सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Sunday, March 25, 2012

माझ्या धनगर मित्रांना आवाहन


-महावीर सांगलीकर

अलीकडे माझे अनेक धनगर मित्र आपल्या जातीच्या महान व्यक्तींना प्रकाशात आणत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, पण असे करताना ते एक फार मोठी चूक करीत आहेत, ती म्हणजे त्या महान व्यक्तींना माझे मित्र धनगर म्हणून पेश करीत आहेत. असे करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण असे करणे म्हणजे त्या महान व्यक्तींना जातींच्या बंधनात अडकवणे होय.

चंद्रगुप्त मौर्य, गौतमीपुत्र सातकर्णी, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर हे जन्माने आणि जातीने धनगर असतील, पण ते केवळ धनगरांचे होते काय? त्यांचे कार्य धनगरांसाठी होते काय? खरे बघितले तर या लोकांनी आपला पेशा सोडून दिला होता, त्यामुळे त्यांना धनगर समजणे चुकीचे आहे.

दुसरे म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा धनगर होता, तर मग त्याचा मुलगा बिंदुसार आणि नातू अशोक यांची नावे तुम्ही का टाळता? येशू ख्रिस्त आणि मोहमद पैगंबर हे दोघेही धनगर होते, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? खरे पाहता येशू ख्रिस्त आणि मोहमद पैगंबर ही किती मोठी व्यक्तिमत्वे, पण केवळ ते दुस-या धर्माचे म्हणून त्यांचे नाव न घेणे हे योग्य आहे का?

चंद्रगुप्त मौर्य याचा धर्म जैन होता, गौतमीपुत्र सातकर्णी याचा धर्म बौद्ध होता, पण या गोष्टी माझे धनगर मित्र लपवून ठेवत आहेत. खरे म्हणजे धनगर लोक हे सर्व धर्म समभाव मानणारे आहेत हे दाखवण्याची संधी चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, येशू ख्रिस्त, मोहमद पैगंबर, गौतमीपुत्र सातकर्णी, होळकर परीवार या सगळ्यांनी दिली आहे, पण धनगर कार्यकर्त्यांचा हिंदूत्ववाद ही संधी ठोकरून देत आहे.

मुख्य मुद्दा हा आहे की या महान लोकांना जातींच्या बंधनात अडकवणे चुकीचे आहे. ब्राम्हण का जिंकतात याचे एक कारण ते त्यांच्या लोकांना ब्राम्हण म्हणून पेश करत नाहीत. ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास हे संत असतात, ब्राम्हण नव्हे. पण दुसरीकडे नामदेव म्हणजे शिंपी आणि गाडगे बाबा म्हणजे परीट असतात. त्यामुळे धनगरांनी आपल्या महापुरुषांवर जरूर संशोधन करावे, पण त्यांना जातीच्या बंधनात अडकवू नये. नाहीतर त्यांचे महात्म्य धनगर समाजापुरतेच राहील.

10 comments:

  1. कोणत्याही जातीच्या कार्यकर्त्याने कोणत्याही बहुजन महामानवांना जातीच्या बंधनात अडकवू नये

    ReplyDelete
  2. धनगर समाज, हा संपूर्ण भारतभर ( तसेच सर्व जगभरातही ) आढळणारा समाज आहे.... तसेच तो विविध भाषिक असून, विविध धर्म - पंथांचा व विविध प्रांतात असणारा / राहणारा / आढळणारा हा विशाल समाज आहे...

    >>>>>>> Proud to be a DHANGAR / SHEPHERD <<<<<<<

    Hey hum Hindu ( Samrat Hakka - Bukka , Sant Kanakdas, Maharani Ahilyabai Holkar)

    Hey hum Aadivasi / Oraon

    Hey hum Muslim (Paigmbur)

    Hey hum Jain (Samrat Chandragupta Maurya)

    Hey hum Baudha (Samrat Ashoka)

    Hey hum Lingayat (Revanna Siddh)

    Hey hum Sikh / Gaderia

    Hey hum Christen (Jesus : The Good Shepherd)

    Hey hum Yahudi (Mozes)

    Arey.. Humhi toh hai, Bharat ke Mulnivasi / OBC...!

