सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, March 9, 2011

सावरकरांचा ब्राम्हणवाद

-महावीर सांगलीकर


वि.दा सावरकर यांना कट्टर हिंदु्त्ववादी म्हणून ओळखण्यात येते. इतकेच नव्हे तर हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या शब्दाचे निर्माते सावरकार हेच होते. ते हिंदुहृदयसम्राट (पहिले) होते ही गोष्ट अनेकांना माहीत नाही, कारण त्यांचे अनुयायी या गोष्टीचा फारसा उल्लेख करत नाहीत.

 असे असले तरी सावरकर हे हिंदुत्ववादी नसून ब्राम्हणवादी होते हे त्यांचे साहित्य आणि कार्य वाचले की दिसून येते.

 हिंदुत्ववाद हा ब्राम्हणवाद लपवण्याचा बुरखा आहे हे विचारी लोकांना माहीतच आहे.कारण हिंदू म्हणवून घेतले तर ब्राम्हण वेगळे पडत नाहीत, बहुजनांवर ब्राम्हणवाद लादू शकतात आणि त्यांच्यावर सांस्कृतिक राज्यही करू शकतात. आपल्या लिखाणात सावरकरांनी सनातन उर्फ वैदिक उर्फ ब्राम्हणी धर्माचा, चाणक्य, पुष्यमित्र शृंग, बाजीराव पेशवे या व इतर महानब्राम्हणांचा आणि वैदिक साहित्य आणि संस्कृत भाषा या ब्राम्हणी प्रतिकांचा उदो-उदो केला असल्याचा दिसतो.

बौद्ध धर्म आणि ब्राम्हण यांच्यात प्राचीन काळापासून मोठा संघर्ष राहिला आहे. सावरकर हे कट्टर वैदिक ब्राम्हण असल्याने त्यांच्या लिखाणात वैदिकविरोधी आणि ब्राम्हणविरोधी असलेल्या बौद्ध धर्मावर व तो स्वीकारणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कडक आणि जहरी टीका केलेली दिसते. या गोष्टी सावरकर हे हिंदुत्ववादाच्या आडून ब्राम्हणवाद जोपासणारे लेखक होते हे दाखवून देतात.

 सावरकरांचा हा ब्राम्हणवाद फक्त लिखाणापुरता मर्यादित नव्हता. एखादा माणूस किती जातीयवादी आहे हे त्याच्या खास लोकांमध्ये, सहकार्‍यांमध्ये त्याच्या जातीचे लोक किती प्रमाणात आहेत यावरून सहज कळून येते. सावरकरांचे बहुतेक सगळे खास लोक आणि सहकारी चित्पावन ब्राम्हण या जातीचे होते. यावरूनही सावरकर हे ब्राम्हणवादी होते हे दिसून येते. येथे हे सांगणे गरजेचे आहे की महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील या व इतर खरोखरच्या महान लोकांच्या सहकार्‍यांमध्ये त्यांच्या-त्यांच्या जातीचे लोक क्वचितच दिसतात.

 ब्राम्हणवादाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे ब्राम्हणवादी लोक बहुजनांच्या महापुरुषांना आपल्या बोलण्यातून आणि लिखाणातून अनुल्लेखाने टाळतात. उल्लेख केलाच तर तो त्यांच्यावर टीका करण्यासाठी करण्यासाठीच असतो. सावरकरांनी आपल्या लिखाणातून आणि भाषणांतून हेच केले आहे. यावरून सावरकर हे पक्के ब्राम्हणवादी होते हेच दिसून येते.

त्यामुळेच ते  आजच्या ब्राम्हणवाद्यांचे  हिरो ठरले आहेत.



हेही वाचा:
सावरकरांचा माफीनामा
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य 

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week