सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Thursday, June 21, 2012

आर.एस.एस. आणि बामसेफ: एकाच नाण्याच्या दोन बाजू

-महावीर सांगलीकर

एकीकडे आर.एस.एस. सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत, तर दुसरीकडे त्याच समाजातील लाखो युवक बामसेफसारख्या एकांगी विचारसरणीच्या नादी लागून ब्राम्हण विरोधी झाले आहेत. हिंदुत्ववादी युवक मुस्लिमांचा प्रचंड द्वेष करतात, तसाच द्वेष बामसेफी युवक ब्राम्हणांचा करतात. पण आर.एस.एस. आणि बामसेफ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या संघटना आपला वापर करून घेत आहेत हे या युवकांच्या लक्षात येत नाही. तसे ते लक्षात येणे शक्यही नाही. कारण बहुतेक अनुयायांना आपले नेते काय सांगतात तेच खरे वाटते, या अनुयायांना डोके या नावाचा अवयव असला तरी ते त्याचा वापर करत नसतात. पण त्यांचे नेते आपल्या डोक्याचा उपयोग आपल्या बिनडोक अनुयायांचा वापर करून घेण्यासाठी करत असतात.

जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर आर.एस.एस. आणि बामसेफ: एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लगेच लक्षात येईल. या दोन्ही संघटनांच्या विचार सरणीत कमालीचे साम्य आहे. पुढील गोष्टी पहा:

आर.एस.एस. ही ब्राम्हणवादी संघटना आहे. त्यामुळे त्या संघटनेचा वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यावर विश्वास आहे. बामसेफ ही संघटना देखील तिच्या पद्धतीने वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यावर विश्वास ठेवते. एवढेच नाही, तर जातीव्यवस्था कशी भक्कम होईल यासाठी बामसेफ ही संघटना कसोशीने प्रयत्न करत आहे आणि त्यात तिला -यापैकी यशही मिळाले आहे. अलीकडच्या काळात भारतात प्रत्येक जातीत जातीयवाद वाढत गेला याचे श्रेय बामसेफ या संघटनेलाच जाते.

आर.एस.एस.ने महात्मा गांधी यांना सतत विरोध केला. याच कंपूने पुढे महात्मा गांधी यांचा खून घडवून आणला. आता बामसेफचे विकारवंत महात्मा गांधी यांचा खून आपल्या विचार सरणीतून पुन:पुन्हा करत आहेत.

आर.एस.एस. ही संघटना नेहमी काँग्रेस विरोधी राहिली आहे. बामसेफ देखील आर.एस.एस. प्रमाणेच काँग्रेस विरोधी संघटना आहे.

आर.एस.एस. या संघटनेचा नेहरू-गांधी या घराण्यावर प्रचंड राग आहे. या घराण्यावर तसाच राग बामसेफ या संघटनेचाही आहे.

ब्राम्हणवादानुसार कलियुगात केवळ ब्राम्हण आणि शूद्र हे दोनच वर्ण उरले आहेत. बामसेफमध्येदेखील याच तत्वज्ञानाचा प्रचार केला जातो. तेथे अनुयायांना ब्राम्हण सोडून सगळे शूद्र आहेत हे पुन:पुन्हा सांगितले जाते.

मला तर असे वाटते की बामसेफ ही आर.एस.एस.चेच आणखी एक विंग आहे. आपण जी कामे करू शकत नाही, ती करण्याची सुपारी आर.एस.एस.ने बामसेफ या संघटनेस दिली आहे. आर.एस.एस.ने बामसेफला महात्मा गांधी, काँग्रेस, गांधी- नेहरू घराणे याना बदनाम करण्याची, वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था भक्कम करण्याचीसुपारी दिली आहे. आर.एस.एस. ही संघटना स्वत: ही कामे आपल्या पद्धतीने करत आहेच, पण या संघटनेच्या अनुयायांना आपली पातळी सोडून शिवीगाळीच्या भाषेत बदनामी मोहीम राबवता येत नाही. बामसेफच्या नेत्यांना अनुयायांना शिवीगाळ करणे चांगलेच जमते, हा त्यांचा गुण आर.एस.एस. ला चांगलाच उपयोगी पडत आहे.

आता कोणी म्हणेल की मग बामसेफवाले ब्राम्हणांना कशा काय शिव्या देतात? तर ते केवळ दाखवायचे दात आहेत. बामसेफवाले ब्राम्हणांना शिव्या देत असले, त्याना विदेशी ठरवत असले, त्यांना भारतातून हाकलून काढण्याची भाषा करत असले तरी तरी त्यामुळे ब्राम्हणांना कांही फरक पडत नाही. उलट त्यात ब्राम्हणांचा फायदाच झाला आहे, कारण बामसेफमुळे ब्राम्हण कधी नव्हे इतके संघटीत झाले आहेत.