    Kashmir se leker Kanyakumari tak, Aur Gujarat se leker Bangal tak.. Humhi toh hai sabhi jagh.....!

    Isiliye bolo...

    Garv se kaho hum DHANGAR - KURUBA - KURUMA - KURUMBA - PAL- BAGHEL- GADERIA - ORAON - RABARI - BAKARWAL - GADDI- SHEPHERD...hai !!!!!!!

    IMP Links....Info. About DHANGAR / SHEPHERD >>>>>
    * http://en.wikipedia.org/wiki/Dhangar
    * http://en.wikipedia.org/wiki/Kuruba
    * http://en.wikipedia.org/wiki/Kurumbar
    * http://en.wikipedia.org/wiki/Oraon
    * http://en.wikipedia.org/wiki/Bakarwal
    * http://en.wikipedia.org/wiki/Gaddi
    * http://en.wikipedia.org/wiki/Rabari
    * http://en.wikipedia.org/wiki/Maldhari
    * http://en.wikipedia.org/wiki/Pal-Pali
    * http://en.wikipedia.org/wiki/Gaderia
    * http://en.wikipedia.org/wiki/Shepherd

    ReplyDelete
  3. ज्या प्रकारे प्राचीन इतिहासात सम्राट चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोक या आजोबा नातूनी धर्मनिर्पेक्षतेचे उदाहरण इतिहासात घालून दिले होते अगदी त्याच प्रकारे आधुनिक इतिहासात महाराजा मल्हारराव होळकर व महाराजा यशवंतराव होळकर या आजोबा नातुच्या जोडीने इतिहासाची पुनरावृत्ती केली होती. हिंदवी स्वराज्याच्या नावाखाली मुस्लीम द्वेष फेफावला असताना महाराजा मल्हारराव यांनी नजीब या मुस्लीम व्यक्तीस दत्तक पुत्र मानले होते. आणि महाराजा यशवंतराव यांनी भारताच्या स्वन्त्र्यासाटी मुस्लीमच काय तर शीख धर्म सुधा स्वीकारुण शीख धर्माच्या प्रचाराची तयारी केली होती. आजही उत्तरेत शीख लोक त्यांना शीख समजतात व महाराजा जसवंतराव होळकर या नावानेच त्यांना ओळखतात. आणि यामूळेचे कि काय त्यांना धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे संस्थापक मानले जाते....

    ReplyDelete
  4. @ महावीर सांगलीकरजी
    महान लोकांना जातींच्या बंधनात अडकवणे चुकीचे आहे. या आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.

    ( कोणी व्यक्ति आपणाशी वाद घालत आहे, असे एका मित्राकडून समजले...आपण त्या व्यक्ति कडे लक्ष देवू नये.... आपणाशी जे कोणी / व्यक्ति वाद घालत आहे, आम्हांस हि त्या व्यक्तिबद्दल अनेक शंका आहे ... ती कोणी व्यक्ति जातिने तरी धनगर आहे का ? याबद्दल हि आम्हांस शंका आहे...थोडेसे सावध रहावे. आपला नवा मित्र - सनी .ए )


    @Anonymous,
    आपण माझी कविता घेतल्याबद्दल धन्यवाद ! ( पण Anonymous नावाने कविता टाकल्याबद्दल व माझे नाव वगळल्या'बद्दल मी थोडासा नाराज हि आहे. )


    @ SACHIN SHENDGE
    मित्रा, खुप छान माहिती...

