सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Sunday, July 8, 2012

मग मी बहुजनवाद्यांपासून दूर का झालो?

-महावीर सांगलीकर

माझे या ब्लॉगवरील अलीकडचे लेख बहुजनवादाच्या सरळ सरळ विरोधातील आहेत. मी आता बहुजनवादाच्या पूर्णपणे विरोधी झालो आहे. त्यामुळे मी ब्राम्हणवादी झालो आहे असा अर्थ अनेक बहुजनवाद्यांनी त्यांच्या बौद्धिक आकलनाच्या क्षमते नुसार घेतला आहे. पण मी ब्राम्हणवादी कधीच नव्हतो, आताही नाही आणि पुढेही असणार नाही.

मग मी बहुजनवाद्यांपासून दूर का झालो?

माझ्या बहुजनवादापासून दूर होण्याला अनेक कारणे आहेत. त्यांचा खुलासा करण्या आधी मला हे सांगावेसे वाटते की जसे हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अगदी तसेच बहुजन लोक आणि बहुजनवादी या दोन वेगेवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जसे मी हिंदुत्ववादी नसलो तरी हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाची सहिष्णुता या गोष्टींचे कौतुक करतो, तसेच मी बहुजनवादी राहिलो नसलो बहुजन समाजाचे खरे प्रश्न काय आहेत यावर चिंतन करत असतो. सध्याचे माझे लेख कांही वेळा बहुजनविरोधी वाटत असले तरी ते बहुजनविरोधी नसून बहुजनवाद्यांच्या विरोधातील आहेत. तसेच हे लेख बहुजनांचे प्रबोधन करणारेच आहेत, हे चाणाक्ष बहुजनांच्या लक्षात आलेच असेल.

बहुजनवाद हा बहुजनांचे खरे प्रश्न न कळालेल्या, ब्राम्हणांना शिव्या देण्यानेच बहुजनांचे प्रबोधन होत असे मानना-या, नकारात्मक आणि एकांगी विचारसरणीच्या लोकांच्या हाताचे खेळणे बनला आहे. स्वत: भरकटलेल्या या लोकांनी बहुजनवादासही आपल्या मूळ उद्देशापासून दूर नेले आहे. त्यांच्या नकारात्मक विचारसरणीमुळे बहुजनांची एक आख्खी पिढी नकारात्मक बनत चालली आहे. ज्या प्रमाणे हिंदुत्ववाद्यांनी करोडो तरुणांच्या मनात मुस्लीम धर्म आणि मुस्लीम समाज यांच्या विषयी द्वेष, मत्सर, तिरस्कार भरवला तोच प्रकार हे बहुजनवादी करत आहेत. फरक एवढाच कि येथे मुस्लीम धर्मा ऐवजी हिंदू धर्म आणि मुस्लीम समाजाऐवजी ब्राम्हण समाज आहे.

बहुजनांचे खरे प्रश्न शिक्षण, गरीबी, बेरोजगारी, स्थितीवाद, अंधश्रद्धा, व्यसने, अल्पसंतुष्टता वगैरे आहेत. बहुजन वादी नेते आणि वक्ते यावर फारसे कांही बोलत नाहीत. त्यांचा सारा रोख ब्राम्हणांकडे असतो. एकवेळ असे मानू की सगळ्याच गोष्टींना ब्राम्हण जबाबदार होते, पण तुम्ही हे आणखी किती वर्षे सांगत बसणार आहात? स्वत:च्या अवनतीला मुख्यत्वे आपण स्वत:च जबाबदार असतो हे यांना कधी कळणार? बहुजनवाद्यांच्या आवडत्या बौद्ध धर्मात देखील अवनतीचे कारण आपण स्वत: असतो असेच सांगितले आहे. पण यांना बौद्ध धर्म फक्त हिंदू धर्म नको म्हणून, आणि केवळ वेगळे पणासाठी पाहिजे आहे, त्यांना बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध धर्माप्रमाणे आचरण याच्याशी कांहीही देणे-घेणे नाही आहे.

बहुजनवादी लेखक ज्या प्रकार खोटा आणि एकांगी इतिहास लिहित आहेत, त्यावर काय बोलावे? त्यांचे इतिहास लेखन सत्य शोधणासाठी नसून केवळ ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला, मग आम्ही का खोटा इतिहास लिहू नये, या भावनेतून होत आहे. बहुतेक बहुजनवादी लेखक आपल्या जातीचे महात्म्य वाढवणारा इतिहास लिहित आहेत.

