सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, January 5, 2013

ओ.बी.सींचे बौद्ध धर्मांतर: कांही प्रश्न

बौद्ध धर्म हा आता केवळ धर्म राहिला नसून एक राजकीय पक्षही झाला आहे. यामुळे एका चांगल्या धर्माची नासाडी होत आहे. हे टाळायचे असेल तर बौद्धांच्या धार्मिक संघटनांनी सामूहिक धर्मांतराला आळा घातला पाहिजे आणि वैयक्तिक धर्मांतराला प्रोत्साहन दिले पाहिजे.
-महावीर सांगलीकर

ओ.बी.सी. जातींनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारावा म्हणून महाराष्ट्रात कांही लोक चळवळ सुरू केली आहे. अशा धर्मांतराबद्दल मला कांही प्रश्न विचारावेसे वाटतात.

ओ.बी.सींनी बौद्ध धर्मांतर केले तर मग त्यांच्या जातींचे काय होणार? त्या विसर्जित होणार का, की बौद्ध धर्म स्वीकारल्यावारही त्या जाती  कायम रहाणार? म्हणजे हिंदू भावसार ऐवजी बौद्ध भावसार वगैरे?  बौद्ध धर्मात अशा जातीच जाती घुसल्या की बाबा साहेबांच्या जातीअंताच्या स्वप्नाचे काय होणार? भारतातील कोणत्याही धर्माचे उदाहरण घ्या, धर्मांतराने जाती नष्ट होत नसतात.

हिंदू असतांना ओ.बी.सींना ज्या सवलती मिळतात त्या बौद्ध झाल्यावर मिळणार का? की मग कागदोपत्री हिंदूच राहायचे सवलती मिळवण्यासाठी? 

सगळेच ओ.बी.सी. कांही हिंदू नाहीत. मुस्लिम ओ.बी.सी., ख्रिस्ती ओ.बी.सी., जैन ओ.बी.सी., शीख ओ.बी.सी.ही असतात.  ओ.बी.सींच्या एकाच जातीत वेग वेगळ्या धर्माचे समूह असतात. जसे, शिंपी जातीत हिंदू, जैन, मुस्लिम, ख्रिस्ती या चारी धर्माचे समूह असतात. त्यात आता आणखी एका धर्माची भर पडणार, असे तर होणार नाही ना?


मुख्य म्हणजे जैन, मुस्लिम, ख्रिस्ती, शीख अशा धर्मातील ओ.बी.सी. जातींनी अशा धर्मांतरास तयार होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते हिंदू नाहीत आणि त्यांना आपल्यावर अत्याचार होतोय असे वाटतही नाही. त्यामुळे ओ.बी.सींचे बौद्ध धर्मांतर हे हिंदू धर्मातील ओ.बी.सी. जातींतूनच होवू शकते. पण या जाती कट्टर हिंदू असतात, त्यामुळे अशा धर्मांतरास किती  पाठींबा मिळणार?

जे हिंदू ओ.बी.सी. धर्मांतर करतील त्यांनी  बौद्ध झाल्यावर आपले संत नामदेव, गाडगे बाबा, जगनाडे महाराज यांचे काय करायचे? का त्यांनाही बौद्ध करून टाकायचे? गेली अनेक शतके ओ.बी.सी. जातींनी समतावादी वारकरी धर्म रुजवला, वाढवला आणि सांभाळला, त्याचे मग काय करायचे? धर्मांतरीत ओ.बी.सी. बौद्धांचा हिंदू धर्माबाद्दल दृष्टीकोन नकारात्मकच रहाणार आहे, पण वारकरी धर्माबद्दलही तो सकारात्मक राहील असे वाटत नाही.

धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे, आणि वैयक्तिक धर्मांतरास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. याउलट सामूहिक धर्मांतर हे धार्मिक कारणांसाठी होत नसून राजकीय कारणांसाठी होत असते. सध्या चालू असलेल्या ओ.बी.सींच्या धर्मांतराच्या चळवळी मागे देखील राजकीय हेतू दिसतात. भारतात आपापल्या धर्माचा प्रसार करणारे ख्रिस्ती आणि मुस्लिम देखील सामूहिक धर्मांतर घडवून आणायचे टाळतात. कारण आपला धर्म वाढवण्यामागे त्यांचा हेतू राजकीय नसतो. पण बौद्ध धर्माच्या बाबतीत मात्र राजकीय हेतू स्पष्ट दिसतात. बौद्ध धर्म हा आता केवळ धर्म राहिला नसून एक राजकीय पक्षही झाला आहे. यामुळे एका चांगल्या धर्माची नासाडी होत आहे. हे टाळायचे असेल तर बौद्धांच्या धार्मिक संघटनांनी सामूहिक धर्मांतराला आळा घातला पाहिजे आणि वैयक्तिक धर्मांतराला प्रोत्साहन दिले पाहिजे.

