सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label History of Patils. Show all posts
Showing posts with label History of Patils. Show all posts

Friday, September 9, 2011

पाटील आणि पाटीलकी




-महावीर सांगलीकर

सध्या कांही लोक मराठा समाजाला टार्गेट करण्याचे उद्योग करत आहेत. त्यात एखादा मराठा पाटील आडनाव लावत असेल तर या मंडळींना ते फारच खुपत असते.

पाटलांना जुन्या मराठी सिनेमांनी उगीचच बदनाम केले. नेहमीप्रमाणे ती 'विशिष्ट' लेखकांची करामत होती. अलीकडे पाटलांना टार्गेट करतांना पाटील हे वर्चस्ववादी असतात हा आरोप त्यांच्यावर केला जातो.

एखादी व्यक्ती आपले आडनाव पाटील असे लावत असेल तर त्यात कसला आलाय वर्चस्ववाद? अहमद नगर भागात सगळ्याच जाती-जमातींचे लोक प्रसंगी आपले आडनाव पाटील असे लावतात, विशेषत: लग्न पत्रिका, लग्न समारंभ या ठिकाणी.

पाटील हे पदनाम पुढे आडनाव झाले असले तरी ते कुठल्याही विशिष्ठ धर्माशी अथवा जातीशी संबंधीत नाही. जसे मराठा समाजात पाटील हे आडनाव मोठ्या प्रमाणात आहे, तसे ते लेवा पाटीदार, जैन, लिंगायत वगैरे समाजातही मोठ्या प्रमाणावर आहे. इतकेच नव्हे तर ते मुस्लीम, ब्राम्हण, कुणबी, दलित वगैरे समाजातही दिसून येते. गुजरात मधील पटेल हे देखील पाटीलच आहेत. उत्तरेतील चौधरी, गोव्यामधले गावडा आणि कर्नाटकातील गौडा ही देखील पाटील समकक्ष पदनामे आहेत.

पाटील या पदनाम किंवा आडनावाचा इतिहास फार प्राचीन आहे. प्राचीन प्राकृत साहित्यात पट्टईल हे पदनाम दिसते. त्यापासूनच मराठीत पाटील व गुजरातीत पटेल हे शब्द तयार झाले आहेत. कुठेही या पदाचा संबंध वर्ण व्यवस्था अथवा जातीव्यवस्था यांच्याशी येत नाही. नाहीतर शूद्र-अतिशूद्रांना पाटीलक्या मिळाल्याच नसत्या.


मला एका गोष्टीची गम्मत वाटते. एखाद्या व्यक्तीने स्वत:ला पाटील म्हणवून घेणे, पाटील असण्याचा अभिमान धरणे म्हणजे तो वर्चस्ववादी आहे असे कांही लोक समजतात. एखाद्या व्यक्तीने स्वत:ला क्षत्रिय मानणे म्हणजे अजून भयंकर समजले जाते. त्याला वर्ण व्यवस्थेचे समर्थक मानले जाते. मग गौतम बुद्धांना आपण क्षत्रिय असल्याचा, तेही शाक्य क्षत्रिय असल्याचा अभिमान होता, मग त्यांना आपण वर्णव्यवस्थेचे समर्थक मानायचे का? आणि जे लोक आपण शूद्र असल्याचा अभिमान धरू लागले आहेत त्यांचे काय करायचे? स्वत:ला शूद्र मानणे म्हणजे वर्ण व्यवस्थेचे समर्थन करणे असेच होत नाही का?





महाविचार LATEST

Popular Posts This Week