बहुजनवाद्यांच्या आकलन शक्तीची मला कीव करावीशी वाटते. जरा कुणी कांही वेगळा विचार मांडला की ते त्याला सरळ ब्राम्हणवादी ठरवून टाकतात. हे म्हणजे त्या अमिबा ह्या एकपेशीय जीवासारखे झाले. अमिबाला फक्त दोनच मित्या कळतात, लांबी आणि रुंदी. त्याला उंची, खोली या गोष्टी कळत नाहीत. अगदी तसेच जो माणूस बहुजनवादातील चुका काढतो, तो ब्राम्हणवादी असतो, एवढेच या बहुजनवाद्यांचे आकलन असते.

बहुजनवादी लोक वापरत असलेली भाषा हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अशी भाषा वापरणारे लोक पराभूत मनोवृत्तीचे, न्यूनगंडाने ग्रासलेले, लैंगिक दृष्ट्या अतृप्त, मनोरोगी असतात. सुसंस्कृत लोक अशी भाषा वापरणा-यांच्या पासून आपोआपच दूर जातात.

बहुजनवाद्यांचे अनेक विचार आणि धोरणे कोणत्याही विचारी आणि शहाण्या माणसास पटू शकत नाहीत. ही धोरणे आणि विचार चुकीचे आहेत असे त्यांना मी किंवा कोणीही सांगू शकत नाही आणि सांगितले तरी त्यांना ते कधीच पटत नाही. अनेक बहुजनवादी तर वेगळे विचार ऐकण्याच्या मनस्तिथीत नसतात. अशा अवस्थेत त्यांच्यापासून दूर होणे आणि समाजाचे स्वतंत्र पणे प्रबोधन करणे हा एकच मार्ग आपल्यापुढे उरतो. म्हणूनच मी या तथाकथित बहुजनवादापासून आणि बहुजनवाद्यांपासून दूर झालो आहे.


हेही वाचा:
अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद
कोण म्हणतय श्रीमंत लोक क्रांती करू शकत नाहीत?
मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात

12 comments:

  1. महाविर जी आपले विचार खरोखर "बहुजनवाद्यांना" अंतर्मुख करायला लावणारे आहेत.

    ReplyDelete
  2. बहुजनांचे खरे प्रश्न शिक्षण, गरीबी, बेरोजगारी, स्थितीवाद, अंधश्रद्धा, व्यसने, अल्पसंतुष्टता वगैरे आहेत. बहुजन वादी नेते आणि वक्ते यावर फारसे कांही बोलत नाहीत. त्यांचा सारा रोख ब्राम्हणांकडे असतो. एकवेळ असे मानू की सगळ्याच गोष्टींना ब्राम्हण जबाबदार होते, पण तुम्ही हे आणखी किती वर्षे सांगत बसणार आहात? स्वत:च्या अवनतीला मुख्यत्वे आपण स्वत:च जबाबदार असतो हे यांना कधी कळणार? बहुजनवाद्यांच्या आवडत्या बौद्ध धर्मात देखील अवनतीचे कारण आपण स्वत: असतो असेच सांगितले आहे. पण यांना बौद्ध धर्म फक्त हिंदू धर्म नको म्हणून, आणि केवळ वेगळे पणासाठी पाहिजे आहे, त्यांना बौद्ध तत्वज्ञान, बौद्ध धर्माप्रमाणे आचरण याच्याशी कांहीही देणे-घेणे नाही आहे.
    liked the para
    but did not like the follow para it does not reflect bahuja in all.
    बहुजनवादी लोक वापरत असलेली भाषा हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अशी भाषा वापरणारे लोक पराभूत मनोवृत्तीचे, न्यूनगंडाने ग्रासलेले, लैंगिक दृष्ट्या अतृप्त, मनोरोगी असतात. सुसंस्कृत लोक अशी भाषा वापरणा-यांच्या पासून आपोआपच दूर जातात.
    Are is speaking of socialism my friend then it is not so good as Democracy. Every system has its drawbacks and advantages. One last thing to say it that, If water is stagnant at one place then it get smell and get dirty and polluted one can not drink it. That is the present Hindu religion- you yourself can know it. What do you say about the Honorary killing,Low rate of gril-child, poverty and Distance between the rice and poor in the country. The Wealth in the temples, Gurus that are looting the people in the name of gods.

