-महावीर सांगलीकर
गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाने आपल्या कुजबूज मोहिमेतून आणि मराठा मतदारांना SMS पाठवून जातीय द्वेष पसरवण्याचा उद्योग केला होता. खानदेशात 'द्या टाळी हाकला माळी', मराठवाड्यात 'वाजवा तुतारी हाकला वंजारी' आणि दक्षिण महाराष्ट्रात 'भगवा पाहिजे का नागवा पाहिजे' असे SMS मोठ्या प्रमाणावर पाठवले गेले.
शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नेहमी 'फुले-शाहू-आंबेडकर' या नावांचा जप करणारे शरद पवार यांनी नुकतेच आपले जातीयवादी रूप दाखवले. त्यांनी उस आंदोलन करणा-या राजू शेट्टी या शेतकरी नेत्याची जात काढण्याचा उद्योग केला. त्यांच्या या उद्योगाचा सगळीकडे प्रचंड निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी शरद पवारांचे पुतळे जाळण्यात आले. कांही ठिकाणी त्यांना चपलांचा हार घालण्यात आला. पूर्वी त्यांनी दुसरे एक शेतकरी नेते शरद जोशी यांचीही जात काढली होती. त्यावेळी पवारांचा फारसा निषेध झाला नव्हता, पण आत्ताचे त्यांचे विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
राष्ट्रवादी पक्ष पश्चिम महाराष्ट्रात बलशाली आहे, आणि नेमका याच भागात या पक्षाच्या जातीयवादी राजकारणास उत आला आहे. याच पक्षाचे एक मंत्री जयंत पाटील यांच्यावरही जातीयवादाचे आरोप होत आले आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या या जातीयवादी उद्योगामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज उगीचच बदनाम होत आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. ब्राम्हण समाज मराठ्यांपासून पूर्वीच दूर गेला आहे, पण राष्ट्रवादी पक्षामुळे आता उरलेले सगळेच समाज मराठा समाजापासून दूर होत चालले आहेत. त्यात माळी, धनगर, वंजारी असे मोठे समाज तर आहेतच, पण आता दलित समाजानेही मराठ्यांपासून फारकत घेतली आहे. लिंगायत, जैन, भटके-विमुक्त, आदिवासी, बलुतेदार हेही मराठा समाजापासून तुटत चालले आहेत. मराठा समाजाच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. 'सगळ्यांना सांभाळून घेणारा' अशी मराठा समाजची प्रतिमा नष्ट होत चालली आहे, आणि 'जातीयवादी समाज' ही प्रतिमा या तिची जागा घेत आहे.
खरे म्हणजे मराठा समाजाने राष्ट्रवादी पक्षाबद्दल कसलीही आपुलकी बाळगण्याचे कारण नाही. कांही ठराविक धनदांडगी घराणी म्हणजे संपूर्ण मराठा समाज नव्हे. या पक्षात सामान्य मराठा समाजाला कसलेही स्थान नाही. या पक्षाने मराठा समाजातील सामान्य लोकांच्या भल्यासाठी आजपर्यंत कसलेही काम केले नाही, त्यांचा उपयोग फक्त मते मिळवण्यासाठीच केला आहे.
त्यामुळे मराठा समाजाने आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देणे आवश्यक आहे. शेतकरी मराठ्यांची पावले त्या दिशेने पडत आहेत हे एक चांगले चिन्ह आहे. शेतक-यांना अनेक गोष्टी लवकर कळतात, इतरांना त्या कळायला ब-याचदा उशीर लागतो, हेच यावरून दिसून येते. तसेही राष्ट्रवादी पक्ष हे एक बुडते जहाज आहे, आणि या बुडत्या जहाजावरच रहाण्यात कांही अर्थ नाही.
हेही वाचा:
मराठ्यांची चार शक्तिस्थळे
शरद पवारांचे संघटन हे कायमच जातींची सांगड घालून केलेले आहे. ते कायम फुले शाहू आंबेडकरांचा जप करतात पण आपण दिलेल्या उदाहरणांवरुण त्यांचा जातीयतेकड़ चा काळ दिसतो असेच मला वाटते. परत त्यांचा संभाजी बी-ग्रेडला असलेला पाठींबा, आणि छुपे मार्गदर्शन हे तर अतिशय जातीयवादी आहे. त्यांचे बंधू (प्रतापराव) आणि पुतण्या (अजित) दोघांनाही जातीयवादी टिप्पण्या केलेल्या आहेत. त्यामुळे पवारांचे खायचे दात आता दिसायला लागले आहेत असेच म्हणावे वाटते.
