-महावीर सांगलीकर
या लेखाच्या सुरवातीलाच मी हे सांगतो की मी काँग्रेसी नाही. पण माझे स्पष्ट मत असे आहे की Survival of Fittest या नियमाप्रमाणे काँग्रेस हा एकमेव पक्ष या देशावर राज्य करण्यास लायक आहे. ज्यांना असे वाटते की हा पक्ष नालायक, भ्रष्ट आणि मूर्ख लोकांनी भरलेला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे की लोकांच्या लायकी प्रमाणे त्यांना त्यांचे राज्यकर्ते मिळत असतात.
जे लोक काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करतात, त्यांनी अगोदर आपापल्या पक्षातील घराणेशाहीबद्दल बोलावे. पण ते तसे बोलणार नाहीत. कारण आपला तो बाळ्या, कॉंग्रेसचे ते कार्टे असा या लोकांचा खाक्या आहे.
देशभक्तीचा ठेका घेतलेले महान मध्यमवर्गीय भारतीय सर्व साधारणपणे काँग्रेसचे कट्टर विरोधक असतात हे दिसून येते. काँग्रेसबरोबरच हे घटना विरोधक, गांधी विरोधक, मुस्लीम विरोधक, बहुजन विरोधक, दलित विरोधक, आरक्षण विरोधक इत्यादी इत्यादी बरेच कांही असतात. या लोकांना गांधी या नावाचा तर प्रचंड तिटकारा असतो. त्यांचा हा विरोध खराखुरा विरोध किंवा विरोधासाठी विरोध या भावनेतून यातून आला नसून वैफल्यग्रस्त भावनेतून आला आहे. आपली या देशावर राज्य करण्याची लायकी नाही हे त्यांना चांगलेच माहीत आहे. असे हे वैफल्यग्रस्त लोक सतत सत्तेवर येणा-या काँग्रेसवर जळण्याशिवाय कांहीही करू शकत नाहीत.
काँग्रेस पक्ष हा एक बलवान हत्ती आहे आणि या हत्तीवर जळणारे सगळेजण म्हणजे भुंकणारी कुत्री आहेत. जसे कुत्र्यांच्या भूंकण्याने हत्तीला कांही फरक पडत नाही, तसेच काँग्रेसलाही कांही फरक पडत नाही. म्हंटलेच आहे ना, की हाथी चलत अपनी चाल, कुत्तर भौंके भौंकने दो!
आगे आगे देखो होता ही क्या....
या संदर्भात मी दोन गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. पहिली म्हणजे भाजपाने आण्णा हजारे यांचा वापर करत जे घटनाविरोधी आंदोलन सुरू केले आहे, त्याची काँग्रेसने जवळ जवळ वाट लावलीच आहे. पुढील काळात काँग्रेस भाजपाची देखील पुरती वाट लावून टाकणार आहे. दुसरी गोष्ट अशी की मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत काँग्रेस येवो न येवो, पण कॉंग्रेसने संजय निरुपमरुपी टाकलेल्या फास्यामुळे राज ठाकरे हे लवकरच थयथयाट करणार आहेत आणि काँग्रेसला नेहमीप्रमाणे फायदा मिळवून देणार आहेत. शिवसेनेची या प्रकरणात चांगलीच पंचायत होणार आहे. आपल्या महान मध्यमवर्गीय मराठीवादी मुंबईकरांची उद्धव आणि राज या दोन भावात वाटणी होणार आहे, तर उत्तर भारतीयांची मते एक गठ्ठा कॉंग्रेसला पडणार आहेत.
ek matr agadi khare ahe ki, Raj Thakarey ani Shivsena yanchya bhandanacha fayada Congress chya Nirupam la jaroor honar ahe....
ReplyDeletesheati Congressla tyagacha Itihas ahe, tasa BJP la nahi.
ReplyDeleteCongress madhye kahi lok kharab asatil pan chanagale nete hi khup ahet.sagalyana barobar gheun janyachi manasikata ahe, he mala khup mahatwacha vatata.
Me Tumachya Dusarya Gostila 100% khare manto ki Sanjay Nirupm Cha fayda Congress la Tar tota BJP Shivsenela Honar he nakki
ReplyDelete