    ReplyDelete
  5. ( जे कोणी संकुचित आहे , खास त्या एका व्यक्ति साठीच हि माहिती व कविता लिहली होती ... पण दुर्दैवाने त्या व्यक्तिवर काही एक परिणाम झाले नाही. त्यामुळे त्यांवर अनेक शंका उपस्थित होत आहे. असो, पुन्ह एकदा पहावे / समजावे >>>>> )


    -----------------------------------


    धनगर ( Shepherds ) या शब्दाचा खरा अर्थ :

    धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज... धनवान समाज... असे अनेक अर्थ सांगितले जाते.... पण खरा अर्थ पुढील प्रमाणे आहे, ते असे...

    पूर्वी धन म्हणजे ज्या व्यक्तीकडे ' पशुधन ' जास्त आहे, तो समाज म्हणजे धनवान असा होता... आणि हे धन म्हणजे बकरी - मेंढे - उंट - घोडे – खेचर - म्हशी - गायी - हत्ती - मोर पाळणारा समाज म्हणजे धनवान समाज, धनगर समाज असा होता. बकरी / मेंढ्या पाळत पाळत नंतर तो म्हशी - गायी - उंट - घोडे - हत्ती पाळू लागला.... आणि मग काही गवळी झाले.... हत्ती पाळणारे ... मोर पाळणारे.... उंट पाळणारे... असे अनेक पशुपालक समाज नंतर बनत गेले. ‘कुरूब ( धनगर ) मुंच जाती इल्ला, कुळा इल्ला’ असे कवन कर्नाटकात म्हणूनच गायले जाते. तात्पर्य एकाच आईचे ही मुले, पण वेगवेगळ्या नावाचे... धनगर ( आई ) -> कुरुवंश ( मेष पालक ) + यदुवंश ( गो पालक ) = पशुपालक समाज !

    हे पशुधन आपल्याला मिळवन्यासाठी पूर्वी अनेक लढाया ही होत... धनगर समाज हा ' देशातील सर्वात मोठा समाज ' आहे. पाळीव पशूंची संख्या भारतात सर्वात जास्त आहे... आपला भारत हा कृषिप्रधान देश सर्वांना माहित आहे... त्यावर अनेक चर्चा ही केली आहे / होत आहे .... पण ' जगात सर्वात मोठा पाळीव पशु पाळणारा / पशुपालक असणारा देश ' हा आपला भारत जरी असला तरी पशुपालक समाजाची चर्चा येथे केली जातच नाही ! हे त्यातही विशेष... आणि याला आपण पशुपालक समाजच जवाबदार आहे. त्यामुळेचं आज खेदाने म्हणावे लागत आहे की, आपला धनगर समाज हा केवळ आता भटका राहिला नसून तो भरकटलेला हि झालेला आहे. हे विश्वची माझे घर समजणारा मेंढपाळ हा पूर्वी मुक्त वावरताना दिसत होता. निसर्गाशी जवळीक असणारा आपला धनगर समाज नंतर व आता तर अधिक विविध सीमा - प्रांत'च्या जाळ्यात अडकताना दिसू लागला / अनेक ठिकाणी त्याची अडवणूक होताना दिसले....

    धनगर समाज, हा संपूर्ण भारतभर ( तसेच सर्व जगभरातही ) आढळणारा समाज आहे.... तसेच तो विविध भाषिक असून, विविध धर्म - पंथांचा व विविध प्रांतात राहणारा / आढळणारा समाज आहे...

