-महावीर सांगलीकर
अनेक लोक आंतरजातीय लग्ने झाली तर जातीव्यवस्था मोडेल अशा भ्रमात वावरत आहेत. प्रत्यक्षात अशा लग्नांमुळे जाती मोडत तर नाहीतच, उलट दोन जातीमधला तणाव वाढतो. ज्या लोकांनी आंतरजातीय लग्ने केली आहेत त्यांनी आपल्या मुलांना बापाची जात दिलेलीच असते, असे दिसून येते. क्वचित अपवाद असू शकतात. कोणी कितीही नाकारले तरी प्रत्येक जातीची स्वत:ची अशी संस्कृती असते, विचारसरणी असते आणि एक विशिष्ट सामाजिक दर्जाही असतो.
आपल्या येथे होणारी लग्ने ही दोन व्यक्तींमध्ये होत नसतात, तर दोन कुटुंबामध्ये होत असतात. सुशिक्षित, शहरी कुटुंबांमध्ये इतर जातीतील, अगदी इतर धर्मातील सून किंवा जावयाचा स्वीकार होवू शकतो. पण इथे देखील ती सून किंवा तो जावई शक्यतो आपल्याच दर्जाचा असावा लागतो. ज्यांना आंतरजातीय लग्ने करायचीच आहेत त्यांनी या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. जी सून किंवा जावई आई-वडीलांना मान्य नाही, आणि तरीही असे लग्न करायचेच असा ज्यांचा हट्ट आहे, त्यांनी आपल्या घरात होणा-या कलहाला तयार राहिले पाहिजे, किंवा मग त्यांनी आपले कुटुंब सोडून आपल्या जोडीदारास घेवून वेगळे रहाण्यास तयार व्हायला पाहिजे.
ज्यांना वाटते की जातीव्यवस्था फक्त हिंदू धर्मातच आहे, किंवा फक्त भारतातच आहे, ते भ्रमातच असतात. प्रत्यक्षात ती वेगवेगळ्या रूपात जगभर दिसून येते. जाती मोडणे हे भ्रष्टाचार संपवण्यापेक्षाही अवघड आहे. तरीही उच्च वर्गात जाती व्यवस्थेची प्रखरता संपुष्टात आलेली दिसते. किंबहुना उच्च वर्गातील लोकांनी जातीव्यवस्थेची वात लावलेली दिसते. पण जाती मोडण्याच्या बतावण्या करणारे निम्न वर्गीय लोक उच्च वर्गीयांना शिव्या देण्यातच धन्यता मानतात. त्यांना खरेच जाती मोडायच्या असतील तर त्यांनी आधी निम्न वर्गातून उच्च वर्गात यायला पाहिजे. जात्यांतर करता येत नसले तरी वर्गांतर करणे शक्य असते.
हे कसले प्रेम?
अजून ज्यांना मिशाही आल्या नाहीत अशी कांही पोरे एखाद्या मुलीला बघून भाळतात आणि कसलाही विचार न करता त्या मुलीच्या मागे लागतात. यातून पुढे प्रश्नच प्रश्न तयार होतात. एखादी मुलगी आवडली म्हणून तिच्यावर आंधळे प्रेम करण्याआधी मुलांनी आपली लायकी तपासून घ्यायला पाहिजे. मुळात हे प्रेम आहे की शारीरिक आकर्षण आहे, खरेच प्रेम असेल तर आपण त्या मुलीला न्याय देवू शकतो का, असे प्रेम आपल्या घरच्यांना, मुलीच्या घरच्यांना, समाजाला मान्य आहे का अशा अनेक गोष्टींचा मुलांनी विचार करायला पाहिजे. असा विचार करायचा नसेल तर परिणाम भोगण्याची तयारी देखील ठेवली पाहिजे. माझे हे म्हणणे मुलींना देखील लागू आहे. एखादी बंगल्यात राहणारी सुशिक्षित मुलगी ड्रायव्हर बरोबर पळून जाते, तेंव्हा पुढे काय होते? त्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे तर होतेच, पण तिच्या आई-वडीलांच्या प्रतिष्ठेला देखील धक्का बसतो.
ज्यांना प्रेम करायचेच आहे, त्याने आपला जोडीदार पूर्ण विचार करूनच निवडला पाहिजे.
नवा लव्ह जिहाद?
कांही अतिरेकी लोक आमच्या समाजावर गेली हजारो वर्षे उच्च जातीयांनी अन्याय केला म्हणून त्यांचा बदला घ्यायच्या गोष्टी करत आहेत. त्यातील कांहीजण उघडपणे बोलतात की आपण उच्च जातीयांच्या पोरी पळवून न्यायला पाहिजेत. असे कांही झाल्यास उच्च जातीय गप्प बसतील या भ्रमात कोणी रहात असतील तर ते मूर्ख आहेत. क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच. महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या कांही प्रतिक्रिया आपण बघतोच. कांही धूर्त लोक या प्रकारचे निमित्त करून मराठा समाजास टार्गेट करत आहेत. ही देखील चुकीचीच गोष्ट आहे. मराठाच काय, कोणताही समाज जर त्यांच्या मुलींची छेड काढली गेली तर गप्प बसत नसतो.
हा नवा लव्ह जिहाद वाढत गेला तर महाराष्ट्रातील सामाजिक कलह देखील वाढत जाईल, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सर लेख चांगला आहे. तरी पण काही मुद्दे/विवेचन पटले नाहीत. ज्या गोष्टी पटल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत.
ReplyDeleteदुसरा परिच्छेद, संपूर्ण सहमत
<>
<>
<>
<>
आणि ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या पुढीलप्रमाणे आहेत.
ReplyDelete<> असहमत
<> असहमत
<<. एखादी बंगल्यात राहणारी सुशिक्षित मुलगी ड्रायव्हर बरोबर पळून जाते, तेंव्हा पुढे काय होते? त्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे तर होतेच, पण तिच्या आई-वडीलांच्या प्रतिष्ठेला देखील धक्का बसतो.>>
असहमत
<> असहमत
<> असहमत
मला वाटते आपल्या लोकांची आंतर जातीय/आंतर धर्मीय प्रेमविवाह या कल्पनेला असा विरोध असेल किंवा कसेही करून आंतर जातीय/आंतर धर्मीय विवाह एकमेकांची खोड जिरवून करायचे असा दृष्टीकोन असेल तर राष्ट्र, सुसंस्कृत मानवी समाज या गोष्टीला काही किमंत राहणार नाही.