बामसेफचे वाचाळ लोक आपल्या भाषणातून ब्राम्हणांना भारतातून हाकलण्याच्या बाता करतात, पण या संघटनेच्या कोणत्याच बातम्या सहसा वर्तमानपत्रे वा न्यूज चानेल्सवर येत नाहीत. या संघटनेला ब्राम्हणांना खरोखरच घाबरवयाचे असते तर या वाचालांनी आपली मते सार्वजनिक केली असती. तसेच त्यांना खरोखरच ब्राम्हणांना अडचणीत आणायचे असते, तर अनेक कायदेशीर मार्ग वापरून त्यांना ते करता आले असते. पण ते तसे करत नाहीत. फक्त त्यांच्या अनुयायांना ब्राम्हणांच्या विरोधात भडकावणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. दुसरीकडे आर.एस.एस.ने देखील या संघटनेवर बंदी घालण्याची कधीच मागणी केली नाही हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

बामसेफ ही आर.एस.एस. प्रमाणेच केवळ बौद्धिके घेणारी संघटना आहे, हाही मुद्दा विचारात घेतला पाहिजे.

हेही वाचा:
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
हिंदू धर्माला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे


13 comments:

  1. सर यात तथ्य दिसून येत नाही . तूम्ही कूठलाही पूरावा किंवा अभ्यासू मताला वघळलेल दिसतय . आणि तूमच्या या लेखातून गांधी प्रेम थोड जास्तच उफाळून आलेल दिसतय .

    ReplyDelete
  2. हे लोक पुरावा कशाला मागे ठेवतील? निरपेक्ष दृष्टीने अभ्यास करणा-यासच या गोष्टी कळू शकतात.

    ReplyDelete
  3. Totally Agree--
    Pramod Mulik

    ReplyDelete
  4. intresting view to really think seriously... !

    ReplyDelete
  5. Does this article mean anyone who is opposing congress and Gandhi family have to belong to RSS or बामसेफ. Does this mean that u support Gandhi family and Congress or anyone in this country who is secular needs to support Gandhi family and Congress?

    ReplyDelete
  6. Mahaveeji,kharach Nirpeksha drushtine RSS che avlokan kara.
    RSS chi sevakarye , Anushasan,samajik samrasata nirlaspane kam karnare lakho swamsevak,prakhar rastrabhakti jagrut karnari sanghatana ahe.RSS che hajaro sevabhavi prakalp apan jarur Abhysa.Prasna Purvagrahdushit drustikon asala ki saglach vait disat mahaveerji....

    ReplyDelete
  7. मला तुमचे लेख आवडले. पण काही वेळा तुमचे विचार हे पूर्वग्रहदूषित वाटतात. आपण कधी संघाच्या शाखेत गेला आहात का? संघामध्ये जातीव्यवस्था अजिबात पाळली जात नाही. बाबासाहेबांनी पण एकदा शाखेला भेट दिली होती आणी तेव्हा सगळ्या जातीचे लोक एका पंगतीला जेवायला बसेलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले होते.मी स्वत: शाखेत गेलो आहे, बरेचशे प्रचारक माझ्या ओळखीचे आहेत हे कधीही जाती पळताना दिसत नाहीत.

    ReplyDelete
  8. सहमत !!! पण बामसेफ आणि आर एस एस एकाच नाण्याच्या दोन बाजू नाही तर आर एस एस ने मुख्य अडथला अम्बेद्कार्वाद बाजूला सारण्यासाठी कपट नीतीने विचारपूर्वक रचलेले शरसंधान आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. आंबेडकर वादाचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे संघ

      Delete
  9. कुठे तो देशप्रेमी, धर्माभिमानी, देशसेवेसाठी सदा कार्यरत असलेला संघ आणि कुठे ती ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडून जातीद्वेष पसरवणारी बामसेफ.
    RSS हि ब्राह्मणवादी नाही.RSS हि हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी संघटना आहे. संघात कुठेही ब्राह्मण हा शब्दही उच्चारला जात नाही. केवळ संस्थापक ब्राह्मण म्हणून संपूर्ण संघटना ब्राह्मणवादी ठरत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. कुलकर्णी नुसता संस्थापकच नाही तर आज पर्यंत जेवढे संघ प्रमुख झाले ते कोणत्या जातीचे आहेत ते जरा बघा , लोकांना आत्ता खोटे बोलून वेडे करता येत नाही, बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेविरोधात आयुष्यभर लढा दिला बा म से फ ब्राह्मणांना शिव्या देते ते चुकीचेच आहे पण आर एस एस हि देशप्रेमी आणि जातीभेद मनात नाही हो विचार एक तर धूर्त किंवा वेडेपणाचा असू शकतो .

      Delete
    2. सर। तसे वववाटने साहजिकच आहे. ब्राह्मणाला शिव्या देणारी वामनी बामसेफ ब्राह्मणापेक्षा बहुजनांच्ययया चळवळीचे जास्त नुकसान करते.मायावतीचा बसपा ब्राह्मण दलित युती घडवुन आणण्याचा प्रयत्न करतात .नकली बामस ेफ वाले श्ती तोडतात. दोन्ही समाजामध्ये भांडन लावतात .त्याचे राजकीय नुकसान बहुजांचे होते.

      Delete

महाविचार LATEST

Popular Posts This Week