सामूहिक धर्मांतराची चळवळ चालवणा-यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की अशा धर्मांतरांमुळे राजकीय हेतू साध्य होत नसतात. शिवाय असे धर्मांतर पूर्ण फसते. मागे भटक्या विमुक्तांच्या चाळीस जमातींचे सामूहिक धर्मांतर घडवण्याचा असाच गाजावाजा झाला होता, पण ते धर्मांतर फसले.

ओ.बी.सी. जातींना हिंदू धर्मात मान आहेच.  हिंदू धर्मीय ओ.बी.सी. जाती आपल्या धर्मात राहून आपली प्रगती करू शकतात, इतकेच नव्हे तर अनेक हिंदू ओ.बी.सी. जातींनी तशी केलेलीही आहे. 

हेही वाचा: 
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
हिंदू धर्माला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे
माणसाला धर्माची गरज आहे काय?

6 comments:

  1. हा धर्मांतर ज्या संघटना घडवुन आणत आहेत,, तो राजकीय आहे कि नाही? तो नंतरचा प्रश्न आहे. पण जे ओबीसी बांधव स्वतःहुन धर्मांतर करणार आहेत, त्यांचा हेतु राजकीय कसा असु शकतो? ते काय राजकारणात भाग घेतात का? ह्या संघटनांनी काही कोणावर जबरदस्ती केली आहे काय? कि तुम्ही बौद्ध धर्म स्विकारा.. धर्म स्विकारताना मनाची भक्कम तयारी असावी लागते. कोणत्या धर्मात काय आहे, ते समजण्या इतपत ओबीसी समजदार आहेत.



    ••►ओ.बी.सींनी बौद्ध धर्मांतर केले तर मग त्यांच्या जातींचे काय होणार? त्या विसर्जित होणार का, की बौद्ध धर्म स्वीकारल्यावारही त्या जाती कायम रहाणार? म्हणजे हिंदू भावसार ऐवजी बौद्ध भावसार वगैरे? बौद्ध धर्मात अशा जातीच जाती घुसल्या की बाबा साहेबांच्या जातीअंताच्या स्वप्नाचे काय होणार?

    >>>>> आणी जे खरच बौद्ध होणार असतील तर मग जातीचा प्रश्नच कुठे उरतो? बौद्ध संघ हा महासागरासारखा आहे. ह्यात मिसळल्यावर तुमची जात शिल्लक राहात नाही. जशी नदी समुद्राला मिळाल्यावर. तुम्हाला माहीती आहे का? सध्याच्या बौद्ध धर्मात महार जातीसोबत अनेक मांग, मातंग, चांभार जातीतë4;े पण लोक आले होते,, बौद्ध होवुनही लोक स्वतःला दलीत अथवा ओ.बी.सी. समजत असतील तर धर्मांतराचा उपयोग काय? माझ्यामते तरी खरेतर आज जाती फक्त नावापुरते शिल्लक राहीलेल्या आहेत. जातीनिर्मुलनाचे काम खुप जोरात सुरू आहे. सगळीकडे समानता पसरत आहे. आज ब्राह्मण आणी दलीत मित्र एका ताटातुन जेवत आहेत. झाला की हो जातीचा अंत.



    ••►धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे, आणि वैयक्तिक धर्मांतरास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. याउलट सामूहिक धर्मांतर हे धार्मिक कारणांसाठी होत नसून राजकीय कारणांसाठी होत असते. सध्या चालू असलेल्या ओ.बी.सींच्या धर्मांतराच्या चळवळी मागे देखील राजकीय हेतू दिसतात.