ReplyDelete- कोहम
जैन समाजातील शेट्टी च्या जातीय राजकारणा वर बोट ठेवल्या वरच सांगलीकरांना राष्ट्रवादी जातीय आहे अशी प्रचीती का बरं यावी हे सांगायची वेगळी गरज नाही..जसे आज काल एक फंडा आहे जाती जाती ला पकडून लिखाण करायचे..आणि त्या त्या जातीतल्या नेत्याला धरून राहायचे मग हळू हळू त्या नेत्याचीच इमेज जपण्या साठी लेखनी झीजवायची ... हरी भाऊ नरके सर आले..सुरवातीला "बहुजन"..फुले शाहू आंबेडकर ..मग कालांतराने obc....फक्त फुले आंबेडकर चळवळ..आणि भुजबळ...सांगलीकरांचे मार्गक्रमण अगदी तसेच चालू असलेले दिसतेय...
ReplyDeleteकाही वाईट नाही..ज्या त्या जातीचे नेतृत्व ज्या त्या जातीतच तयार होतांना दिसू लागलेले आहे..चांगली गोष्ट आहे..पण जैनांनी जातीचे समीकरण केले तर चालते.माळी , वंजारी..ब्राह्मण इतर सगळ्या जातींनी जात बघून समीकरणे जुळवली तर ती चालतात..पण तेच मराठ्यांनी केले की काही कावळ्यांच्या पोटात का दुखू लागते..??? त्यांना माहीत आहे कि मराठयां मध्ये भांडणे लावल्या शिवाय आपल्या पोळ्या भाजल्या जाऊ शकत नाहीत...
सांगलीकर साहेब तुम्ही हवे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील जैनीज्म वर संशोधन करा..पण उगाच मराठ्यांना काय करायला हवे आणि काय नाही ह्यावरसल्ले द्या..स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून हे बरे नाही...
पाश्चिम महाराष्ट्रात निव्वळ जैन जातीच्या समीकरणा वर शेट्टी निवडून येऊ शकत नाहीत बहुसंख्य मराठा समाजाला शेतीच्या नावा खाली गुंडाळून स्वतःचे राजकीय बस्तान बसवण्याची मनीशा आत्ता लपून राहिलेली नाही...शेट्टीला निवडून देतांना जे जैन समाजाने जातीचे राजकारण केले ते सांगलीकरांना चालणार...आणि पवारांनी केले कि पोटात दुखणार..एकतर तुम्ही करा दुसऱ्यांनाही करू द्या..नाहीतर तुम्ही थांबवा मग दुसऱ्यांना बोला ...
tyanchi mulagi Sadanand Sule ya Brahmanala dili aahe. Sharad pawaranchi bayako Dhangar samajyachi aahe. Sharad pawar ha hybrid aahe.
ReplyDeleteसर तुम्ही अत्यंत महत्वाचा विषय मांडला आहे.सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये , समाजकारणात तसेच प्रशासनात या परकराचा जातीयवाद प्रभावीपणे दिसून येतो.काही वर्षापूर्वी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद होता ,त्यानंतर ब्राम्हण मराठा वाद महाराष्ट्राने अनुभवला .मात्र या वादाचा अक्ष बदलून तो मराठा मराठेतर (प्रमुखाने वंजारी,माळी )असा झाला आहे .
ReplyDeleteकुळवाडी---- शरद पवार आणि त्यांचा पक्ष एकट्या मराठ्यांच्या बळावर निवडून येतो असे तुम्हाला वाटते काय? ते विसरा. मराठे हे संख्येने २०% पण नाहीत. त्यांची दादागिरी आता जास्त दिवस चालणार नाही. यापुढे महाराष्ट्राची सत्ता ख-या बहुजनांकडे जाणार आहे. तोपर्यंत सत्ताधारी मराठ्यांनी जेवढे मिळवता येईल तेवढे मिळवून घ्यावे, उद्योग-धंदे करायला ते उपयोगी पडेल.
ReplyDeleteखरे बहुजन म्हणजे नेमके कोण बरे?
ReplyDeleteज्यांच्यात आजही आंतरजातीय विवाह होत नाही ते?
स्वत:च्या समाजाला आधार देण्यापेक्षा स्वत:च्या मुलामुलींना, पुतण्यांना आणि भाच्यांना आधार देण्यात ज्यांची राजकीय कारकीर्द खर्ची पडते ते? जे आजही स्वत:ला वरचे आणि इतरांना खालचे ठरवण्यात मग्न असतात ते?
दलितांवर अत्याचार होतांना जे मूकपणे पाहत राहतात ते?
खरे म्हणजे इथे कोणालाही बहुजन म्हणवून घेण्याची हौस नाही. सत्तेसाठी "आम्ही सारे बहुजन" आणि लग्न ठरवतांना मात्र "आम्ही वरचे आणि तुम्ही खालचे?" असे का बरे? मग हेच जर मराठ्यांनी केले तर तेच तेवढे दोषी कसे?
I suggest inter-caste marriage as the remedy to destroy caste.
ReplyDelete