सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label Marathi Article on Brahmins. Show all posts
Showing posts with label Marathi Article on Brahmins. Show all posts

Saturday, May 7, 2011

ब्राम्हनांच्या ताब्यात देश खरेच आहे का?


 -महावीर सांगलीकर 

भारताच्या प्रशासनात आणि इतर अनेक क्षेत्रात महत्वाच्या पदांवर ब्राम्हनांचा वरचश्मा आहे असा अनेकांचा समज  आहे.

या संदर्भात नुकताच हर्षवर्धन देशपांडे यांच्या एका लेखातील आकडेवारी बघन्यासारखी आहे. त्यांनी या लेखात म्हंटले आहे की विद्यापीठांचे ५१% कुलगुरू, सुप्रीम कोर्टाचे ६५% न्यायाधीश, हायकोर्टाचे ५०% न्यायाधीश, ४१% राजदूत, ७२% आईएस ऑफिसर्स, ६१% आय.पी.एस.ऑफिसर्स  हे ब्राम्हण आहेत. तसेच रेडिओ व टी.वी.चे८३% कलाकार/कर्मचारी, एअर लाइन्स मधील ६१% कर्मचारी, सी.बी.आय/कस्टम/सेन्ट्रल एक्साइझ मधील ७२% लोक हे ब्राम्हण आहेत. ही आकडेवारी देशपांडे यांना कोठून मिळाली हे त्यांनाच ठाउक,  पण  ही आकडेवारी 'नासातील  ५०% शास्त्रद्न्य   भारतीय असतात' या सारखीच बोगस आहे. बहुधा देशपांडे बहुजन नेते जे आकडे फुगवून सांगत  असतात त्याला बली  पडलेले दिसतात.

ही आकडेवारी कशी  बोगस आहे हे  मी लगेच दाखवून देतो. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट वर सध्याच्या सर्व न्यायाधीशांची नावे दिली आहेत. तेथे  एकुण २९ न्यायाधीश आहेत. मुख्य  न्यायाधीश एस. एच. कापडिया हे आहेत. ते पारशी आहेत. या २९ न्यायाधीशांपैकी फक्त ९ जन  ब्राम्हण आहेत, म्हणजे केवळ ३०% ब्राम्हण आहेत, पण प्रचारकी लोक हा आकडा फुगवून  ६५ टक्क्यावर  नेतात. हीच गोष्ट इतर सगळ्या क्षेत्रातही  घडत आहे. तुम्हाला माहीत असणा-या आय.पी.एस, आय.ए.एस. व इतर महत्वाच्या अधिका-यांच्या नावांची एक यादी बनवा, तुम्हाला त्यात ब्राम्हण अधिकारी फार तर ३०-३५%च दिसतील.

जात हीच मुख्य ओळख  असणा-या भारतीयांना, आणि त्यातील खुद्द ब्राम्हनांना देखील जातींची नीट माहिती असत नाही. त्यामुले मोठ्या  पदांवर  असलेल्या  अनेक ब्राम्हनेतरांना  ब्राम्हण समजले जाते. अनेक ब्राम्हण आणि बहुजनही बाजी प्रभु देशपांडे, स्वामी विवेकानंद, जगदीश चन्द्र बोस, मुंशी प्रेमचंद,  नेताजी सुभाष चन्द्र बोस, राजेन्द्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण,  यांना ब्राम्हण समजत असतात. पण यातील कोणीच ब्राम्हण नव्हते. बहुतेक जन बालासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, किशोरी अमोनकर यांना  ब्राम्हण समजतात. पण हे कांही ब्राम्हण नाहीत. इतकेच नव्हे तर पुण्यातील जोशी वड़ेवाले तसेच मोहन जोशी (कोँग्रेस नेते) हे जोशी असेल तरी ब्राम्हण नाहीत.

आपले मित्र संजय सोनवनी यांना देखील अनेकजन ब्राम्हण समजतात. एवढेच नव्हे तर मला देखील अनेकजन  ब्राम्हण समजत असतात.

मागे एकदा एका  ब्राम्हण विरोधी पुस्तकात लेखकाने प्रसिद्द डोक्टर व शाकाहार प्रचारक कल्याण गंगवाल यांच्यावर  ते ब्राम्हण असल्याचे गृहीत धरून टीका केली होती.

भारताच्या क्रिकेट टीम मध्ये ५०% हून जास्त ब्राम्हण असतात अशी आकडेवारी अनेकदा मी वाचली आहे. प्रत्यक्षात तेथे एक-दोनच ब्राम्हण खेलाड़ू असतात.

हुशार लोकांना ब्राम्हण समजायच्या पद्धती मुले वर देशपांडे यांनी दिलेल्या आकडेवारी सारखी खोटी आकडेवारी तयार  होत असते. या  आकडेवारीचा उपयोग  बहुजन नेत्यांना  ब्राम्हणद्वेषासाठी  तर ब्राम्हण लोकांना  आपला अहंकार जोपासन्यासाठी होत असतो.

पण हे ब्राम्हण महात्म्य आजचे नाही. भारताच्या इतिहासात अनेक महान लोकांना ते ब्राम्हण नसतांना त्यांच्यावर पुढील कालात ब्राम्हनत्व लादले गेले,  एवढेच नाही तर अनेक ब्राम्हनेतर  राजघरान्यांना ब्राम्हण घराणी ठरवले गेले. त्याबद्दल मी नंतर कधीतरी लिहीन.

महाविचार LATEST

Popular Posts This Week