-महावीर सांगलीकर
महात्मा गांधी यांना सतत शिव्या घालणे हा अनेकांचा आवडता उद्योग बनला आहे. यात केवळ हिंदूत्ववादीच आघाडीवर नाहीत, तर अनेक तथाकथित आंबेडकरवादी, ज्यांना कसलीच फिलॉसॉफी कळत नाही असे सामान्य बहुजन आणि आणि आपमतलबी राजकारणी हेदेखील कट्टर गांधीविरोधी बनले आहेत. त्यामुळे गांधीजी आणि गांधीवाद यांना कांहीच फरक पडत नाही. कारण गांधीविरोधी काव काव करणा-या लोकांची संख्या प्रचंड आहे असे भासत असले तरी प्रत्यक्षात त्यांची संख्या नगण्य आहे. खरे पाहिले तर भारतीय समाजात गांधीवाद इतका खोलवर रूजला आहे की त्याला कावळ्यांच्या काव-कावीने कसलाच धोका नाही. मी हा लेख केवळ गांधी ही काय चीज आहे आणि कांही लोक गांधीजींवर का जळतात याचे विश्लेषण करण्यासाठीच लिहीत आहे.
गांधीजींना मिळालेली जागतीक मान्यता
एखादी व्यक्ती किती

महात्मा गांधी यांच्यावर जगातील ८० पेक्षा जास्त देशांनी २५० पेक्षा जास्त खास टपाल तिकिटे काढली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोस्टाची तिकिटे निघणारी महात्मा गांधी ही एकमेव भारतीय व्यक्ती आहे, आणि जगातील मोजक्याच व्यक्तींवर इतक्या मोठ्या प्रमाणावर टपाल तिकिटे निघाली आहेत. अशी तिकिटे काढणा-या देशांमध्ये इंग्लंड, अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना अशा अनेक देशांचा समावेश आहे. इतकेच नाही तर युनोने देखील महात्मा गांधी यांच्यावर खास टपाल तिकीट काढले आहे. युनो काय किंवा इतर कोणत्याही देशात कॉंग्रेसचे सरकार नव्हते किंवा नाही ही गोष्ट गांधी विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
जगातील शेकडो प्रमुख भाषांमध्ये महात्मा गांधींचे चरित्र प्रकाशित झाले आहे. महात्मा गांधींचे आत्मचरित्र हे देखील जगातील शेकडो भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. महात्मा गांधींचे चरित्र आणि आत्मचरित्र इंग्रजी, स्पेनिश, फ्रेंच, रशियन पासून अगदी आफ्रिकेतील स्वाहिली भाषेतही उपलब्ध आहेत. त्यांचे आत्मचरित्र हे जगातील बेस्टसेलर आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींचे चरित्र अमेरिकेतील कोलम्बिया युनीव्हर्सीटीनेही प्रकाशित केले आहे.
युरोपिअन देशांतील व कॅनडा, अमेरिकेतील व्यवस्थापन या विषयावरील अनेक पुस्तकांमध्ये महात्मा गांधी यांचे कोट्स मोठ्या प्रमाणावर दिलेले दिसतात.
आजपर्यंत महात्मा गांधी यांच्यावर २० पेक्षा अधिक सिनेमे निघाले आहेत. यातील सगळ्यात प्रसिद्ध सिनेमा म्हणजे Richard Attenborough या ब्रिटीश दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला गांधी हा सिनेमा. गांधी ज्या ब्रिटीशांशी लढले त्या ब्रिटीश देशातील एका निर्माता दिग्दर्शकाने गांधीजींवर सिनेमा काढावा यातच गांधीजींची महानता दिसून येते. हा सिनेमा जगभर हाउसफुल झाला. याच्या उलट सावरकर हा सिनेमा. तो सावरकरांच्या जातवाल्यांनी काढला आणि प्रामुख्याने फक्त त्यांनीच पाहिला. इतर भारतीयांवर जे सिनेमे झाले तेही फारसे लोकप्रिय झाले नाहीत.
अशा प्रकारे गांधीजींची महानता जगाने मान्य केली असली तरी भारतातील अनेकांना ती मान्य नाही. अर्थातच त्याचे कारण राजकारण हेच आहे. हे विशाल व्यक्तीमत्व बघून अनेकांच्या मनात न्यूनगंड, असूया, राग, द्वेष अशा भावना तयार होतात. त्यातूनच महात्मा गांधी यांना अगदी खालच्या पातळीवर जावून शिव्या घालण्याचे उद्योग सुरू होतात. शिवीगाळ करणारे लोक पराभूत वृत्तीचे असतात. अशा पराभूत वृत्तीच्या लोकांकडून गांधीजींच्या महानतेला कसलाही धोका नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा गांधी यांच्याशी अनेक बाबतीत मतभेद होते, पण बाबासाहेबांनी कधीच महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले नाहीत. पण तथाकथित आंबेडकरवादी शिवीगाळ करून आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी नसल्याचे दाखवून देत आहेत.
शेवटी जिंकतात तेच जे काव- काव करत नाहीत.
आज भारतात प्रत्येकजण आपापल्या जातीच्या महापुरुषाला 'सगळ्यात महान' ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी गांधींना बदनाम करत आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की महात्मा गांधी हे त्यांच्या जातीच्या लोकांनी महान ठरवलेले व्यक्तीमत्व नाही, तर जगाने महान ठरवलेले व्यक्तिमत्व आहे. कठोर वास्तविकता ही आहे की डॉक्टर आंबेडकर यांचे कार्य ते कितीही महान व आवश्यक असले तरी ते उपेक्षितांसाठी, म्हणजे विशिष्ठ समाजापुरते मर्यादित होते. याउलट गांधीजींचे कार्य या महाकाय देशाच्या स्वातंत्र्यासाठी होते. गांधीजींच्या चळवळीमुळे अनेक देशांमधील स्वातंत्र्य प्रेमींना बळ मिळाले. याच गांधीजींनी अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठीही काम केले होते. याउलट डॉक्टर आंबेडकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून कसलेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे महात्मा गांधी यांच्या पेक्षा कधीच महान ठरू शकत नाहीत.
