सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, April 12, 2011

आण्णांचा बालीशपणा

-महावीर सांगलीकर



आण्णा हजारे यांना गल्लीत फारसे यश मिळाले नाही पण दिल्लीत मात्र त्यांनी भलतेच यश पदरी पाडून घेतले. अगदी दुसरे गांधी वगैरे पदवीही मिळवली. आण्णांच्या या यशामागे ते स्वत: नसून अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि इतर अनेक दिग्गज तर आहेतच, पण राष्ट्रीय मेडीया आणि एकूणच भ्रष्ट वातावरण या गोष्टीही आहेत.

आण्णांच्या बोलण्या-वागण्यातून त्यांची वैचारिक परिपक्वता दिसत नाही. त्यामुळे ते भ्रष्टाचाराबद्दल बोलताना एखाद्या व्यक्तीस टार्गेट करताना दिसतात, पण त्याचवेळी धर्मांध, जातीवादी पक्षांच्या नेत्यांना स्टेजवर बोलावून जवळ बसवून घेतात. ज्या नरेंद्र मोदींची आण्णा हजारे यांनी स्तुती केली त्यांचे गुजरात राज्य भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. शिवाय नरसंहार करणारा माणूस भ्रष्टाचारी माणसापेक्षा कधीही धोकादायक असतो हे आण्णा हजारे यांना कळत नाही.

आण्णा हजारे यांच्यावर हिंदुत्वाचा स्पष्ट पगडा दिसतो. त्यामुळेच ते भ्रष्ट आणि भोंदू हिंदू साधूंना देखील जवळ करतात.

आण्णा हजारे यांना जवळून ज्यांनी बघितले आहे त्यांना त्यांचा वैचारिक बालीशपणा चांगलाच माहित आहे.

भ्रष्टाचार हा भारतातील एकमेव आणि सर्वात मोठा प्रश्न नाही. मुळात सगळेच भारतीय कमी जास्त प्रमाणात भ्रष्ट मानसिकतेचे आहेत. खुद्द आण्णा हजारे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

भ्रष्टाचार हा केवळ आर्थिकच असतो असा आण्णांचा समज आहे असे वाटते. त्यामुळे ते अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू साधू, देव-धर्माच्या नावावर चालणारा भ्रष्टाचार, समाजातील जातीवाद, ब्राम्हणवाद, दलितांवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचार याबद्दल कांहीच बोलत नाहीत. आण्णांना बडव्यांचा भ्रष्टाचार कसा काय दिसत नाही?

आण्णांच्या राळेगणसिद्धीत दलितांची काय परिस्थिती आहे? आण्णा त्यांना आपल्या आंदोलनात सहभागी करून घेतात का? महिला आरक्षणाबद्दल आण्णा का बोलत नाहीत?सरकारी पैसे देव आणि धर्म यांच्यावर उधळले जात आहेत त्याचे काय? ही सगळी भ्रष्ट आचाराचीच रूपे नाहीत काय?

आण्णा हजारे यांच्या बोलण्यात भगतसिंग, १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध यांचा उल्लेख परत-परत होत असतो. आण्णा भारतीय सैन्यात ड्रायव्हर होते व त्यावेळी झालेली छोटी जखम ते अधून मधून परत परत लोकांना अभिमानाने दाखवत असतात. शिवाय सध्या अनपेक्षितपणे मिळणारी प्रसिद्धी ते एन्जॉय करत आहेत असे दिसते. हा सगळा प्रकार आण्णांचा बालीशपणा दाखवतो.अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याने आण्णांचा हा बालीशपणा त्यांना दाखवून द्यायला पाहिजे.


हेही पहा:

आण्णा का असली चेहरा (Hindi Vidio)


7 comments:

  1. agadi barobar anna kharech balish aahet.Nahiter lokpal vidheyak samitit tyani swtaha sathi aagrah kela nasata.dusare ase ki aapale pantpradhan kharech sadhe aahet nahitar tyani tyanchi hi magani kadhich manya keli nasti.

    ReplyDelete
  2. अण्णांनी धार्मिक भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन सुरु करावे.म्हणजे काय करावे तर पंढरपुरात वारकरी व विठ्ठल मुक्तीसाठी " बडवे हटावो " आंदोलन सुरु करावे. अन्ना
    आप आगे बढो हम आपके साथ हये ....

    ReplyDelete
  3. ह्या वैचारिक बालिश व्यक्ति मुळे जर आमच्यासारख्या वैचारिक परिपक्व लोकांना 'माहितीचा अधिकार' मिळत असेल तर काय फरक पडतो ...................

    ReplyDelete
  4. Anna chya balishpana mule Bharatat futichi bije peralya gelit.Deshachya bhavi pidhya Anna laa kadhich maaf karnaar nahit.

    ReplyDelete
  5. tumhi janmala ghatleli mul jar wait wagat asatil tar tyana tumhi swatah samajawanar, laksh denar ki shejaryala sangnar....sagalyat jast tumhi ch tyana sambhalu shakata...tasach anna jar samitit asatil tar bakichi sadasya wait aganar nahi ani ek wajan rahil sagalynchyavar

    ReplyDelete
  6. आंबेडकरी अनुयायी.

    अण्णा तुमच काय चाललयं
    ते खरचं कळत नाही.
    अर्धवट ज्ञानाने प्रतिक्रिया देता
    त्यातुन काही मिळत नाही.

    कधी म्हणताय सचिनला भारतरत्न द्या
    तर कधी म्हणताय "एक ही मारा?"
    मग तपासुन पहावे लागेल
    तुमच्यातला गांधीवाद किती खरा

    भारतरत्न का देतात
    हे तरी माहीत आहे का तुम्हाला?
    ऊग़ाच आपली उचलली जीभ
    आणि लावली टाळ्याला.

    म्हातारपणामुळे तुम्ही गांधीवादही विसरलात.
    असं आता राष्ट्रवाद्यांना वाटतयं
    महात्मा फ़क्त धुरळा उडवतात
    हे बाबासाहेबांच म्हणनं पटतयं

    उगाच चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देवु नका
    नाहीतर काही खरं नाही
    गांधीवादाची परिक्षा पास होण्यासाठी
    दुसरा गाल पुढं करणं माझ्या मते बरं नाही

    जरा बुध्दविचार आणि आंबेडकरवादाचा अभ्यास करा
    भ्रष्टाचार संपलाच पाहीजे
    पण त्यासाठी उपोषण करणारा
    अर्धवट महात्मा नाही पुरा

    अनावश्यक आसक्ती आणि भ्रष्ट्राचार संपवण्यासाठी,
    बुद्धाच्या पंचशीला शिवाय पर्याय नाही
    लोकशाही बळकट करण्यासाठी
    व्हा खरे आंबेडकरी अनुयायी.

    ----कवी प्रशांत गंगावणे
    (.."प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहाचे कवी )

    ReplyDelete
  7. 1 vyktikadun kiti aapeksha?

    aannana tyanch kam tyanchya padhtin karu dya!

    ani baki samtesasthi ladhai chaluch ahe ki!

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week