    >>>>>>> धर्म ही वैयक्तीकच गोष्ट आहे. आणी धर्मांतर करणारे सर्व ओ.बी.सी. काय राजकारणात भाग घेतात? त्यांच्यावर ह्या राजकारण्यांनी कोणती जबरदस्ती केली आहे काय? त्यांची वैयक्तीक इच्छा आहे म्हणुनच ते धर्मांतर करत आहेत ना.


    ••►भारतात आपापल्या धर्माचा प्रसार करणारे ख्रिस्ती आणि मुस्लिम देखील सामूहिक धर्मांतर घडवून आणायचे टाळतात.

    >>>>>>>हा खुप चुकीचा समज आहे.

    ReplyDelete
  2. माझे मत : बौद्ध धर्माचे झालेले राजकीयकरण पाहून खुप दुःख वाटते. हे धर्मांतर राजकीय दृष्टीने आयोजीत करण्यात आले कि नाही ते माहीत नाही, ते असले किंवा नसले,, तरीपण मी त्याचे नक्कीच समर्थन करतो. कारण धर्मांतर करणार्या लोकांपैकी बहुतांश लोक खरे बौद्ध होणार आहेत. ते श्रेष्ठ व सदाचारी पुरुष बनु शकतील कदाचीत. बौद्ध धम्म शोषीत, वंचीत, पिडीत, दलीतांमध्ये उर्जा निर्माण करतो. तुम्हाला जे काही प्रश्न पडलेत ते बौद्ध धर्माचे राजकीयकरण पाहुन तुम्ही हे प्रश्न मांडलेत पण बौद्ध धर्माचे धार्मिकीकरण बघितले काय? आज ज्या नेत्यांनी बौद्ध धर्माचे राजकीयकरण केले तशांना कोणता बौद्ध विचारत पण नाही. माझ्या भाषेत कोणी हुंगत नाही अशांना. आज खेड्यापाड्यात लोक बौद्ध विहारे बांधुन, बौद्ध धम्म आचरणात आणत आहेत. आज इतके लोक भिक्खु बनले ते काय राजकारणी होते म्हणुन? " महार लोकांनी बौद्ध धम्म स्विकारला व त्याला बाटवला" असा काही लोकांचा लाडका आरोप आहे. कोण म्हणते बाटवला?? आमच्या धम्मभुमी (ब्रम्हपुरी) शहराची लोकसंख्या जवळपास 70% लोक बुद्धीस्ट आहे. धम्मभुमी वर येवुन बघा तुम्हाला बौद्ध संस्कृती काय ते समजेल. येथे, धम्म प्रचार केंद्र, धम्मभुमी नावाची एक बौद्ध धार्मिक संघटना आहे. गडचिरोली, गोंदीया, भंडारा आणी चंद्रपुर ह्या चार झाडीपट्टीतील जिल्ह्यात धम्माचे केंद्रस्थान आहे. जवळच एक ब्राह्मण समाजाचे सद्गृहस्थ राहतात, एक दिवस धम्मकार्यशाळा सुरु असताना, गेल्या आषाढ पोर्णीमेला ते स्वतः आले आणी म्हणाले,, तुम्ही जे इथे कार्य करत आहात ते खरच खुप चांगले आहे, तुम्ही भगवान बुद्धांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात, लोकांना प्रेमाचा संदेश देत आहात हे खुप महान कार्य आहे,, मी तुम्हाला माझी संघटनेला लागुन 10 एकर जागा दान करु इच्छितो....... एक ब्राह्मण समाजाचा मनुष्य जेव्हा स्वतःची 10 एकर जागा दान करु शकतो, का? तर महारांनी बौद्ध धर्म बाटवला म्हणुन. त्यांच्यात ब्राह्मणद्वेष जन्मताच असते म्हणुन?फेसबुकवर कोणी 10, 15 लोक जय भीम म्हणुन शिव्या देत असेल तर बौद्ध समाज हा शिव्या देतोच असे नाही. कोणी व्यक्ती, जय भीम म्हणत मुलनिवासीवाद घालत असेल तर भारतीय बौद्ध समाज मुलनिवासीवादाला पाठींबा देते असे होत नाही. शिवाय ह्या बामसेफ, मुलनिवासी, ब्रिगेड सारख्या नालायक संघटनांमध्ये बौद्ध समाजातील लोकांचे प्रमाण अगदी नगण्य असते. तपासुन पाहा बौद्धोत्तरांचे प्रमाणच तेथे जास्त आहे.


