सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, September 26, 2012

पंजाब मधील खत्री लोक........

-महावीर सांगलीकर 

सध्या आपल्या येथे प्रत्येक जातीतील जातीयवादी लोक आपली जात कशी महान आहे हे सांगत आहेत. आपल्या जातीची  महानता सांगताना इतिहासातील संबंधित महापुरुषांचे दाखले दिले जात आहेत. पण आपल्या जातीच्या वर्तमानाबद्दल कुठल्याच जातीचे लोक फारसे कांही बोलत नाहीत. याचे कारण त्यांच्याकडे फक्त इतिहासच आहे, वर्तमान नाही. इतिहासातील दाखले देणे म्हणजे पुराणातील वानगी देण्याचाच प्रकार आहे. 

एखाद्या जातीची अथवा समाजाची महानता सध्या त्या जातीची/समाजाची स्थिती काय आहे हे पाहूनच ठरवता येते. तो समाज राजकारणात किंवा व्यापारात किती पुढे  आहे याला महत्व नाही, तर किती वेगवेगळ्या क्षेत्रात तो पुढे आहे, त्या समाजात वर्तमानात किती महान लोक झालेत, किती लोकांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, त्या समाजाची आर्थिक व बौद्धिक परिस्थिती काय अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.

पंजाब मधील खत्री लोक........ हा सदरचा लेख ज्यांना आपली जात फारच महान आहे असे वाटते त्यांच्यासाठी आहे. या खत्री लोकांनी जी चौफेर प्रगती केली आहे, त्याला तोड नाही. खत्री लोक मुख्यत्वे पंजाब मध्ये रहातात, पण याशिवाय ते हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथेही लक्षणीय प्रमाणात आहेत. हे लोक पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर आहेत, अर्थातच तेथे त्यांचा धर्म इस्लाम हा आहे. धार्मिक बाबतीत खत्री लोक फारच उदारमतवादी आहेत. त्यांच्यात हिंदू, शीख, आर्यसमाजी, जैन आणि मुस्लीम या पाच धर्मांचे अनुयायी आढळतात. यातील मुस्लीम वगळता पहिल्या चार समाजाच्या अनुयायांमध्ये सर्रास लग्ने होतात, तर क्वचित मुस्लीम खत्रींशीही  होतात. आंतरजातीय लग्नेही मोठ्या प्रमाणावर होतात, जाट, राजपूत या इतर क्षत्रिय जातींप्रमाणे आंतरजातीय लग्नांना विरोध होत नाही.

खत्री हा क्षत्रिय या शब्दाचा अपभ्रंश आहे. हे क्षत्रिय असलेले तरी प्रत्येक बाबतीत पुरोगामी आहेत. त्यांचा हा पुरोगामीपणा आधीपासूनचा आहे, कारण त्यांनी पुरोगामी बनावे म्हणून त्यांच्यात कोणाला चळवळ करावी लागली नाही. खत्री समाजात आपल्या जातीविषयी टोकाचा अभिमान नाही. 

हे लोक मुख्यत्वे हिंदी आणि पंजाबी या दोन भाषा अस्खलितपणे बोलतात. 

मानववंश शास्त्रज्ञांच्या मते हे भारतात प्राचीन काळी आलेल्या ग्रीकांचे वंशज आहेत.  अर्थातच पुढे त्यांचे इथल्या इतर जमातींशी मिश्रण झाले. तरीही या लोकांमध्ये ग्रीक फीचर्स अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसतात. हे लोक उंच, नाकी-डोळी नीटस,  लांब नाकाचे, गोरे किंवा उजळ रंगाचे, अनेकदा घा-या डोळ्याचे असतात.

खत्री समाजाचे लोक राजकारण, अर्थकारण, साहित्य, संगीत, कला, सिनेमा, विज्ञान, संरक्षण आदी सगळ्याच क्षेत्रात इतरांपेक्षा फारच पुढे आहेत. पुढील कांही उदाहरनांवारून हे स्पष्ट होईल:

१. या समाजातील एका व्यक्तीस नोबेल पारितोषिक, दोन व्यक्तींना भारत रत्न, तीन व्यक्तींना परमवीरचक्र, ११ व्यक्तींना महावीर चक्र, अनेकांना पद्मविभूषण व पद्मभूषण या पदव्या आणि अनेक साहित्यिकांना ज्ञानपीठ व साहित्य अकादमी पारितोषिके मिळाली आहेत. 
२. या समाजाने भारताला तीन प्रधानमंत्री दिले.
३. या समाजातील एक महिला नासाची प्रसिद्ध अंतराळवीर होती
४. या समाजाने भारताला अनेक पराक्रमी सेनाधिकारी दिले.
५. हिंदी सिने जगतावर या समाजाचे अक्षरश: राज्य आहे. 