    ' धनगर ' या शब्दाचा खरा अर्थ दिशा देणारा / मार्गदर्शक करणारा , ( आपल्या कळपाचे / समाजाचे ) रक्षण करणारा असा आहे ( म्हणूनचं येशूला THE GOOD SHEPHERD असे म्हणतात. ). गुजरात / राजस्थान मध्ये आपल्या समाजाला रबारी (रबारी = राह्बर, राह अर्थात मार्ग दाखविणारा...) असे म्हणतात. पूर्वी अनेक मार्ग / रस्ते / यांचा शोध धनगरांनी लावलेला आहे....काही भाषेचे जनकहि मूळ धनगरचं होते असे ऐकून आहे. पुणे - मुंबई घाट मार्ग शोधणारा शिन्ग्रोबा असो.... लोहचुंबक 'चा शोध लावणारा... वा अनेक धर्माचा / पंथांचा खरा ' मानवतेचा संदेश ' देणारा हा धनगरच होता. मुळ वेद जाणणारे आणि गाणारे धनगरच होते ( पण आताचे वेद धनगरांचे नाही. )

    http://www.shabdkosh.com/ हि लिंक ओपन करा आणि सर्च मध्ये टाइप करा Shepherd. अनेक लोकांना माहित नाही की, आपल्या Shepherd / Dhangar समाजाला ' धर्मगुरू ' असेहि म्हणतात. जिझस, पैगम्बर मोहमद , मोझेस आणि त्यांची पत्नी व कृष्ण धनगर होते. काळा प्रमाणे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले. असा विश्वाला ज्ञान देणारा / दिशा देणारा आपला समाज नंतर'च्या काळात मात्र संकुचित / Limited / मर्यादित होताना दिसला ....त्यामुळे जागे व्हा ! आणि पुनः एकदा आपल्या समाजाचे नाव चारही बाजूस प्रकाशमय / तेजोमय करा !

    - सनी. ए

    >>>>

    ReplyDelete
  6. Garv Se Bolo, Hum DHANGAR / SHEPHERDS Hain...
    Aur HUM SAB EK Hain !


    Hain Hum Hindu ( Dharmguru Kishan , Samraat Hakka – Bukka , Sant Kanakdas , Maharani Ahilyabai Holkar )

    Hain Hum Muslim ( Paigambar Mohammad )

    Hain Hum Aadivasi { Oraon } ,

    Hain Hum Jain ( Samraat Chandragupta Maurya )

    Hain Hum Bauddh ( Samraat Ashok )

    Hain Hum Lingaayat ( Revan Siddh ) ,

    Hain Hum Sikh { Gaderia }

    Hain Hum Christian ( Jesus : The Good Shepherd )

    Hain Hum Jews ( Moses ) ,

    Arey... Hum Hi Toh Hain, Bharat Ka Rashtriya Samaj... Bahujan Samaj... Mool Nivaasi... OBC ,

    Kashmir Se Leker Kanyakumari Tak

    Aur Gujarat Se Leker Bangal Tak

    Alag Rajya, Desho Main

    DHANGAR - KURUBA - KURUMA - KURUMBA

    PAL- BAGHEL- GADERIA - ORAON - RABARI

    BAKARWAL - GADDI- SHEPHERDS Aadi . Alag Alag Naamo Se...

    Hum Hi Toh Hai Hain Sabhi Jagah ,

    Isiliye Kaho, Garv Se Bolo...


    Hum DHANGAR / SHEPHERDS Hain...
    Aur HUM SAB EK Hain !

