सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, July 4, 2012

मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात

-महावीर सांगलीकर

भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचार करत आहेत. त्याही पुढे जात या विदेशी ब्राम्हणांना भारतातून हाकलून काढण्याची भाषा करत आहेत.

ब्राम्हण भारतात उपरे आहेत आणि आपण इथले स्थानिक लोक आहोत असे म्हणणारे लोक मानवाची उत्क्रांती आणि त्याचे स्थलांतर याविषयी कांहीही जाणत नाहीत. तसेच भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक प्रकारचे लोक येत राहिले आणि त्यात या तथाकथित मूळनिवासीयांचे पूर्वज देखील होते हे त्यांना माहीत नाही.

मानवाचा जन्म आफ्रिकेतला
मुळात मानव या प्राण्याचा जन्म आफ्रिकेत झाला हे मानववंशशास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे. मानववंशशास्त्रज्ञांच्या या दाव्याला कांही लोकांचा विरोध असला तरी तो विरोध भावनिक पातळीवरचा आहे, त्यामुळे त्या विरोधाला कांही अर्थ नाही. मानवाची उत्पत्ती आफ्रिकेतील आजच्या इथिओपिया देशात झाली व तेथून तो उत्तर आफ्रिकेत, तेथून आजच्या अरबस्थान या भागात गेला. पुढे त्यांच्यातील कांही समूह पश्चिमेकडे युरोपमध्ये गेले, दुसरे कांही समूह भारतीय उपखंडात आले. कांही समूह चीनकडे वळले. या स्थलांतराला लाखो वर्षे लागली. मानववंशशास्त्रज्ञांनी मानवाचा हा प्रवास कसा आणि कधी झाला हे मानवाच्या सापडलेल्या सांगाड्यांच्या कार्बन डेटिंग वरून तसेच आजच्या मानव समूहाचे जिनेटिक परीक्षण करून सिद्ध केली आहे.

भारतात सगळेच उपरे
जर मानवाची उत्पत्तीच भारताबाहेरची आहे, तर भारतातील कोणताच समूह मूळनिवासी असू शकत नाही, ही गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी स्वच्छह आहे. हे झाले प्राचीन मानवाबद्दल. आता भारताचा गेल्या पाच हजार वर्षाचा इतिहास बघितला तर संस्कृतीचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला दिसतो. सिधू संस्कृतीतील लोक पुढे पंजाबकडे, मग गंगा-यमुनेच्या खो-यात आणि मग दक्षिणेकडे सरकले असे दिसते. मूळनिवासीवादी लोक स्वत:ला सिधू संस्कृतीचे वारसदार समजतात. मग ते सध्या जिथे रहातात तिथे ते सिंधू संस्कृतीच्या प्रदेशातून आले असे मानावे लागेल. बरे हे सिंधू संस्कृतीतील लोक तेथे आले कोठून? ते तेथे जमिनीतून तर उगवले नव्हते, आणि गंगा-यमुनेच्या खो-यातूनही तिकडे गेले नव्हते. अर्थातच त्यांचे मूळ आणखी पश्चिमेकडे, इराण-इराक या भागात असले पाहिजे. म्हणजे तथाकथित मूळनिवासी हे भारतातील मूळनिवासी नाहीत हे सिद्ध होते.

भारताच्या माहीत असलेल्या इतिहासात येथे भारताबाहेरून अनेक टोळ्या आल्या आणि पुढे इथेच स्थायिक झाल्या. त्यात ग्रीस वरून आलेले ग्रीक, तिबेटमधून आलेले मंगोलोईड वंशाचे लोक, इजिप्त, अरब प्रदेश, इराण या भागातून आलेले शक, याशिवाय हूण, कुशाण, मोगल, ताझिक, उझबेक, अरब, इराणी, आफ्रिकेतून आलेले हबशी अशा अनेकांचा समावेश होतो. या लोकांचे एकमेकांशी लग्न संबंधही झाले. त्यामुळे आजचा भारतीय समाज हा वेगवेगळे वंश आणि टोळ्या यांचे अजब मिश्रण आहे. त्यामुळे कोणी स्वत:ला मूळनिवासी आणि ब्राम्हणांना विदेशी समजत असेल तर तो एक मूर्खपणा आहे.

मूळनिवासीवादी लोकांना नागवंशाचे फार कौतुक आहे. हे नागवंशी लोक म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून तिबेटमधून भारतात आलेले मंगोलोइड वंशाचे लोक होत. त्यामुळे नागवाशीयांना मूळनिवासी मानणे हास्यास्पद आहे.

मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात
भारतीय घटना मूळनिवासीवादाचे समर्थन करत नाही हे मूळ निवासीवाद्यांच्या लक्षात येत नाही. ते जेंव्हा ब्राम्हणांना विदेशी ठरवून भारताबाहेर हाकलण्याच्या गोष्टी करतात तेंव्हा घटना पायदळी तुडवत असतात हे त्यांना कळत नाही. खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनीही ब्राम्हणांना भारताबाहेर हाकलण्याची गोष्ट कधीच केली नाही, आणि मूळनिवासीवादाचे समर्थनही केले नाही. त्यामुळे मूळनिवासीवादी लोक भारतीय घटनेचा आणि बाबासाहेबांचा सातत्याने अपमान करत आहेत असेच म्हणावे लागेल.

