-महावीर सांगलीकर
सारा भारत बुद्धमय करायला निघालेल्यांनी, हा देश हिंदू राष्ट्र आहे असे म्हणणा-यांनी आणि जगात केवळ इस्लाम हा एकच धर्म असायला पाहिजे असे म्हणणा-यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. तुम्ही सगळेजण धर्माने नसला तरी संस्कृतीने ब-याच अंशी ख्रिस्ती झालेला आहात. तुमचा दिवस, महिना, वर्ष ख्रिस्ती कॅलेंडर नुसार सुरू होतात, पाव हा तुमच्या खाण्यातील एक महत्वाचा घटक असतो, तुमचा पेहराव ख्रिस्ती लोकांप्रमाणे असतो, तुमच्या मुलांचे वाढदिवस ख्रिस्ती पद्धतीने साजरे होतात, तुमच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालणे हे तुम्ही तुमचे आद्य कर्तव्य समजता, तुमची सही तुम्ही अडाणी असलात तरी इंग्रजी भाषेत असते, तुमच्या पोरांनी शिकून युरोप-अमेरिकेत (म्हणजे ख्रिस्ती लोकांच्या देशांमध्ये) जावे ही तुमची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही सगळे अर्धवट ख्रिश्चनच आहात.
खरे म्हणजे युरोपियन ख्रिस्ती लोकांनी तुम्हाला माणसात आणले. इंग्रज भारतात आले नसते तर महात्मा फुले घडले नसते. हिंदू धर्मात सुधारणा घडली नसती. बाबासाहेब आंबेडकरही घडले नसते, त्यामुळे बौद्ध धर्माचे पुनर्जीवनही झाले नसते. मुस्लिम लोक आजही मध्ययुगात राहिले असते. तरीही तुम्ही सर्वजण उठ सुठ ख्रिस्त्यांना शिव्या देत असता, याची मला गम्मत वाटते.
मुस्लिमांना संपवण्याची भाषा करणा-यांनी हे लक्षात ठेवावे की ते तुम्हाला जमणार नाही. मुस्लिम अतिरेक्यांनी जगात फारच गोंधळ घातला तर त्यांचा बंदोबस्त ख्रिस्ती राष्ट्रे करतील.
हा देश कधीही हिंदू राष्ट्र नव्हते आणि पुढेही होवू शकत नाही. हा देश काय आणि हे जग काय कधीही बुद्धमय किंवा इस्लाममय होवू शकत नाही. जगात केवळ आपलाच झेंडा फडकायला पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी दिवास्वप्ने बघणे बंद करावे.
ज्यांना ख्रिस्ती धर्म त्यांचा स्पर्धक असल्याने आवडत नाही, त्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्याशी स्पर्धा करणारे जिंकू शकणार नाहीत. कारण त्यांनी धर्म आणि राजकारण, धर्म आणि समाज कारण यांची फारकत केली आहे. तुम्ही मात्र अजूनही धर्म, राजकारण आणि समाजकारण यांची भेसळ करत आहात. शिवाय इतर धर्माचा, इतर धर्मीयांचा द्वेष करणे हाच तुमचा धर्म बनला आहे. याउलट ख्रिस्ती लोक मात्र जात-धर्म ना पहाता शिक्षण प्रचार, मानव सेवा, सद्भाव यांनाच सर्वोच्च महत्व देत आहेत.
मी ख्रिस्ती नाही. तरीही मी हे लिहित आहे.
हेही वाचा:
हिंदू धर्माला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
ओ.बी.सींचे बौद्ध धर्मांतर: कांही प्रश्न
बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
भारतातील मुलींची पहिली शाळा
सांगलीकर तुम्ही पहिल्या परिच्छेदात केलेला उल्लेख वास्तविक आहे, मला आवडला. याव्यतिरिक्त सर्वत्र भारतीयांचा 'तुम्ही' असा केलेला उल्लेख तुमचे 'राष्ट्रप्रेम' उघड(expose) करणारा आहे.
ReplyDeleteअजून खूप त्रुटी आहेत, तुमच्या लेखात आणि विचारात.
विचार करा...
या लेखाचा प्रतिवाद करणाऱ्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीचा पुरस्कार करावा ही अपेक्षा असेल तर ती निश्चितच धुळीला मिळालेली आहे. नागपूरला थंडी जोरात आहे. बहुतेक विचारही गोठलेले दिसतात.
ReplyDelete