-महावीर सांगलीकर
आपल्या मनातील राग, द्वेष, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी माणसाला एखाद्या जिवंत अथवा मयत व्यक्तीची गरज असते. जिवंत व्यक्तिमध्ये आई, बाप, बायको, नवरा, मुलगा, भाऊ, बहिण, मित्र वगैरे ही गरज पूर्ण करतात. त्यानंतर नंबर येतो तो राजकारण्यांचा. कुठल्या तरी राजकीय पक्षाला 'देशाचा' शत्रू मानून त्या पक्षाच्या एखाद्या किंवा सगळ्या नेत्यांना शिव्या देत बसणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो. पण हा उद्योग आजूबाजूला त्या पक्षाचे कोणी नाही हे पाहूनच केला जातो. सार्वजनिक ठिकाणी तर फारच जपून बोलले जाते. त्या पक्षाचा गल्ली-बोळातला एखादा किरकोळ कार्यकर्ता जरी तिकडे आला तर हे लोक त्याला अगदी लवून नमस्कार करतात.
राग व्यक्त करण्यासाठी मयत व्यक्तींमध्ये आपल्या येथे सगळ्यात जास्त लोकांकडून महात्मा गांधी यांना निवडले गेले आहे. यामागे या लोकांची भेकड मानसिकता हेच कारण आहे. भेकडांचे हिरो शस्त्रधारी क्रांतीकारक असतात. भेकडांना हिंसेचे टोकाचे आकर्षण असते, ते त्या क्रांतीकारकांच्या तत्वज्ञानामुळे नव्हे, तर त्यांच्याकडील शस्त्रांमुळे आलेले असते. (तसे नसते तर भगतसिंगाचे भक्त कम्युनिस्ट आणि नास्तिक विचारसरणीचे झाले असते, सुभाष बाबूंचे भक्त हिंदू-मुस्लीम एकतेचे समर्थक झाले असते आणि सावरकरभक्त विज्ञानवादी आणि गोमांस खाण्याचे समर्थन करणारे झाले असते). मयत क्रांतीकारकांकडील शस्त्रेदेखील भेकडांच्या सुप्त मनातून खुणवत असतात. याउलट गांधी हे निशस्त्र. त्यांच्याकडून कसली आली आहे भीती? त्यांचे जिवंत अनुयायीही मवाळ धोरण असणारे. तोड-फोड, नास-धूस, हिंसा असल्या गोष्टींपासून दूर रहाणारे. त्यामुळे त्यांचीही भीती बाळगण्याचे कांहीच कारण नाही. त्यामुळे कुणाला तरी शिव्या घालण्याची आपली गरज पूर्ण करण्यासाठी गांधी ही सगळ्यात बिनधोक व्यक्ती आहे. शिवाय एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण शिव्या देवू शकतो याचे त्यांना मिळणारे समाधान कांही औरच.
गांधी विरोधकांच्या पथ्यावर पडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गांधीजींची जात. गांधीजी जर मराठा, रजपुत, जाट, पटेल, अशा एखाद्या मोठ्या जातीत जन्माला आले असते तर या विरोधकांची पंचाईतच झाली असती.
गांधीजींच्या बेताल विरोधकांचे शारीरिक आणि मानसिक वय तुम्ही स्वत: तपासून पाहू शकता. ते नेहमी कमीच असते. तरुण वयात हिंसेचे जबरदस्त आकर्षण असते. या वयात मानसिक परिपक्वता आलेली नसते. जस जसे वय वाढते, तस तसे हिंसेचे आकर्षण कमी होत जाते. त्यांचे हिरोही बदलतात, किंवा हिरोंची गरज संपते. अनेकांना गांधी कळायला लागतो, कळला नाही तरी ते गांधी विरोध सोडून देतात. पण तोपर्यंत व्हायचे ते नुकसान झालेलेच असते.
सध्या गांधी विरोधक असणारे सगळ्यात मोठे समूह म्हणजे हिंदुत्ववादी आणि आंबेडकरवादी. त्यात अलीकडे संभाजी ब्रिगेडवाल्यांची भर पडली आहे. पण या तिन्ही समूहातील विचारी आणि परिपक्व लोक गांधीजींची निंदा-नालस्ती करत नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
नेमकी मीमांसा. सुंदर!
ReplyDeleteइस बारे में ऐडम्स ने स्वीकार किया है कि यह किताब विवाद से घिरेगी। उन्होंने कहा, “मैं जानता हूं इस एक किताब को पढ़कर भारत के लोग मुझसे नाराज़ हो सकते हैं लेकिन जब मेरी किताब का लंदन विश्वविद्यालय में विमोचन हुआ तो तमाम भारतीय छात्रों ने मेरे प्रयास की सराहना की, मुझे बधाई दी।” 288 पेज की करीब आठ सौ रुपए मूल्य की यह किताब जल्द ही भारतीय बाज़ार में उपलब्ध होगी। 'गांधीः नैक्ड ऐंबिशन' का लंदन यूनिवर्सिटी में विमोचन हो चुका है। किताब में गांधी की जीवन की तक़रीबन हर अहम घटना को समाहित करने की कोशिश की गई है। जैड ऐडम्स ने गांधी के महाव्यक्तित्व को महिमामंडित करने की पूरी कोशिश की है। हालांकि उनके सेक्स-जीवन की इस तरह व्याख्या की है कि गांधीवादियों और कांग्रेसियों को इस पर सख़्त ऐतराज़ हो सकता है।
ReplyDeleteलेखक हरिगोविंद विश्वकर्मा वरिष्ठ पत्रकार हैं. इस लेख का स्रोत ब्रिटिश अख़बारों में “गांधीः नैक्ड ऐंबिशन” के छपे रिव्यू और रिपोर्ताज हैं.
छान लेख......पोस्ट केला FB वर
ReplyDelete