सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, March 7, 2012

कोण म्हणतय श्रीमंत लोक क्रांती करू शकत नाहीत?


-महावीर सांगलीकर

आपल्या देशात श्रीमंतांना शिव्या देणे, गरीबी व गरीबांचे उदात्तीकरण करणे आणि निष्क्रिय मध्यमवर्गियांना महान ठरवणे ही एक फॅशनच झाली आहे. काय म्हणे, तर जगातील सगळ्या क्रांत्या ह्या मध्यमवर्गियांनी केलेल्या आहेत, आणि श्रीमंत लोक क्रांती करूच शकत नाहीत. अर्थातच हा समज मध्यमवर्गीयांनी आपल्या लेखणीचा दुरुपयोग करून पसरविला आहे. असा समज पसरवून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचे समाधान मिळवले आहे. पहिली गोष्ट म्हणजे श्रीमंतांना शिव्या देण्याची हौस त्यांनी भागवून घेतली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्यमवर्गियांचा अहंकार कुरवाळण्यात ते यशस्वी झाले आहेत.

पण जगाचा आजपर्यंतचा इतिहास सांगतो की जगातील सगळ्या क्रांत्या या श्रीमंतांनी केलेल्या आहेत. गरीब लोक क्रांती करूच शकत नाहीत, आणि मध्यमवर्गिय लोक क्रांती करण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि पडलेच तर त्यांनी केलेले क्रांतीचे प्रयत्न नेहमीच फसतात. मध्यमवर्गीयांच्या फसणा-या क्रांतीचे ताजे उदाहरण म्हणजे आण्णा हजारे यांची ’लोकपाल’ क्रांती. असो.

सगळ्या क्रांत्या श्रीमंतांनी केलेल्या आहेत.

जगातील सगळ्या क्रांत्या या श्रीमंतांनी केलेल्या आहेत. प्रत्येक क्रांतीला त्या-त्यावेळची परिस्थिती कारणीभूत असते, पण त्या परिस्थितित क्रांतीची मशाल पेटवणारी कोणी एक प्रभावशाली व्यक्ती असते. ही व्यक्ती आर्थिक सुबत्ता असणारीच असते. त्या क्रांतीकारकाला लगेच इतर सामर्थ्यशाली श्रीमंत लोकांचा पाठिंबा मिळतो.

भारतात आपण ज्यांनी सामाजिक, धार्मिक अथवा राजकीय क्रांत्या केल्या, त्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीवर एक नजर टाकू.

महावीर व गौतम बुद्ध हे दोघेही त्याकाळातील गणराज्यांच्या प्रमुखांचे पुत्त म्हणजेच राजकुमार होते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर बोलण्याची गरजच नाही. या दोघांनीही समण धर्म पुन्हा एखदा बळकट केला व वैदिकांची धार्मिक मक्तेदारी मोडून काढली.

मौर्य घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य हा मोर पाळणा-या जमातीच्या मुखियाचा मुलगा होता, म्हणजेच श्रीमंत घरातील होत. चंद्रगुप्ताने राजकीय तर त्याचा नातू अशोक आणि खापर पणतू संप्रती यांनी धार्मिक क्रांती केली ते दोघे चंद्रगुप्ता क्षाही श्रीमंत होते. प्रतिक्रांती करणारा पुष्यमित्र शृंग हा कोणी ऎरागैरा नव्हे तर मौर्यांचा सेनापती होता. या सगळ्यांकडे गडगंज संपत्ती होती हे सांगायाची गरज नाही.

तीच गोष्ट महाराणा प्रताप, छ्त्रपती शिवाजी गुरू गोविंद सिंग आणि संभाजी यांची. हे कांही गरीब किंवा मध्य़मवर्गीय नव्हते.

संत शिरोमणी तुकाराम हे तर अतिश्रीमंत होते.

आधुनिक काळातील क्रंतिकारकांच्या बाबतीत बोलायचे तर आपल्यापुढे महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांची नावे आपल्यापुढे येतात. बहुतेक लोकांना हे माहित नाही की महात्मा फुले ’पैसेवाले’ होते. ते स्वत: मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. (कात्रजचा बोगदा आअणि खडकवासला धरण महात्मा फुलेंनी बांधले). शाहू महाराज श्रीमंत होते हे सांगण्याची गरज नाही. महात्मा गांधी श्रीमंत घरात जन्मलेले तर होतेच, शिवाय त्यांनी उभारलेल्या चळवळीमागे श्रीमंत भारतीयांची मोठी फ़ौज उभी होती. सुभाष चंद्र बोस, भगत सिंग हे सुखवस्तू घरात जन्मले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मही एका सुखवस्तू घरात झाला होता. कर्मवीर भाऊराव पाटील हेही एका श्रीमंत पाटील घराण्यातील होते. पंजाबराव देशमुख, नाना पाटीलही हेही श्रीमंत घरातीलच होते.

जगात झालेल्या अनेक क्रांत्यांमध्ये अमेरिकन स्वातंत्र्याची क्रांती प्रसिद्ध आहे. या क्रांतीचे जनक जॉर्ज वाशिंग्टन, बेंजामिन फ्रॅंकलिन, थॉमस पेन हे गडगंज श्रीमंत लोक होते.

सैन्यातील सेनाधिकारी आणि सैनिक यांच्यातील मुख्य फरक हा की बहुतांश सैनिक हे गरीबाघरी जन्माला आलेले असतात, तर बहुतांश सेनाधिकारी हे श्रीमंत व अतिश्रीमंत घरात जन्मलेले असतात. कोणतेही युद्ध सैनिक नव्हे तर सेनापती जिंकत असतात, तसेच कोणतीही क्रांती जनता नव्हे तर त्या क्रांतीचे नेते करत असतात. या नेत्यांकडे प्रचंड आर्थिक ताकद असते. क्रांती यशस्वी होण्यासाठी कधी-कधी (नेहमी नव्हे) जनतेच्या सहभागाची गरज असते. अशा वेळी हे क्रांतीकारक आपल्या कार्यात जनतेला सहभागी करून घेतात.

भारतातील पुरोगामी चळवळीवर साम्यवादाचा प्रभाव आहे, त्यामुळे श्रीमंती आणि श्रीमंत यांना नावे ठेवली जातात. पण साम्यवादाचा जनक कार्ल मार्क्स आणि साम्यवादी क्रांतीचा मुकुटमणी चे गव्हेरा हे दोघेही श्रीमंत घरात जन्मले होते , ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे.

2 comments:

  1. माजेही हेच मत आहे.जे श्रीमंत आणि योग्य वैचारिक वतावरानत वाढतात तेच बहुधा क्रांति करतात कारन त्याना तसे पोषक परिस्तिती सापडते आणि ते योग्य विचार करू शकतात कारण उदर निर्वाहाची भीती नसते त्यामुले .

    ReplyDelete
  2. Bar thik ahe...pan sangayache kay ahe? Madhyam vargiyanni kranti vagairechya bhangadit padu naye? Garibanni tar mulich padu naye??? tumacha observation va conclusion ardhavat vatate. Tumcha mat madnyasathi tumhi ji udaharna dili ahet ti suddha exagratted ahet.... Muddacha bola...

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week