वगळता ); पण तथाकथित बहुजनांवर किंवा बुद्धांवर किंवा मराठ्यांवर जर थोडी जरी टीका केली तरी जीणं हराम करतात हि लोक.
    हे चक्र आहे आणि हे चालूच राहणार..
    पण मला वाईट वाटते ते हे की तुमच्यासारख्या लोकांच्या इतक्या वाचनाचा, अभ्यासाचा, बुद्धीचा वापर शेवटी काय झाला? उत्तर: द्वेष.

    ReplyDelete
  5. mahatma phule yanni swata atmacharitrat lihile ahe ki,
    ek brahmna phulenchya vadilanna mhanato ki tumacha poraga shalet pathavu naka te padari tumachya porala christi banavatil.tevha tyanni m.phule yanna shalet pathvane band kele.
    padari far divasani phulenchy vadilanna karan vicharatat tevha padri swata tyana shalet netat aani davkhavatat ki bamanacha porga shalet baslela asato va regular asato.

    ReplyDelete
  6. Mahaveer:
    The know-how of history & facts are not checked / understood by present & most people like me carried away with opinion of other. The pattern must be live now also. We all need to have understanding of the same to avoid what happened in history.
    I personally liked your thoughts.
    Thanks

    Shrikant Lande Pune

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week