सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
अपयशी भारतीय जनता पक्ष
-महावीर सांगलीकर
आपल्या येथे उठसूठ सत्ताधारी पक्षाला शिव्या घालणे हा अनेकांचा छंद असतो. अशा लोकांना विरोधी पक्षाची बाजू लावून धरण्याची खोड असते. पण जेव्हा विरोधी पक्ष आपले काम नीट करत नाहीत तेव्हाही या छांदिष्ट लोकांना विरोधी पक्षाचाच पुळका येत असतो याचे आश्चर्य वाटते.
सध्या रामदेव बाबा आणि आण्णा हझारे यांच्या आंदोलनांच्या निमित्ताने झोपी गेलेला भा.ज.पा. हा पक्ष किंचित जागा झालेला आहे. या पक्षाचे संसदेत 115 खासदार आहेत. पण हे खासदार नेमके काय करत असतात हा संशोधनाचा विषय आहे.
संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष वात चुकू नये म्हणून विरोधी पक्षाने संसदेत सत्ताधारी पक्षावर वचक ठेवायचा असतो. शिवाय संसदेबाहेरही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जन जागृती करायची असते. पण भारतीय जनता पक्ष या बाबतीत अपयशी ठरला आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाचे काम आण्णा-बाबांना करावे लागत आहे!
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही नीट काम करू शकत नाही, मग त्याने सत्ताधारी बनण्याचे स्वप्न बघणे हा एक मूर्खपणाच आहे!
पुढील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची अवस्था कम्युनिष्ट पक्षा सारखीच होणार यात संशय नाही! काँग्रेस पक्ष भा.ज.प.ची अवस्था रामदेव बाबा सारखीच करून टाकेल.
Popular Posts This Week
-
-महावीर सांगलीकर कांही लोक भारतीय घटनेच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. त्यांना भारतीय घटनेचे एक...
-
-महावीर सांगलीकर माझे या ब्लॉगवरील अलीकडचे लेख बहुजनवादाच्या सरळ सरळ विरोधातील आहेत. मी आता बहुजनवादाच्या पूर्णपणे विरोधी झालो आहे. त्...
-
-महावीर सांगलीकर भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचा...
-
हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते इस...
-
-महावीर सांगलीकर एकीकडे आर . एस . एस . सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत...
-
-महावीर सांगलीकर कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अन...
-
-महावीर सांगलीकर हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्ण...
-
-महावीर सांगलीकर माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्...
-
-महावीर सांगलीकर ब्राम्हणांनी शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला बंदी घातली हा बहुजनवाद्यांचा आणखी एक लाडका सिद्धांत आहे. शूद्रांच्या ...
-
-महावीर सांगलीकर कोणतीही लढाई ही संख्याबळाने जिंकली जात नसते . भीमा कोरेगावची लढाई हे याचे मोठे उदाहरण आहे . तेथे इंग्रजा...
No comments:
Post a Comment