खत्री समाजातील कांही प्रसिद्ध लोक: 

धार्मिक: 
शीख गुरु: शीखांचे दहाही गुरु  हे खत्री समाजातील होते.
जैन आचार्य: आचार्य विजयानंद सुरी

क्रांतीकारक: मदन लाल धिंग्रा, सुखदेव

राजकारण: मास्तर तारा सिंग, गुलजारी लाल नंदा,  इंद्र कुमार गुजराल, मन मोहन सिंग, मोन्टेक सिंग अहलुवालिया, कपिल सिब्बल, मनेका गांधी, पुरुषोत्तम दास टंडन, लाल कृष्ण अडवानी

राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक व पत्रकार: भीष्म सहानी, लाला जगत नारायण, अमृता प्रीतम, खुशवंत सिंग,  दीपक चोपडा, मुल्क राज आनंद, रोशन सेठ, विक्रम सेठ, नजम सेठी (पाकिस्तान), विनोद  दुआ, प्रभू चावला, करन थापर, देवकी नंदन खत्री, नरेंद्र कोहली

विज्ञान:  हर गोविंद खुराना, बिरबल सहानी, कल्पना चावला, सतीश धवन, रविश मल्होत्रा

खेळ: बिशन सिंग बेदी, अभिनव बिंद्रा

संरक्षण क्षेत्र: कर्नल प्रेम कुमार सेहगल, आडमिरल एस.एम. नंदा, एअर चीफ मार्शल प्रताप चंद लाल,  एअर चीफ मार्शल निर्मल चंद्र सुरी, ले.ज. जगजीत सिंग अरोडा, विक्रम बात्रा, अरुण खेत्रपाल, जनरल जे.जे. सिंग, जनरल निर्मल चंद्र विज, जनरल ओम प्रकाश मल्होत्रा,  जनरल प्राण नाथ थापर, जनरल व्ही. पी. मलिक, जनरल दीपक कपूर, गुरुबचन सिंग सालरिया

गीत-संगीत: कुंदन लाल सहगल, ओ.पी. नय्यर, मदन मोहन, महेंद्र कपूर, अनुप जलोटा, अनु मलिक, बाबा सेहगल

सिने निर्माता व दिग्दर्शक: चेतन आनंद, रामानंद सागर, यश चोपडा, आदित्य चोपडा, सुभाष घई, करन जोहर, शेखर कपूर, राज खोसला, दीपा मेहता, मीरा नायर

सिने अभिनेते:  पृथ्वीराज कपूर, बलराज सहानी,राज कपूर, विजयानंद, देव आनंद, शम्मी कपूर, शशी कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, विनोद खन्ना, राकेश रोशन, सुरेश ओबेरॉय,  प्रेम नाथ, राजेंद्र नाथ, प्रेम चोपडा, ओम पुरी, अमरीश पुरी, रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर,  राज बब्बर, पंकज कपूर, रणवीर कपूर, परीक्षित सहानी, शाहीद कपूर, शक्ती कपूर, अनिल कपूर, संजय कपूर, रोशन सेठ, बोनी कपूर, ऋतिक रोशन,  अक्षय खन्ना, अक्षय कुमार, एकता कपूर, कुणाल कपूर, विवेक ओबेरॉय,  गुलशन ग्रोव्हर,  आदर जैन, अरमान जैन,  तुषार कपूर, राकेश बेदी

सिने अभिनेत्र्या: करिष्मा कपूर, रवीना टंडन, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, जुही चावला, भूमिका चावला, सोनम कपूर,  ट्विंकल खन्ना

4 comments:

  1. लेख खूप चांगला आहे.
    लेखाचे नाव प्रथमदर्शनी वाचले तेव्हा खात्री म्हणजे खतरनाक, धोकडायक याच्याशी संबंधीत काहीतरी वाटले होते नंतर त्याचा अर्थ समजला.

    ReplyDelete
  2. लाल कृष्ण अडवानी he khatri ahet ki Sindi?
    ,अनु मलिक ha music plagarism samrat ahe.
    ,ऋतिक रोशन ha khatri ahe ki parsi?
    ,तुषार कपूर ha kiti kal chalala?
    ,ट्विंकल खन्ना hi khatri ahe ka?,

    ReplyDelete
  3. Vinod dua he Brahmin ahet je afgan pak seemela apale purvajanche ghar mantat. Correct me if i am wrong?

    ReplyDelete
  4. खूपच माहितीपूर्ण लेख आहे.

    महाराष्ट्रात मराठा समाज बहुसंख्य आहे त्यामुळे हा समाज संपूर्णपणे पुरोगामी झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणे शक्य नाही. जातीय नेते आपापल्या जातीय अस्मिता (दुकाने) सांभाळण्यासाठी भांडतात पण कोणताही जातीय नेता त्या जातीतील समस्या सोडविण्यासाठी भांडताना दिसत नाही. उदा. जातीमध्ये होणारे बालविवाह, निरक्षरता, दारिद्र्य, बेरोजगारी या प्रश्नांवर ते आपल्या समाजाचे प्रबोधन करताना दिसून येत नाहीत. संयुक्त राष्ट्राने निश्चित केलेली millenium development goals गाठण्यात आपली जात कुठे आहे याचा विचार त्यांच्या मनात येणे शक्य नाही.

    जातीय संस्कारातून मुक्त झाल्याशिवाय कोणत्याही मानवी समूहाची किंबहुना व्यक्तीची सुद्धा प्रगती होणे शक्य नाही.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week