सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, February 9, 2011

संस्कृत भाषेबद्दल कोण काय म्हणतात?| Famous people's quotes about Sanskrit Language

 |
माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ’संस्कृत भाषेचे गौडबंगाल’ या  पुस्तकात मी संस्कृत भाषेबद्दल प्रसिद्ध संत व विद्वांनांनी काय काय म्हंटले आहे यावर एक खास प्रकरण दिले आहे. या प्रकरणात व पुस्तकात इतरत्र मी चक्रधर स्वामी, राजाराम मोहन राय, इतिहासाचार्य राजवाडे, प्र. रा. देशमुख वगैरे २०हून अधिक विद्वानांची संस्कृत भाषेबद्दलची मते दिली आहेत.  त्यातील कांही  निवडक मते मी येथे देत आहे:

प्रसिद्ध संत कबीर यांनी संस्कृत भाषेला साचलेले डबके तर लोकभाषांना वहाते पाणी म्हंटले आहे.

प्रसिद्ध तत्वचितक ओशो यांना कोण ओळखत नाही? त्यांचे संस्कृत भाषेबद्दलचे विचार फार महत्वाचे आहेत. ते म्हणतात: 
संस्कृत भाषा ही बोली भाषा कधीच नव्हती. सामान्य लोकांना कळू नये म्हणून वैदिक ब्राम्हणांनी बनवलेली ती एक कृत्रिम सांकेतीक भाषा होती.

भास्करराव जाधव हे प्रसिद्ध इतिहास संशोधक आपल्या मराठे आणि त्यांची भाषा या पुस्तकात म्हणतात:
जे लोक जी भाषा बोलतात, त्या भाषेला त्या लोकांचे नाव देण्यात येते. संस्कृत या नावाचे लोक असल्याचा दाखला नाही. त्या नावाचा देशही नव्हता.

 ज्ञानकोश कार केतकर त्यांच्या विद्वत्तेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषेबद्दल ते काय म्हणतात ते पहा:
प्राकृत वा.डमय स्वतंत्रपणे वाढले, संस्कृत वा.डमय मात्र प्राकृत वा.डमयाचे संहिती करण करून वाढले. प्राचीन राजे आणि लोक प्राकृतच बोलत.

 संत तुलसीदास यांनी ते संस्कृतचे विद्वान असूनही हिंदी भाषेत लिखाण केले. त्यांनी संस्कृत भाषेबद्दल म्हंटले आहे:माझी भाषा (हिंदी) म्हणजे अमृताने भरलेले मातीचे भांडे आहे, तर संस्कृत भाषा म्हणजे विषाने भरलेला रत्नजडीत प्याला आहे.



1 comment:

महाविचार LATEST

Popular Posts This Week