सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
मराठा की मराठी? | Maratha or Marathi?
-महावीर सांगलीकर
अलिकडे कांही लोक
मराठा इतिहास या शब्दाऐवजी
मराठी इतिहास हा शब्द जाणीवपूर्वक वापरू लागले आहेत. अगदी पानीपतला मराठी लोक लढायला गेले होते असे म्हणायला लागले आहेत. मराठा हा शब्द त्यांना सहन होईनासा झाला आहे. त्यामुळे इलेक्टॉनिक व प्रिंट मेडीया, इंटरनेट, भाषणे, गप्पागोष्टी यातून मराठा हा शब्द हद्द्पार होत आहे. या शब्दाचा जो कांही उल्लेख हा कंपू करत असतो, तो या शब्दाला बदनाम करण्यासाठीच.
खरे पहाता मराठा हा शब्द प्रादेशिक आहे. छ. शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लीम सैनिकांसकट सगळ्यांनाच मराठा म्हंटले आहे. त्यांच्याही पूर्वी महाराष्ट्रातील सर्वांनाच मराठा म्हंटले जायचे. प्राचीन काळी मराठा या शब्दाला मरहट्टा हा शब्द होता. पुढे तो मर्हाटा झाला व त्याचेच रूप म्हणजे मराठा हे होय. मरहट्ट्यांची भाषा ती मरहट्टी. तिचेच आजचे रूप मराठी हे आहे. कोणत्याही भाषेचे नाव ती भाषा कोणते लोक बोलतात यावरून पडते. जसे इंग्रजांची ती इंग्रजी. तसेच मराठ्य़ांची ती मराठी. त्यामूळे जे लोक मराठा हा शब्द टाळतात त्यांचा खरा हेतू वेगळाच आहे. तो म्हणजे मराठा समाजाला डिवचणे. पण खरे म्हणजे मराठा नावाची जातच अस्तित्वात नाही व आपण सगळेच मराठा आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जर ५०-१०० वर्षापुर्वीची कागदपत्रे पाहिली तर तुम्हाला मराठा कुणबी, मराठा परीट, मराठा सुतार, मराठा धनगर अशा नोंदी सापडतील. (पण आज मराठा शब्द जावून तेथे हिंदू हा ’परकीय’ शब्द आला आहे!).
आज ज्यांना मराठा हा शब्द नकोसा झाला आहे, त्यांनी हे विसरू नये की पेशवे देखील स्वत:ला मराठा म्हणवून घेत असत. महाराष्ट्राबाहेरील लोक महाराष्ट्रातील लोकांना मराठाच म्हणतात. त्यामुळे मराठी इतिहास, मराठी लोक हे शब्द वापरणे ताबडतोब बंद केले पाहिजे.
Popular Posts This Week
-
-महावीर सांगलीकर कांही लोक भारतीय घटनेच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. त्यांना भारतीय घटनेचे एक...
-
-महावीर सांगलीकर माझे या ब्लॉगवरील अलीकडचे लेख बहुजनवादाच्या सरळ सरळ विरोधातील आहेत. मी आता बहुजनवादाच्या पूर्णपणे विरोधी झालो आहे. त्...
-
-महावीर सांगलीकर भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचा...
-
हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते इस...
-
-महावीर सांगलीकर एकीकडे आर . एस . एस . सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत...
-
-महावीर सांगलीकर कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अन...
-
-महावीर सांगलीकर हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्ण...
-
-महावीर सांगलीकर माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्...
-
-महावीर सांगलीकर ब्राम्हणांनी शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला बंदी घातली हा बहुजनवाद्यांचा आणखी एक लाडका सिद्धांत आहे. शूद्रांच्या ...
-
-महावीर सांगलीकर कोणतीही लढाई ही संख्याबळाने जिंकली जात नसते . भीमा कोरेगावची लढाई हे याचे मोठे उदाहरण आहे . तेथे इंग्रजा...
100% AGREED :)
ReplyDeleteखरे तर याला आर्थिक कारण आणि राखीव जागांचे राजकारण आहे.मराठा समाजातील अनेक लोक ओबीसी आरक्षित जागांचे लाभ मिळावे, म्हणून आता `मराठा' हा शब्द जाणीवपूर्वक टाळतात. सध्याच्या पुरोगामी काळात योग्य आर्थिक लाभासाठी असे करण्यात काहीही गैर नाही. शिवाय यामुळे जातीयवाद कमी होईल, हा मोठा फायदा आहे.अनिल गोरे
ReplyDeletetumchyashi me purnapane sahamat aahe. rajkiy poli bhajun ghenyasathi pan kahi lokanchya kya markatlila chalu aahet.
ReplyDelete- ANIl Desale (9764690653)
मी मराठाच
ReplyDeleteapan sarvani tyanchya pekshahi mothya avajat pratek thikani maratha ya shabdhachacha uchar karava , vapr karava je napusak ahet te marathi baki sarv maratha ...
ReplyDeletejai hari !
ReplyDeletefarch chhan lekh ahe ani apale likhanhi sanshodhanatmak asate ....
Atishay Sunadar lekh aahe ..
ReplyDelete