-महावीर सांगलीकर
माझे वि.दा. सावरकर यांच्यावरील तीन लेख या ब्लॉगवर प्रकाशित झाले आहेत. पहिला लेख प्रकाशित झाल्यापासून सावरकरांचे अंध भक्त माझ्यावर चवताळले आहेत व अगदी खालच्या पातळीवर जावून कॉमेंट्स देत आहेत. त्यांची संस्कृती खरेच किती उच्च आहे हे दाखवून देत आहेत. असो.
गंमत म्हणजे त्यातील कांही टिनपाट लोक, ज्यांना त्यांची जात आणि वर्ण यांच्याबाहेरचे जगच माहीत नाही, ते मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर ते सावरकरद्वेष पसरवत असल्याचा आरोप करत आहेत. या म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा झाल्या. ज्या सावरकराने आपल्या लिखाणाद्वारे मुस्लिमद्वेष, बहुजनद्वेष, बौद्धद्वेष, आंबेडकर द्वेष, जैनद्वेष पसरवण्याचा उद्योग आयुष्यभर केला, आणि ज्याचे अनुयायी आताही तोच उद्योग करत आहेत, ते मला सावरकर द्वेषी म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवावे की मला त्या लेखकाचा द्वेष वगैरे कांही नाही. मी फक्त तो किती छोटा आणि कोत्या मनोवृत्तीचा माणूस होता हे दाखवून देत आहे.
सावरकरांचे अंध भक्त डोळस कधीच होणार नाहीत हे मला माहीत आहे. त्यामुळे अंध भक्तांनी हे लेख वाचू नयेत, कारण त्यांच्या टीकेने मी कांही हे लिखाण बंद करणार नाही, आणि माझ्या लेखाने त्यांचेही मत कांही बदलणार नाही आहे. मुळात माझे हे लेख त्यांच्यासाठी नाहीच आहेत. हे लेख लिहिण्यामागे माझा उद्देश बहुजन तरूणांना सावरकराचे खरे स्वरुप दाखवून देणे हा आहे.ज्या माणसाने आपल्या लिखाणातून छ. शिवाजी महाराजांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही, ज्याला बाजीराव-रघुनाथराव पेशवे छ. शिवाजी महाराजांपेक्षा मोठे वाटतात, ज्याने कांही ठिकाणी महाराजांचा धडधडीत अपमान केला आहे, त्या माणसाचे खरे स्वरूप बाहेर यायलाच पाहिजेल.
प्र.के. उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांनी वि.दा. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर नव्हे स्वातंत्र्यवैरी असे म्हंटले होते. त्यांनी सावरकरांची टर उडवणारा अग्रलेख लिहिला होता. तसेच सावरकर युद्धास निघाले असा विडंबनात्मक संवादही लिहिला होता. त्यावर मी संदर्भासहित लेख लवकरच देत आहे. बघू या हे अंध भक्त मला जसे 'सूर्यावर थुंकणारा' 'मूर्ख' 'बुद्धीची कीव करावीशी वाटते' असे म्हणतात, तसेच प्र.के.अत्रे यांच्याबद्दल म्हणतात का! पण नाहीच म्हणणार, कारण....तुम्हाला माहीत आहेच.
सावरकारांच्या बद्दल खुद्द पुण्यातील ब्राम्हण लोक त्याकाळी ’भलते सलते’ बोलत असत. काय बोलत असत हे पुढे लिहीनच. अंध सावरकर भक्तांनी हिम्मत असेल तर त्या पुणेकर ब्राम्हणांना मूर्ख म्हणावे. ते होत नसेल तर आपली सावरकर भक्ती ही जातीप्रेमातून आली आहे हे लक्षात घ्यावे.
हेही वाचा:
सावरकरांचा माफीनामा
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
very good
ReplyDeleteshivaji maharajabaddal malahi aadar aahe. kimbahuna mi savarkaranpeksha mi shivaji maharajanchach jast aadar karte.but sorry savarkaranbaddal asa mat mala patat nahi.majhya mate savarkar josh aani sayyam yanche ek khup chhan idol hote.
ReplyDelete