सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, March 5, 2011

सावरकरांचा माफीनामा


-महावीर सांगलीकर


भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी ब्रिटीशांच्या गोळ्या खावून देशासाठी आपला जीव दिला. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्‍या वा जन्मठेप भोगणार्‍या तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती. पण तसे कोणी केल्याचे  ऐकिवात नाही. अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:

"मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्‍या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता  राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्‍या सरकारचा जयजयकार करील."


"एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."


"माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने  काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"


१४ नोव्हेंबर १९१३


सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!

संदर्भ:
माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
मुंबई चौफेर, ५ मे २००२
http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm


हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट

1 comment:

महाविचार LATEST

Popular Posts This Week