    ReplyDelete
  3. Agadi barobar aahe.tumhi far vel lavala samjayala.

    bahujanwadi swata prabal na hota ,dusryancha chuka fakt kadhat aahet,ashi pravutti ghatak aahe swatasathi.

    ReplyDelete
  4. buddha ekda mhanale hote ki "dusaryacha chuka/uniwa na pahata sarvat pahile swatachya chuka dur kelya pahije".

    ReplyDelete
  5. बहुजनांचे खरे प्रश्न शिक्षण, गरीबी, बेरोजगारी, स्थितीवाद, अंधश्रद्धा, व्यसने, अल्पसंतुष्टता वगैरे आहेत.
    What is root cause of this problems?. Yaa Uparse malam lagaoge. Address the root cause not superficial thinking.

    ReplyDelete
  6. अगदी बरोबर आहे आपल..
    संभाजी बिग्रेड सुधा जातीयवादी आहे, जितके भारतातील मागासवर्गीयांना BJP च्या राष्ट्रीय स्वय्ससेवक संघापासून धोका आहे तितकाच महाराष्ट्तील मागासवर्गीयांना रार्ष्ट्र्वादी कोंग्रेसच्या संभाजी बिग्रेड पासून आहे. कारण जसे rss मधील मनुवाद्यानी मागासवर्गीयांना हिंदू हिंदू म्हणून मुस्लीम धर्म आणि मुस्लीम समाज यांच्या विषयी द्वेष, मत्सर, तिरस्कार भरवला आणि धर्माचे केले अगदी तसेच संभाजी बिग्रेद्च्या मानिवाद्यानी (९६ k) बहुजन बहुजन म्हणून ब्राह्मण समाज यांच्या विषयी द्वेष, मत्सर, तिरस्कार भरवला. आणि त्यात डॉ संदीप पाटील याच्या सारखे जातीयवादी विचारवंत तर फार आघाडीवर आहेत.........
    या कारणामुळे मी हि बहुजनसमाज पासून दूर झालो आहे आणि ब्राह्मण कि बहुजन या भानगडीत न पडणाऱ्या आणि राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या (मग तो ब्राह्मण असेल अथवा बहुजन) "राष्टीय समाज" शी निगडीत आहे..

    ReplyDelete
  7. पुढारलेला बहुजनJuly 16, 2012 at 1:55 PM

    आतापर्यंत फक्त ब्राह्मणच "राष्ट्रीय" नावाने संघटना चालवत होते. आता बहुजनही त्यांचे अनुकरण करत आहेत हे पाहून अत्यानंद होत आहे. नाहीतरी "राष्ट्रीय" हा शब्द वापरून जनतेला मूर्खात काढण्याची या देशाची जुनी परंपरा आहे. परंपरा जपायलाच हव्यात तरच देश; सॉरी, "राष्ट्र" वाचेल.

    ReplyDelete
  8. लेख चांगला आणि विचार करण्या जोगा आहे. सध्याचा बहुसंख्य बहुजन वर्ग पुन्हा एकदा भरकटतोय, तो द्वेषाच्या राजकारणाला पुन्हा पुन्हा बळी पडतोय, कधी मुस्लीम विरोधी, कधी लुंगी विरोधी, कधी मराठी - अमराठी, आणि आत्ता तो पुन्हा ब्राह्मन्वादाच्या विरोधी न जाता तो सरळ ब्राह्मण विरोधी होत आहेत, त्याला काही संघटना जबाबदार आहेत, तुम्हाला माहीतच आहे, परंतु हा बहुजनवादी वर्ग विसरतोय कि, "द्वेषाने तर द्वेष वाढतो...होतो संघर्ष...शांती मधुनी क्रांती होते...होतो उत्कर्ष...!!!

    ReplyDelete
  9. //बहुजनवादी लोक वापरत असलेली भाषा हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अशी भाषा वापरणारे लोक पराभूत मनोवृत्तीचे, न्यूनगंडाने ग्रासलेले, लैंगिक दृष्ट्या अतृप्त, मनोरोगी असतात. सुसंस्कृत लोक अशी भाषा वापरणा-यांच्या पासून आपोआपच दूर जातात.//
    +100

    ReplyDelete
  10. खरच अप्रतिम सर्वसमावेशक महाविचार आहेत ..मीपण आता बहुजानावादापासून पूर्ण विलग झालो आहे.... मला आशाच विचारांचा ब्लोग आवशक वाटत होता समानतेसाठी सर्च करता करता महाविचार मिळाला खूप समाधान झाले

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week