सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, March 2, 2011

पर्वती झाली हिमालयाहून मोठी

-महावीर सांगलीकर



पुण्यात पर्वती नावाची एक टेकडी आहे. या पर्वतीएवढी प्रसिद्ध टेकडी तुम्हाला आख्ख्या महाराष्ट्रात, नव्हे भारतात देखील कोठे ऐकण्यात येणार नाही. या पर्वतीच्या प्रसिद्धीपुढे सह्याद्री आणि हिमालय हे पर्वत देखील खुजे ठरतात. याचा अर्थ असा नाही की सह्याद्री आणि हिमालय उत्तुंग नाहीत. त्याचे काय आहे की कांही लोक सह्याद्री आणि हिमालय हे पर्वत अस्तित्वातच नाहीत असे समजून पर्वती महात्म्य सांगत सुटतात. ज्यांनी सह्याद्री आणि हिमालय पाहिलाच नाही त्यांना पर्वतीचे हे महात्म्य खरेच वाटायला लागते. कारण  पर्वतीभक्तांच्या ताब्यात मेडीया आहे. त्यातून पर्वतीचे महात्म्या परत-परत सांगितले आणि लोकांना सह्याद्री आणि हिमालय माहितच होवून दिला जात नाही.

आता वेगळ्या शब्दात म्हणजे डायरेक्ट मेथडने सांगायचे म्हणजे कोणा वि.दा. सावरकर नावाच्या लेखक कम हिंदुत्ववादी जादा असणार्‍या टेकडीला कांही लोकांनी हिमालयापेक्षा मोठे बनवून ठेवले आहे! हे टेकडीवाले इंग्रजी सत्तेला हादरा देणार्‍या नेताजी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग, नाना पाटील या निधड्या छातीच्या क्रांतीकारकांचा उल्लेखही करायचा टाळतात. टेकडीचे लहानपण लपवण्यासाठी हिमालय लपवून ठेवणे हे त्यांना गरजेचे असते!

या लोकांनी प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या लहान लहान टेकड्यांना आणि टेकाडांनादेखील हिमालयाहून मोटे बनवून ठेवले आहे. जेथे हिमालय लपवणे शक्या झाले नाही तेथे टेकाडांना त्यांनी हिमालयाचे गुरू बनवून टाकण्याचा उद्योग केला.

आता या टेकडींचे आणि टेकाडांचे यांना एवढे प्रेम का? तर ती टेकडी वा टेकाड त्यांच्या जातीचे असते हेच त्याचे एकमेव कारण.

पण आता माहीती लपवून ठेवण्याचे दिवस संपले आहेत. लोकांना टेकड्या किती लहान असतात हे कळू लागले आहे. एवढेच नव्हे तर या टेकड्यांचे खरे स्वरूप काय आहे हेही बाहेर यायला लागले आहे. त्यामुळे टेकडीमहात्म्य संपणार आहे.


हेही वाचा:
सावरकरांचा माफीनामा
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week