शिवीगाळ करणारे लोक पराभूत वृत्तीचे असतात....
ReplyDeleteमहात्मा गांधी हे त्यांच्या जातीच्या लोकांनी महान ठरवलेले व्यक्तीमत्व नाही, तर जगाने महान ठरवलेले व्यक्तिमत्व आहे....
खरेच खूपच समर्पक शब्दांत तुम्ही तुमचे विचार मांडले आहेत! तुमच्या या लेखाने अनेक खुज्या विचारांच्या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन पडले असेल!
खरेच खूपच समर्पक शब्दांत तुम्ही तुमचे विचार मांडले आहेत!
ReplyDeleteमाझा ब्लॉग पहा.---- www.santosh-kale.blogspot.com
About Gandhi I see from my prospectus. I hate him for he avoid doing good to irradicate ill custom in Hindu religion.
ReplyDeleteAs your view is I must agree he was really that great personality you think and world take him.
But alas! he put hurdle in path of freedom of india and then called Shudra's.
Nice bro.
DeleteWhat happened all of a sudden ? I could notice strong turn in your writings in past 1-2 weeks (on FB). Your anti-brahmin language has softened and you are targetting them any more. As a result lots of bahujans are getting against you, as I could notice.
ReplyDeleteEarlier your posts were related to bash brahmins from any corner any direction and be it any subject. I strongly urge you to continue your thought process as it used to be earlier. Would be good to unite all bahujans, aborigins, Jains, Muslims, Sikhs, Christians, marathas, OBC, BC, SC,ST, Parsi.
By the way I am brahmin (and I am stating it truly with hand on my heart). I truly hope that all of you succeed one day to banish all brahmins out of India from all fields - art, science, politics, sports, cinema, technology, education. (I hope you will publish this comment; but at the same time would be interested to understand your perspective on my post)
khup chhan satya pratek dalit ,savarkar swatrhi aani rajkaranyani vachave
ReplyDeleteI'm son of Gandhian father. I had discussed at length about 1947 with my father. When I asked 'Why Gandhiji couldn't persuade Nehru from idea of division of Hindusan, he had no answer. I also read lot of literature about Gandhiji including 'Experiments with truth' & I liked it because of it's honesty. But I feel only one side is projected. We should not comment on anybody but a true history should be told without bias and let the person draw his own conclusions. Unfortunately many historians were themselves biased.
ReplyDeleteAtishay muddesud ritine mudda patawun denyacha prayatna. Ek mudda aankhi ghyayala pahije hota. Bhagat singh Sawarkar aadi kranti karakanpeksha tya kalat Gandhijina anuyayi jaast milale yatach tyanchi lokpriyata disun yete.Yache karan kay asu shakate?
ReplyDeleteमहात्मा गांधीजी हे एक उत्तम राजकारणी होते हे पटतंय, ते उत्कृष्ट नेता होते हे मान्य आहे पण त्यांचे समाजात बोललेले विचार आणि गुजरातच्या पत्रकामधून केलेले जातीवादाचे समर्थन यातून त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे होते हे दिसून येते. आपण ज्या पद्धतीने म्हणता कि गांधीजी जगात प्रसिद्ध आहेत पण मग त्यांना नोबेल पारितोषिक का मिळाले नाही( त्यांच्या अनुयायी म्हणवनार्याना मिळाले ), कारण त्यांनी आफ्रिकेत जे आंदोलन चालवले ते वंश भेद मान्यता देणारे होते. अर्थात गांधीजीनी ज्या चातुर्वर्ण्याला पाठिंबा दिला त्या च्यातुर्वार्ण्याचे आम्ही शिकार आहोत , ज्या गांधीना पाठींबा मिळाला तो सद्याच्या ओ बी सी लोकांचा त्यांना गांधीनी काय भारताच्या संसदेमध्ये येण्यासाठी तिकिटे दिलीत का ते आपणच पाहावे.
ReplyDeleteजगाला खर्या गांधीचे रूप कधी दाखवले गेले नाही.त्यामुळे ते जगाला पांढरे गांधी वाटतात.भारतातील काही लोकांना ते कळले आहेत.फक्त तोन्डी अस्प्रस्यता निवारण करणारा,वर्ण भेद हे समाजाने दिलेली देणगी मानणारा आसा माणूस महात्मा कसा काय होऊ शकतो.जगाला गांधींचे हे गुण पण दाखून द्या.मंजे त्यांना रेआल गांधी कळतील.सांगलीकरांना गांधींचे हे 'महान' विचार महान वाटत असतील तर त्यात गैर काय?
ReplyDelete
ReplyDeleteBest Article for All Users thanks for sharing this information.
Please See out Latest Services Below:-
Call Us 8800470037 for custom house agent,custom agent india, custom clearing agent delhi
We Also Provides Services Like freight forwarder in india, Freight Forwarders Near Me, Freight Forwarding Companies
Khalitrucks is one of the best transport company in india, Transporters Delhi,
Call Us Today Or Book Trucks Online, Truck Book Online
Call +91-7827623969 for Web Design Training Delhi
Call 8250081907 For Website Design Servies Delhi, Web Design Company Delhi, Web Development Company Delhi, SEO Company Delhi