    विचार बदला! देश बदलेल!



    आणी अशा विषयांवर ब्लॉग लिहुन तुम्ही धर्माचे राजकारण करत आहात असे नाही वाटत काय तुम्हाला? जे कोणी धर्मांतर करणार आहेत त्यांना काही कोणी जबरदस्ती केलेली नाही. तो त्यांचा वैयक्तीक निर्णय असणार आहे. एक दिवस ह्या सर्व विश्वाला त्याच्या कल्याणासाठी बौद्ध धर्माच्या वाटेवर यावेच लागणार आहे. ओ.बी.सी. बांधव धर्मांतर करणार आहेत तर तुम्हाला काही वाईट वाटायला नको. आणी अशा प्रकारे ब्लॉग लिहुन तुम्ही तर राजकारणच करत आहात. ते आधी थांबवा.... जे कोणी धर्मांतर करणार आहे ज्याच्या, त्याच्या मर्जीनेचशेवटी सर्वांचा उत्कर्ष बौद्ध धर्मातच होणार आहे...
    बौद्ध व्हा ज्ञानी व्हा..... प्रज्ञा, शील, करूणेचा पुरस्कार करा.... सर्वांवर प्रेम करा...

    जय भीम जय प्रबुद्ध भारत

    ReplyDelete
  3. महावीर भाऊ,
    लेख चांगला आहे, पण माझा एक प्रश्न आहे.
    अनिता पाटील यांनी ‘मराठ्यांनी सामूहिक धर्मांतर करावे' असे आवाहन केले आहे. याच शीर्षकाचे त्यांचे एक पुस्तकही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.(त्यांच्या ब्लॉगवर यासंबंधीची पोस्ट नुकतीच पडली आहे, ती पाहून घ्यावी.) ओबीसींच्या धर्मांतराच्या आवाहनावर तुम्ही जे आक्षेप नोंदवले आहेत, तेच आक्षेप अनिता पाटील यांच्या पुस्तकावर नोंदविता येतात. मात्र, तुम्ही अनिता पाटील यांच्या बद्दल काहीही बोलत नाही आहात. अनिता पाटील मराठा असल्यामुळे तसेच त्यांच्या मागे मराठा संघटना असल्यामुळे त्यावर लिहायला तुम्ही घाबरता का?

    ReplyDelete
    Replies
    1. अनिता पाटील ही एक व्यक्ती आहे, खरी किंवा खोटी. याउलट ओ.बी.सींचे धर्मांतर घडवून आणणा-या या संघटना आहेत. त्याही एक-दोन नव्हे तर डझन भर. आता मी त्या संघटनांना घाबरत नाही तर एका व्यक्तीला किंवा तिच्या मागे असणा-या संघटनांना कशाला घाबरेन? शिवाय अनिता पाटील या व्यक्तीने कधीच पलायन केले आहे, तेंव्हा तिच्या विरोधात लिहिण्या-बोलण्यात काय अर्थ आहे? By the way मी घाबरणारा माणूस नसून घाबरवणारा माणूस आहे.

      Delete
  4. Kiman mala tari watat naahi ki OBC he baudha honyas echuk ahe ulat te kattar hindu asatat aani jati pati te jast paltat

    ReplyDelete
  5. " भारतात आपापल्या धर्माचा प्रसार करणारे ख्रिस्ती आणि मुस्लिम देखील सामूहिक धर्मांतर घडवून आणायचे टाळतात. कारण आपला धर्म वाढवण्यामागे त्यांचा हेतू राजकीय नसतो. पण बौद्ध धर्माच्या बाबतीत मात्र राजकीय हेतू स्पष्ट दिसतात. बौद्ध धर्म हा आता केवळ धर्म राहिला नसून एक राजकीय पक्षही झाला आहे."
    he tumache mat tapasale pahije muslim va christi he samuhik dharmantar kartat agadi organised hovun.buadh he kadhi madhe jahirati kadhatat.

    Muslim va christi he jar rajkiy parivartana sathi dharmantar karat nahi mag te RSS,VHP,bajrang dal sarakhya Hindutwawadi sanghatana kadun ka attack kelya jatat?

    Muslim ani christi lonkakade mubalak paisa aslya mule te nitsar dharm prasar karu shakatat matra tase buadh organisation karat nahi kinva bhartatil baudh thevade shaksham nahit.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week