सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Friday, July 8, 2011

महावीर- गौतम बुद्ध आधी कोण होते?

-महावीर सांगलीकर

अनेक हिंदुत्ववाद्यांना असे वाटत असते की त्यांचा धर्म जगातील सगळ्यात जुना धर्म आहे. त्यांना असेही वाटते की भारतातील जैन, बौद्ध, शीख आणि इतर धर्म हिंदू धर्माच्याच शाखा/ पंथ आहेत, व हे धर्म हिंदू धर्मातून फुटून निघालेले धर्म आहेत. त्यांचे असे वाटणे हे हिंदू हा एक धर्म आहे आणि तो जगातील सगळ्यात जुना धर्म आहे या दोन गृहितकावर आधारीत आहे.

हिंदुत्ववाद्यांना त्यांच्याच धर्माची नीट माहिती नसल्याने त्यांना जैन धर्म व बौद्ध धर्म ही नेमकी काय चीज आहे आणि त्यांचा इतिहास नेमका काय आहे हे माहीत असणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज हा असतो की महावीर व गौतम बुद्ध हे 'आधी' हिंदूच होते. इथे त्यांना हिंदू या शब्दाआडून हे सांगायचे असते की हे दोघे आधी वैदिक होते. हे लोक जैन, बौद्ध यांना हिंदू धर्माचा पंथ ठरवतात, पण वैदिक धर्म हा हिंदू धर्माचा पंथ आहे असे कधीच म्हणत नाहीत, कारण हिंदू म्हणजेच वैदिक असे त्यांचे साधे गणित असते.

जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी) पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे. त्या परंपरेतील लोकांना हिंदू म्हणणारे लोक आपले अज्ञान दाखवत असतात असेच म्हणावे लागेल.

अशा लोकांना सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी तोही हिंदू (म्हणजे वैदिक) होता असे वाटत असते. पण सम्राट अशोक आधी जैन होता, नंतर बौद्ध झाला. (पहा: The Early Faith of Asoka: Edward Thomas).

महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

वैदिक धर्म हा ब्राम्हण धर्म म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे ब्राम्हण नसलेल्यांचा या धर्माशी संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच आजचा हिंदू धर्म हा जैन, बौद्ध, शैव आणि वैदिक धर्म यांची भेसळ आहे.



हेही वाचा:
प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता?
हिंदू या शब्दाविषयी थोडेसे
छ. शिवाजी महाराज हिंदू होते काय?

9 comments:

  1. Thanks for providing appropriate information.Vedik debtors on social network try to humiliate telling lie that great indigenous personalities were hindu/vedik.

    ReplyDelete
  2. Replies
    1. that's very impressive! need more detail about this topic ! we are eagerly waiting for that momentl.

      Delete
  3. you made a very thoughtful point here. your perception is appreciate. also reference is worth reading.

    ReplyDelete
  4. we have been objectively kept away from this history, only for making brahmins more prominent on us. thankyou sir for providing the real history. my salute to our knowledge. keep it up sir and let us be known to this history. i'll try my best to share this information in that class of depressed who dont have the facility of computers.

    ReplyDelete
  5. Jar samrat ashok aadhi jain hota tar kalingchya yuddhanantar tyane boudh dharm ka swikarla. Jain dharmach ahinsawadi aahe. Ha darm ahinsechi shikwan deto. Mag tyala boudh darmachi ka avshyakta padli. Smrat ashok jain hota hi gosht sahsa patat nahi. Aitihasik purava deun spasht karave.

    ReplyDelete
  6. पुराव्याचीच गोष्ट करायची तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला याला ठोस पुरावा नाही. त्याच्या कोणत्याही शिलालेखात त्याने बौध्द धर्म स्वीकारला याचा उल्लेख नाही.

    ReplyDelete
  7. Sanghamitta हि अशोक ची मुलगी ....तिने बुद्ध धम्माचा प्रचार केला...असंख्य बौद्ध स्तूप अशोक ने बांधले.....आणि तुम्ही म्हणताय पुरावा नाही .......धक्का बसला तुमचे हे विधान वाचून .....

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week