    - Sunny . A ©



    >>>>>

    ReplyDelete
  7. काही महत्वपूर्ण लिंक कृपया पहावे / अभ्यासावे >>>>>

    * http://en.wikipedia.org/wiki/Dhangar
    * http://en.wikipedia.org/wiki/Kuruba
    * http://en.wikipedia.org/wiki/Kurumbar
    * http://en.wikipedia.org/wiki/Oraon
    * http://en.wikipedia.org/wiki/Bakarwal
    * http://en.wikipedia.org/wiki/Gaddi
    * http://en.wikipedia.org/wiki/Rabari
    * http://en.wikipedia.org/wiki/Maldhari
    * http://en.wikipedia.org/wiki/Pal-Pali
    * http://en.wikipedia.org/wiki/Gaderia
    * http://en.wikipedia.org/wiki/Shepherd
    * http://www.rashtriyasamaj.blogspot.com/2011/11/blog-post_22.html
    * http://www.rashtriyasamaj.blogspot.com/2011/12/garv-se-bolo-hum-dhangar-shepherds-hain.html
    * http://rashtriyasamaj.blogspot.com/2009/12/jai-mallhar-to-rayanna-nayak-mahanayak.html
    * http://rashtriyasamaj.blogspot.com/2010/02/rayanna-of-sangoli.html
    * http://dhangarraja.com/index.php?option=com_content&view=article&id=105%3A2011-11-28-15-04-37&catid=35%3Adhangar-society&Itemid=18
    * http://sagribow.sulekha.com/blog/post/2008/07/history-of-amarnath-caves.htm
    * http://www.dhangar.org/sumbaran-mandil.php
    * http://sanjaysonawani.blogspot.com/2011/11/blog-post_20.html
    * http://www.rashtriyasamaj.blogspot.in/2011/12/wishing-you-all-merry-christmas-and.html


    { वरील कवितेतील नावे KURUBA - KURUMA - KURUMBA –GADERIA / PAL / BAGHEL - ORAON - RABARI -BAKARWAL - GADDI- SHEPHERDS आदी. भारतभरातील विविध राज्यातील, देशातील आपल्या धनगर समाजाला वरील नावाने ओळखले जातात. वरील नावे या पोटजाती नव्हेत ( समाजाच्या एकत्रीकरणासाठी पोटजाती तोडा व फक्त ' धनगर ' बोला , ना पुढे काही व मागे काही.... ) Wikipedia’ मध्ये अनेक चांगली महत्वपूर्ण समाज माहिती दिली आहे, पण काही माहिती चुकीचे सुद्धा आहे / आपण तो अभ्यासावा. - सनी . ए , मुंबई }

    ReplyDelete
  8. धनगर ( Shepherds ) या शब्दाचा खरा अर्थ :

    धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज... धनवान समाज... असे व अनेक अर्थ सांगितले जाते.... पण खरा अर्थ पुढील प्रमाणे आहे , ते असे...

    पूर्वी धन म्हणजे ज्या व्यक्तीकडे ' पशुधन ' जास्त आहे , तो समाज म्हणजे धनवान असा होता... आणि हे धन म्हणजे बकरी - मेंढे - उंट - घोडे - खेचर - म्हशी - गायी - हत्ती - मोर पाळणारा समाज म्हणजे धनवान समाज , धनगर समाज असा होता. बकरी / मेंढ्या पाळत पाळत नंतर तो म्हशी - गायी - उंट - घोडे - हत्ती पाळू लागला.... आणि मग काही गवळी झाले.... हत्ती पाळणारे ... मोर पाळणारे.... उंट पाळणारे... असे अनेक पशुपालक समाज नंतर बनत गेले. ‘ कुरूब ( धनगर ) मुंच जाती इल्ला , कुळा इल्ला ’ असे कवन कर्नाटकात म्हणूनचं गायले जाते. तात्पर्य एकाच आईचे ही मुले , पण वेगवेगळ्या नावाचे... धनगर ( आई ) -> कुरुवंश ( मेष पालक ) + यदुवंश ( गो पालक ) = पशुपालक समाज !

