सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Friday, July 6, 2012

भित्यापाठी ब्रम्हराक्षस ..............

-महावीर सांगलीकर

अनेकांना सतत कुणाची तरी, कशाची तरी भीती वाटत असते. अशा भीतीला मानसशास्त्रात फोबिया असे म्हंटले जाते. फोबियाचे शेकडो प्रकार आहेत. कुणाला अंधाराची भीती वाटते, कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला झुरळाची भीती वाटते, कुणाला उंच जागेवर जाण्याची भीती वाटते, तर कुणाला डॉक्टरचीही भीती वाटते. कुणाला कशाची भीती वाटेल हे सांगता येत नाही. माझा एक मित्र दोरीला घाबरत असे. त्याला दोरीच्या ठिकाणी साप असल्याचा भास होत असे.

अनेक लोक आपल्या बायकोला देखील घाबरत असतात. नवरा आपल्या बायकोला घाबरतो, बायको झुरळाला घाबरते, म्हणजे अशा नव-यांनी झुरळाला आपले मित्र मानले पाहिजे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. (हे आपले उगीच गम्मत म्हणून बरे का..)

हा फोबिया इथेच थांबत नाही. पूर्वग्रह आणि पक्षपात यातून अनेक लोक एखाद्या विशिष्ट समुदायाला घाबरत असतात. त्यातून असे लोक त्या समुदायाला सतत टार्गेट करत रहातात. हिटलरला ज्यूडिओ फोबिया (म्हणजे ज्यू लोकांविषयी भीती) होता. भारतात हिंदुत्ववादी लोक मुस्लीम फोबिया, ख्रिश्चन फोबिया, काँग्रेस फोबिया, पाकिस्तान फोबिया अशा अनेक फोबियांना बळी पडलेले आहेत. दुसरीकडे बहुजनवादी लोक ब्राम्हण फोबियाला बळी पडले आहेत. असे फोबियाज सोशल फोबिया या प्रकारात मोडतात. सोशल फोबिया हा केवळ भीती पुरता मर्यादित उरत नाही, तर असे फोबियाज झालेले लोक त्यातून द्वेष, तिरस्कार, न्यूनगंड अशा अनेक मनोविकारांना बळी पडत असतात.

अतिरेकी भीती किंवा फोबिया हा एक मनोरोग आहे. वर उल्लेख केले सगळे फोबिया हे या मनोरोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या सगळ्यात बहुजनवाद्यांना झालेला ब्राम्हण फोबिया हा मनोरोग मला सगळ्यात जास्त धोकादायक वाटतो. कारण ब्राम्हण फोबिया या मनोरोगात फक्त भीती हा प्रकार नसून आपल्या अपयशाचे कारण ब्राम्हण लोक आहेत असे मानून अपयशाचे सगळे खापर त्यांच्यावर फोडणे हा प्रकार चालत असतो. यातून बहुजनवादी लोक आपल्या अपयशाची खरी कारणे कोणती हे शोधायच्या फंदातच पडत नाहीत. खरे म्हणजे ब्राम्हण अल्पसंख्य असून बहुजनांची संख्या त्यांच्या कितीतरी पट आहे. तेंव्हा बहुजनांनी त्यांना घाबरण्याचे कांही कारण नाही. पण आपले अपयश लपवण्यासाठी बहुजनवाद्यांकडून खेळण्यात येणा-या या 'ब्लेम गेम' मध्ये ब्राम्हणांना टार्गेट करणे खूप सोपे आणि सोयीचे असल्याने त्यांना सतत टार्गेट करण्यात येते एवढाच त्याचा अर्थ.

ज्यांना ब्राम्हण फोबिया झालेला आहे असे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. हा फोबिया झालेल्या लोकांची अवस्था एखाद्या भित्रट माणसामागे ब्रम्हराक्षस लागल्यास त्याची अवस्था कशी होईल तशी झालेली आहे. त्यांना इतिहासात आणि वर्तमानात जिकडे-तिकडे हा ब्रम्हराक्षस दिसत असतो. या ब्रम्हराक्षसाने गेली पाच हजार वर्षे आपल्यावर अत्याचार केले, आपल्यावर गुलामगिरी लादली, आपल्याला शिक्षण घेवू दिले नाही, आपल्यावर जाती लादल्या, आमची नावे धोंडू, दगडू, कचरू अशी ठेवायला लावली असे या मनोरुग्णांना वाटत असते.

या ब्रम्हराक्षसाने उर्फ ब्राम्हणांनी खरेच असे केले असेल तर त्यातून एक भयानक अर्थ निघतो. मूठभर ब्राम्हणांनी एवढ्या मोठ्या बहुजन समाजास आपले गुलाम केले असेल, आणि तेही गेल्या पाच हजार वर्षांसाठी, तर ब्राम्हण हे बहुजनांपेक्षा श्रेष्ठ ठरतात, असाच त्याचा अर्थ आहे.

हेही वाचा:
बहुजनवाद: शिक्षणबंदीचे सत्यशोधन
अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद
मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात
वैचारिक विकासातील मानसिक अडथळे

5 comments:

  1. मराठा समाजाने ब्राह्मणांचा द्वेष करू नये, असे मला वाटते. माझी भूमिका समजून घेण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या. ब्लॉगचे नाव आहे : सर्वसमाज. तसेच ब्लॉगची लिन्क आहे : http://sarvsamaj.blogspot.in/

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान...
      समाजात तेढ वाढवण्यापेक्षा हे असे प्रबोधन कधीही चांगले...

      Delete
  2. muthbhar bramhanani mothya bahujan samajas gulam kele mhanun bramhan sresht navhe tar, vishwasghatki, kapati, dongi ahe ata bahujananchi bari ahe...vachava kiti vachvta bramhananna....

    ReplyDelete
  3. द्वेषाने प्रगती साधता येणे कधीच शक्य नाही, त्यामुळे एका समाजाने दुसऱ्या समाजाबाबत पुर्वग्रह दुषित ठेवणे किंवा मनात द्वेष बाळगणे, हि त्या समाजाच्या विकासाला बसलेली एक प्रकारची खिल म्हणवी लागेल, वरील लेखातून एकच मुद्दा पटतो तो म्हणजे, "द्वेष" मनात बाळगून पुढे जाता येणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेखकाचे मागील काही लिखाण वाचून असे वाटते कि, "लेखकाला देखील "बहुजन फोबिया" निश्चीतच झालेला असावा......!

    ReplyDelete
  4. Bahujan hi sankaplana kharach astitvat ahe ka nahi yachach pahila sodh ghetala pahije. Bajujan hech mulat brahmanwadas khat pani karat astat.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week