-महावीर सांगलीकर
पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला भारत सरकार उगीचच पोसत आहे, तो सरकारचा जावई आहे, त्याला गोळ्या घालायला पाहिजेत असा विचार अनेकजन बोलून दाखवत असतात. असे बोलणा-यांमध्ये देशभक्तीचा ठेका घेतलेले महान मध्यमवर्गीय आघाडीवर असतात. पण या लोकाना ही साधी गोष्ट कळत नाही की एखाद्या गुन्हेगारास फासावर चढवण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाकडून पक्की झाल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होवू शकत नाही.
जर कसाबला जागीच गोळ्या घातल्या असत्या तर त्याचे करवते धनी कोण आहेत हे कळणे अवघड होवून बसले असते. कसाब जिवंत राहिल्यामुळे सरकारला पाकिस्तानाच्या हाताचे अनेक पुरावे मिळू शकले. कसाबच्या सुरक्षेसाठी कोठ्यावधी रुपये खर्च झाले म्हणून जे ओरड करतात त्यांच्या हे लक्षात येत नाही, की हा खर्च कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी झाला आहे.
आपल्या येथील कायदेशीर प्रक्रियेत दिरंगाई होत असते. पण
त्याला इलाज नाही, कारण जशी जनता तशी त्यांना सिस्टीम मिळते. बहुतांश भारतीय हे
आळशी, भ्रष्ट आणि प्रत्येक गोष्टीचा वरवर विचार करणारे किंवा अजिबात विचार न करणारे
आहेत. आपले सरकार, पुढारी, पोलीस, प्रशासन हे आपल्याच रक्ताच्या लोकांचे आहे.
प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे की आपण आपली स्वत:ची कामे किती वेळेवर करतो.
भारतात जो दहशतवाद आहे तो हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद पाडल्यापासून सुरू झाला आहे. ही हिंदुत्ववाद्यांच्या कर्माचीच फळे आहेत. पण ती आपल्या सर्वांना भोगायला लागत आहेत.
ज्या लोकांना सध्याचे सरकार मूर्ख वाटते त्यांनी भा.ज.प.च्या राज्यात संसदेवर हल्ला झाला त्यावेळी त्या सरकारने काय दिवे लावले हे आठवून पहावे.
खरे म्हणजे ज्यांच्या राज्यात संसदेवर हल्ला होतो, ज्या सरकारचा खुद्द परराष्ट्र मंत्री तुरुंगातील अतिरेक्याना अफगाणीस्थानात सोडून येतो, ज्या सरकारच्या काळात पाकिस्तानी सैनिक अतिरेकी बनून काश्मिरातील अनेक टेकड्या काबीज करते आणि त्यावेळी त्या सरकारचे महान प्रधान मंत्री नेहमीप्रमाणे झोपलेले असतात,त्याच्याएवढे नालायक सरकार भारतात आज पर्यंत झाले नाही. पण हिंदुत्ववाद्यांना तेच सरकार महान वाटत असते.

आपला तो बाळया... दुसरे काय?
ज्या सरकारच्या निष्काळजी पनामुळे पाकिस्तानी सैनिकानी अतिरेकी बनून काश्मिरातील अनेक टेकड्या काबीज केल्या. ह्या निष्काळजी पनामुळे भारताला कारगील युद्धास विनाकारण सामारे जावे लागले. त्यात अनेक सेनिकाना शहीद व्हावे लागले त्या बीजेपी सरकार बद्दल हि हिंदुत्ववादी मंडळी कधीहि बोलताना दिसत नाही.
ReplyDeleteभारतात जो दहशतवाद आहे तो हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद पाडल्यापासून सुरू झाला आहे. ही हिंदुत्ववाद्यांच्या कर्माचीच फळे आहेत. पण ती आपल्या सर्वांना भोगायला लागत आहेत.
ReplyDeletehttp://torrents.thepiratebay.org/5563096/Ram_Ke_Naam__In_the_Name_of_God__India__1991.5563096.TPB.torrent
Please check this link this is an eye opening documentary about how they demolish babari