    हे पशुधन आपल्याला मिळवन्यासाठी पूर्वी अनेक लढाया ही होत... धनगर समाज हा ' देशातील मोठा समाज ' आहे. पाळीव पशूंची संख्या भारतात सर्वात जास्त आहे... आपला भारत हा कृषिप्रधान देश सर्वांना माहित आहे... त्यावर अनेक चर्चा ही केली आहे / होत आहे .... पण ' जगात सर्वात मोठा पाळीव पशु पाळणारा / पशुपालक असणारा देश ' हा आपला भारत जरी असला तरी पशुपालक समाजाची चर्चा येथे केली जातचं नाही , हे मात्र फारचं विशेष आणि अजब ... आणि याला आपण धनगर वा पशुपालक समाजचं सर्वात जास्त जवाबदार आहोत . त्यामुळेचं आज खेदाने म्हणावे लागत आहे की , आपला धनगर समाज हा केवळ आता भटका राहिला नसून तो भरकटलेला हि झालेला आहे. हे विश्वची माझे घर समजणारा मेंढपाळ हा पूर्वी मुक्त वावरताना दिसत होता. निसर्गाशी जवळीक असणारा मेंढपाळ नंतर व आता तर अधिक विविध सीमा - प्रांत'च्या जाळ्यात अडकताना दिसू लागला / अनेक ठिकाणी त्याची अडवणूक होताना दिसले / दिसत आहे....

    धनगर समाज , हा संपूर्ण भारतभर ( तसेच सर्व जगभरातही... ) आढळणारा समाज आहे.... तसेच तो विविध भाषिक असून , विविध धर्म - पंथांचा व विविध प्रांतात राहणारा / आढळणारा / दिसनारा मोठा असा समाज आहे...

    ' धनगर ' या शब्दाचा खरा अर्थ दिशा देणारा / मार्गदर्शक करणारा , ( आपल्या कळपाचे / समाजाचे ) रक्षण करणारा असा आहे ( म्हणूनचं येशूला THE GOOD SHEPHERD असे म्हणतात. ) . गुजरात / राजस्थान मध्ये धनगर समाजाला ‘ रबारी ’ ( रबारी = राह्बर , राह अर्थात मार्ग दाखविणारा... ) असे म्हणतात. पूर्वी अनेक मार्ग / रस्ते / यांचा शोध धनगरांनी लावलेला आहे.... काही भाषेचें जनकहि धनगरचं होते , असे ऐकून आहे. पुणे - मुंबई घाट मार्ग शोधणारा शिन्ग्रोबा असो.... लोहचुंबक'चा शोध लावणारा... वा अनेक धर्माचा / पंथांचा खरा ' मानवतेचा संदेश ' देणारा हा धनगरचं होता. मुळ वेद जाणणारे आणि गाणारे धनगरच होते ( पण आताचे वेद हे धनगरांचे नाही. )

    http://www.shabdkosh.com/ हि लिंक ओपन करा आणि सर्च मध्ये टाइप करा Shepherd. अनेक लोकांना माहित नाही की , Shepherd / Dhangar समाजाला ' धर्मगुरू ' असेहि म्हणतात. जिझस, पैगम्बर मोहमद , मोझेस आणि त्यांची पत्नी व कृष्ण धनगर होते. काळा प्रमाणे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले. असा विश्वाला ज्ञान देणारा / दिशा देणारा धनगर समाज नंतर'च्या काळात मात्र संकुचित / Limited / मर्यादित होताना दिसला व काही जन (संकुचित लोक) धनगर समाजाला ‘ मर्यादित ’ करताना दिसू लागले .... आज हि धनगर समाजाचा ‘ आवाज ’ दिसत नाही... दखल नाही .... सत्ता – सम्पति - सन्मान - राष्ट्रीय भागीदारी नाही..... त्यामुळेचं ( बेदखल झालेला / केलेला / ठेवलेला / दिसत असलेला ... दबलेला / दबवून ठेवलेला .... लपविलेला / लपून बसलेला ... गर्दित आपली खरी ओळख हरवून बसलेला.... ) धनगर समाज आता जागा हो , परिवर्तनाचा धागा हो आणि पुन्ह: मुक्त हो !!!

    - सनी.ए

    ReplyDelete
  9. अगदी बरोबर आहे......कोणत्याही महापुरुषाला या जातीतील किंवा त्या धर्मातील म्हणून आपण त्यांची महानता कमी करतो असे मला वाटते. असे केल्यानी एखाद्या महान व्यक्तीवरती कळत न कळत अन्याय होत असतो

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week