-महावीर सांगलीकर
मुस्लिमांनी अनेक हिन्दू मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा उर्फ वैदिकांचा एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत असतात.
मुस्लिमांनी काय केले हे आपण थोड़ा वेळ बाजूला ठेवू. पण खुद्द वैदिकांनी भारतातील अनेक जैन व बौद्ध गुफा, लेणी, मंदिरे चक्क बळकावली व त्यांचे हिन्दूकरण केले या विषयाची चर्चा होणे फार गरजेचे आहे.
भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला सगळ्यात जूने अवशेष हे जैन किंवा बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात. खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत, ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत. याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.
लेण्याद्री या बौद्ध लेण्यात आता गणपती घुसला आहे
फोटो : विकी
पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर मूळ जैन किंवा बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत. इतकेच नव्हे तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर हे मूळ पद्मावती देवीचे जैन मंदिर होते ही गोष्ट तुम्हाला कोणताही निष्पक्ष इतिहासकार सांगू शकेल. तुम्ही स्वत: कोल्हापूरला या मंदिरात गेलात आणि मंदिरातील शिल्पांचे बारकाईने निरीक्षण केलेत तर तुम्हालाही हे जैन मंदिर होते हे सहज समजू शकेल. तेथे असलेल्या जैन खाणा-खुणा बुजवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, ही गोष्ट हे जैन मंदिर होते असेच सिद्ध करते.
महाराष्ट्रातीलाच सातारा जिल्ह्यातील फलटन येथे जबरेश्वराचे मंदिर आहे. ते आधी जैन मंदिर होते हे तुम्ही स्वत: ओळखु शकता.
अशा कनव्हरटेड मंदिरांची संख्या शेकडोंनी आहे. आज हिन्दू मंदिरे म्हणून ओळखल्या जाणा-या कांही प्रसिद्द मंदिरांमध्ये जगन्नाथपुरी (ओरिसा, हे मूळ जैन मदिर होते व ते जैन धर्माचे यादवकुलीन तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते), तिरुपती बालाजी (आंध्रा प्रदेश, हे देखील मूळ जैन मदिर होते व ते तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते) व बद्रीनाथ (उत्तरांचल, हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर रु षभ यांचे मंदिर होते, आता ते शिव मंदिर आहे) ही मंदिरे आहेत.
बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील ब्राम्हणांच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तयार नाहीत.
बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे जैन मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, त्यांनाही तेथे जैन अवशेषच सापडले!
जैन व बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.
पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही पांडव लेणी पांडवांनी एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या मूळच्या जैन/बौद्ध लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.
हेही वाचा:
प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता?
महावीर- गौतम बुद्ध आधी कोण होते?
वेद आणि वेदांत: वैदिकांची बनवेगिरी
वैदिक धर्म जिवंत आहे का?
हेही वाचा:
प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता?
महावीर- गौतम बुद्ध आधी कोण होते?
वेद आणि वेदांत: वैदिकांची बनवेगिरी
वैदिक धर्म जिवंत आहे का?


Very interesting & eye-opening topic-Ram janmabhume-Babrimasjid -khup charcha zali,Aata hya navin Topicwar charchya zalich pahije. from both side !!
ReplyDeleteजग्गन्नाथ पुरी , तिरुपती बालाजी आणि महलक्ष्मि मंदिरे हि जैन नसून बौद्ध विहार होती.
ReplyDeleteस्वामी विवेकानंदानी सुद्धा हे सांगितले आहे कि जगन्नाथ पुरी मंदिर हे बुद्ध मंदिर होते.
ReplyDeletevery nice
ReplyDeletebalaji must be a jain temple cos offering tremendous of money is only possible to successful merchants which can be majorly found in jain citizens of india..
ReplyDeleteमराठी संतांनी अनेकदा विठोबाला बुद्ध वा बौद्ध म्हणून संबोधिले आहे. उदा., संत जनाबाईने तिच्या एका अभंगात असे म्हटले आहे, की कृष्णावतारी कंसवध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे. विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे, असे एकनाथांनी आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हटले आहे. विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे. अशी संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठोबाचे (रूक्मिणीसह वा तिच्यावाचून) चित्र दाखविलेले दिसते आणि त्या चित्रावर ‘बुद्ध’ असेही छापलेले आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशवमंदिरात कोरलेल्या दशावतांरांत बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे जाणवते. संतांनी विठ्ठलाला बुद्ध मानले याचे कारण बुद्धाची करुणा आणि त्या करणेचे त्यांना वाटत असलेले महत्त्व, हे आहे, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. बुद्धीचीच करूणाधारा विठ्ठलभक्तीच्या रूपाने संतांनी महाराष्ट्रात वाहती ठेवली.
ReplyDeleteविठोबा हे जैनांचे दैवत आहे, असा जैनांचा दावा अठराव्या शतकापर्यंत तरा होता, असे दिसते. मराठी संतांनी मात्र विठ्ठलाला अनेकदा बुद्ध म्हणून संबोधिले असले, तरी जिन म्हणून कधीही संबोधिलेले नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले ह्यांनी त्यांच्या भरतखंडाच्या अर्वाचीन कोशात एका जैन पंडिताने जैन तीर्थंकर नेमिनाथाच्या स्थापन केलेल्या मूर्तीचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक एका जैन ग्रंथातून उदधृत केले आहेत (हा ग्रंथ कोणता ह्याचा निर्देश त्यांनी केलेला नाही) व ते वर्णन पंढरपूर येथील विठोबाच्या मूर्तीशी जुळते असे त्यांनी म्हटले आहे. कृष्ण आणि नेमिनाथ ह्यांचा संबंध जैन परंपरेत जवळचा मानला गेला आहे. दोघेही यदुवंशीय असून चुलतभाऊ होते. असे ही परंपरा सांगते, त्यामुळे ज्याला कृष्णाचे बालरूप मानले जाते, त्या विठोबात जैनांनी नेमिनाथांना पाहिले असणे शक्य आहे.