सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Thursday, July 26, 2012

गर्व से कहो हम शूद्र हैं .........

-महावीर सांगलीकर

भारतात एक काळ असा होता की येथील प्रत्येक जात समूहाचे लोक स्वत:ला क्षत्रिय किंवा ब्राम्हण म्हणवून घेण्यात धन्यता मानत. ज्यांच्या सात पिढ्यात कोणी शस्त्र हाती घेतले नाही ते स्वत:ला मोठ्या अभिमानाने क्षत्रिय म्हणवून घेत. तसाच प्रकार स्वत:ला ब्राम्हण म्हणवून घेणा-या कांही जमातींचा. त्यांच्या सात पिढ्यात कोणी शास्त्र हाती घेतले नाही. क्षत्रिय किंवा ब्राम्हण म्हणवून घेतल्याने छाती फुगत असेल तर आपण ते नसतानाही ते आहोत हे समजण्यात मानसिक समाधान होते.

पण मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली आणि अनेक जाती समूह स्वत:ला शूद्र मानायला लागले. भल्या भल्या क्षत्रिय जातींना आपण क्षत्रिय नसून शूद्र आहोत याचा साक्षात्कार होवू लागला. स्वत:ला अमुक-तमुक ब्राम्हण म्हणवून घेणारे जातसमूह गळ्यात जानवे घालून आपल्या जातीला शूद्र कसे ठरवता येईल याचा शास्त्राधार शोधू लागले. हा सगळा खटाटोप केवळ आपल्या जातीला सरकारी आरक्षण मिळावे या एकाच उद्देशाने केला गेला, केला जात आहे.

स्वार्थासाठी, 'जातीसाठी माती खावी' या उक्तीला जागण्यासाठी, कोणी स्वत:ला काय म्हणवून घेतात याचा फारसा विचार करण्याची गरज नाही, पण या स्वार्थामागे ज्या लबाड्या आहेत, जे ढोंग आहे त्याचा पर्दाफाश तर झालाच पाहिजे.

बामसेफी विचारवंत स्वत:ला क्षत्रिय म्हणवून घेणा-यांना शूद्र ठरवण्यात आघाडीवर असतात. क्षत्रिय म्हणवून घेणे म्हणजे वर्णव्यवस्थेचे समर्थन करणे असा त्यांचा दावा आहे. असे असेल तर मग स्वत:ला शूद्र म्हणवून घेणे हेदेखील वर्णव्यवस्थेचे समर्थन ठरते. शिवाय स्वत: तथागत गौतम बुद्ध यांना आपण क्षत्रिय आहोत याचा, तेही शाक्य क्षत्रिय असण्याचा प्रचंड अभिमान होता. मग त्यांच्यासाठी बामसेफी विचारवंत कोणता न्याय लावतात? अर्थातच तो विषय काढायचा नाही असेच त्यांचे धोरण असतात.

स्वत:ला ब्राम्हण काय किंवा क्षत्रिय काय, वैश्य काय किंवा शूद्र काय, असे म्हणवून घेणे चुकीचेच आहे. पण यातही गम्मत अशी आहे की जे लोक स्वत:ला क्षत्रिय किंवा ब्राम्हण अभिमानाने म्हणवून घेतात, त्यांच्यात एक प्रकारे आत्मविश्वास तयार होतो. त्याचा त्यांना फायदाही होतो. या उलट जे लोक स्वत:ला शूद्र म्हणवून घेतात त्यांच्या मनात न्यूनगंडाशिवाय दुसरे कांहीच तयार होवू शकत नाही.

जे लोक वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या दोन्ही गोष्टींच्या विरोधात सकाळ-संध्याकाळ कोकलत असतात, त्यांनी या गोष्टी कशा भक्कम होतील हेच पाहिले आहे. आता हे लोक 'बहुजन' असल्याने त्यांची संख्या लई मोठी. त्यामुळे बहुजन समाजातून वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या गोष्टी नष्ट होतील, अशी स्वप्ने बघणे सोडूनच दिले पाहिजे. या गोष्टी केवळ अभिजन समाजातूनच नष्ट होवू शकतात, किंबहुना ब-यापैकी नष्ट झालेल्याही आहेत.

शिवाय भारतात जोवर जातीआधारीत आरक्षण आहे, तोवर जाती नष्ट होणे शक्य नाही. आता असे आरक्षण बहुजन समाजातील जातींच्या आवडीचा विषय आहे, अभिजन समाजाला आरक्षणाची गरजही नाही आणि आवडही नाही.

आजवरचा भारताचा इतिहास पाहिला तर तो ज्यांना आरक्षण नव्हते अशा अभिजनांनी घडवला आहे. मग ते बुद्ध-महावीर असतील, छ. शिवाजी महाराज असतील किंवा गांधी-बोस असतील. त्यामुळे इतर लोक फक्त 'गर्व से कहो हम शूद्र हैं' असेच म्हणत रहाणार आहेत.

हेही वाचा:
अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद
आर.एस.एस. आणि बामसेफ: एकाच नाण्याच्या दोन बाजू
मी बहुजनवादापासून दूर का झालो?

3 comments:

  1. Mr. Sanglikar,
    Caste is a reality in India. In India even Hindu does not marry with another Hindu. Marriages had been within caste. Indian marriages system kept this caste system alive.
    They do not let them forget this inhuman practice. At marriage time parents suddenly become conscious of caste ! this consciousness is fueled internet and matrimonial sites. They proudly write name of caste in your profile, privileged castes feel pride in reading brahmin/rajput but other lower castes are branded as chamar/nai/dhobi which is derogatory. It violates their right to dignity and equality. Similarly internet if full of caste literature, which is lower caste, which is upper caste, what are the surnames they use, their demographic distribution.
    You can not blame reservation system.
    Reservation has started last few tens of years. Before that it was not there. How much progress we had made in the past? In fact we had been ruled by British, Portuguese etc more than 150+ years.

    ReplyDelete
  2. Mahavirsaheb,
    jatiy vyavastha evadhi aplyawar hami ahe ki. Apan tyachyapalikade vichar karuch shakat nahi. Apyalat aplyat bhandanche mul suddha hi jatiy vyavastha ahe. He hajaro varshapasun ahe. Jatimul reservation ale ahe. Reservation mule jat nahi. Jata jat nahi. Kevadhe he shdhyantra ahe. Apan matra ek mekache une dune kadhat baslo ahot.
    Ti matra aplya sarvanchi maja bhagat ahe.

    ReplyDelete
  3. buddha he shkatriya mhanun garv karat hote he chukiche watate.kuthala purava asalyas sangava.

    ulat eka veli te eka samuhala mhanale hote ki mihi tumachyasarka shetkarich ahe. arthatach te tya lokana nit samjave mhanun udhahar det hote va tehi tyanchapramanech manave aahet he sangayacha prayant karat hote.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week