सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Monday, July 11, 2011

वैदिक धर्म जिवंत आहे का?

वैदिक धर्मियांनी भारतातील श्रमण धर्माला आणि त्याचे अनुयायी असणा-या नाग,असूर, राक्षस वगैरे मूळ निवासीयांना नेहमी विरोध केला. श्रमणांची शाखा असणा-या जैन धर्माला कमकुवत करण्यात आणि बौद्ध धर्म भारतातून हद्दपार करण्यात वैदिकांना तात्पुरते यश मिळाले, पण या संघर्षात खुद्द वैदिक धर्मच नष्ट झाला!

या संघर्षात वैदिकांना आपले इंद्र, वरुण वगैरे मूळ देव सोडून द्यावे लागले,आणि शिव, गणपती, कृष्ण यासारखे अवैदिक देव स्वीकारावे लागले. (गंमत म्हणजे शिव, गणपती आणि कृष्ण हे वैदिकांचे कट्टर विरोधक होते!)वैदिक धर्मात मूर्तीपूजा नसतानाही वैदिकांना ती स्वीकारावी लागली. यज्ञात गाईन्चा बळी देणा-या, गोमांस खाणा-या वैदिकांना यज्ञ संस्था बंद करावी लागली, गोमांसच काय, कसलेही मांस खाणे त्यांना सोडून द्यावे लागले.


क्षत्रियांनी लिहिलेली, वेदांचा अंत करणारी उपनिषिदे वेदांचाच भाग आहे अशा थापा मारून, गौतम बुद्धांना अवतार ठरवून, शैवांना वैदिक ठरवून वेदधर्म टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.

आजच्या वैदिकांची स्थिती अशी आहे की त्यांना आपला धर्म लपवून ठेवावा लागतो, आणि 'आम्ही हिंदू आहोत' असे सांगावे लागते. वैदिक धर्म उघड रूपाने तरी पूर्ण नष्ट झाला आहे. याउलट बौद्ध धर्म जगभर पसरला, भारतातही त्याचे जोरदार पुनरागमन झाले. दुसरीकडे जैन धर्मही टिकून राहिला आणि आता तो पुन्हा फोफावत आहे.


हिंदू या शब्दाविषयी थोडेसे

1 comment:

  1. ३३ का ३२ कोटी देवांच्या लफड्यात पडू नका कारण त्यांच्या कडून काहीही शिकण्यासारखे नाही.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week