महार कोण होते? हे संजय सोनवणी यांचे नवे पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले. महाराष्ट्रातील महत्वाच्या असणा-या महार या समाजाचा अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक इतिहास सोनवणी यांनी या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाची सुरवात लेखकाने वर्ण व्यवस्थेच्या वैदिक निर्मितीपासून केली असून या विषयासाठी त्यांनी 'पुरुष सूक्त: काय खरे काय खोटे' हे स्वतंत्र प्रकरण दिले आहे. दुस-या प्रकरणात लेखकाने वर्णव्यवस्थेचे स्तोम कधी आणि कसे वाढले याचा इतिहास संदर्भासह मांडला आहे.
संजय सोनवणी यांच्या या पुस्तकातील महत्वाचा निष्कर्ष हा आहे की महार हा समाज प्राचीन काळातील रक्षक या समाजाचा वारसदार आहे. त्याचप्रमाणे मानवी समाजाच्या निर्मितीत आधी निर्माण कर्ते, मग रक्षण कर्ते आणि शेवटी पुरोहित वर्ग आला हेही त्यांनी वैदिक ग्रंथांचे संदर्भ देवून सिद्ध केले आहे. त्याच बरोबर रक्षक समाजाचा विस्तृत इतिहास, त्यांचे वारसदार असणा-या महार या शब्दाची उपपत्ती, नागवंश, सातवाहन राजे वगैरे अनेक विषयांची माहिती लेखकाने दिली आहे.
'सामाजिक अवनती..कधी...कशी आणि का', आणि 'वर्तमान आणि भवितव्य' ही या पुस्तकातील सगळ्यात महत्वाची प्रकरणे आहेत. ती समाजशास्त्राच्या प्रत्येक अभ्यासकाने वाचायलाच पाहिजेत अशी आहेत. लेखकाने महार समाजाच्या सध्यस्थितीवर आपले अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे, आणि भविष्यातील वाटचाली संदर्भात आपली मते मांडली आहेत.
डॉक्टर बाबासाहेबांनी 'अस्पृश्य पूर्वी कोण होते?' हे महत्वाचे पुस्तक लिहिले होते. संजय सोनवणी यांनी बाबासाहेबांच्या नंतर घडलेल्या इतिहासाचे विवेचन आपल्या पुस्तकात केले आहे, आणि पुढील दिशाही दाखवली आहे. त्यामुळे हे पुस्तक 'अस्पृश्य पूर्वी कोण होते?' या पुस्तकाची पुढची कडी ठरेल असे मला वाटते.
महार कोण होते? लेखक: संजय सोनवणी
प्रकाशक: पुष्प प्रकाशन, पुणे ४११ ०३८
फोन: ८८०६२४०५२७
sanjaysonawani@yahoo.com
पाने ११२, किंमत: १०० रुपये
अभिनंदन !! आणि शुभेच्छा ! मी पुस्तक विकत घेऊन वाचीन......
ReplyDeletemala plz bhagwa dwaj yacha itihas sanga
ReplyDelete