बौद्ध धर्मात कुणालाही परके मानले जात नाही. पण बौद्ध धर्म आचरणात आणण्याऐवजी त्याचा राजकारणासाठी उपयोग करणा-यांकडून आपण काय अपेक्षा करणार?

मूळनिवासीवाद म्हणजे वंशवाद आहे. या वंशवादाला वेळीच आवर घातला पाहिजे.

9 comments:

  1. माफ करा मी तुमच्या मताशी सहमत नाही.
    आज पर्यंत भारतीय साम्राज्याचा इतिहास असा आहे की, भारतीय राजे असो वा सम्राट यांनी मुद्दामहुन दुसर्‍या राज्यावर अतिक्रमण वा स्वारी केलेली नाही आणी ती साम्राज्य वाढविण्यासाठीतर नाहीच नाही. म्हणुनच स्वरक्षणासाठी आरमार आहे परंतु कोणतेही सबब पुढे करुन युद्ध करण्यास भारतीय घटना समर्थन देत नाही.
    भारतात सोन्याचा धुर निघत होता असे म्हणले जाते परंतु सत्य मानले तर भारतीय व्यापारी भारताबाहेरची बाजारपेठ शोधण्यास गेलेला इतिहासात कधीच भेटले नाही [तसे असेल तर जरुर संदर्भ सांगा जसे पश्चिमेकडील व्यापारी आले व राज्यकर्ते झाले].
    भारतात जातीभेद, शिवताशिव, वर्णभेद यासारखे प्रकार कधीच नव्हता, परंतु स्वत:ला ब्राम्हण म्हणवणारी जमात [जी पर साम्राज्यातुन बहिष्कृत, हाकलुन दिलेली, कारस्थानी वा उपाशी लोक होते] ज्यावेळी आले इथली संस्कृती, राहणीमान व समाजरचना बघुन हक्के बक्के झाले व लालच सुटली आणि त्यांनी इथेच राहण्याच्या उद्देशाने बरोबर नियोजन बद्ध कार्यवाही केली बाकी तुम्ही शाहणे आहातच....
    आता राहता राहीला मुलनिवासी प्रश्न, भारतास 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र मिळुन सुद्धा भटक्या, विमुक्त, आणी अशा अनेक जमाती व जाती आपल्या कोणत्याच प्रवाहात नाहीत हे तर नक्कीच तुम्हास ठाऊक असणार. ते आजही ते शहरीच काय गांववाशियांना देखिल आपल्यातले मानत नाहीत [तो त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा व परिस्थितीचा परिणाम]. त्यांना भिक मागण्याची सवय नाही म्हणुन तर गांव वाडी सोडुन डोंगर भागात स्वाभिमानाने स्व-कष्टाने जगतात. "अधिकार" हा शब्द तर त्यांच्या शब्दकोशातच नाही...
    मग कशी जाण करुन देणार त्यांना, आम्ही कालचे इंग्रज काय परवाचे मुस्लिम यांना देखील कधी मनापासुन बाहेरचा रस्ता दाखविला नाही तर ब्राम्हणास आता कसे कसा काय दाखऊ!!! आता ब्राम्हण भारताचा अविभाज्य घटक बनला आहे, म्हणुन तर बाबासाहेबांनी दलित उपेक्षित वर्गासाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी करावी लागली व ती देखील एका ब्राम्हणवाद जपणार्‍या व्यक्तीचा जीवनाचा विचार करुन माघार घेतली....
    तर सांगायचे एवढेच मुळनिवासीवाद अभिमान आहे याला वंशवाद म्हणु नका. तुम्ही बुद्धीवादी आहात, जरा विचार करा इतके वर्ष ब्राम्हण समाज इतर समाजापासुन अलिप्त राहु किंवा टिकु शकला असता काय?

    ReplyDelete
    Replies
    1. very nice...hopes! one who able to understand will understand

      Delete
  2. to unknown above - mr sanglikar is refering to the propoganda which is running at its highest on social media like facebook, blogs etc. do visit some of them and you will know the reality.

    mr. sanglikar - i have noticed drastic change in your writings in last 2-4 months. i am glad that your criticism is turning into constructive, rather than bashing just for the sake of it

    ReplyDelete
  3. तुमचा ग्रेस होणे अटळ आहे

    महावीर साहेब,
    तुमचा ग्रेस होईल. आयुष्यभर बामणी ग्रंथांतील प्रतिमा उचलून कविता पाडणाèया ग्रेसांना बामणांनी कधी आपले मानले नाही. मृत्यूच्या १ वर्ष आधी ग्रेस म्हणाले होते, ‘दलित मला आपले मानित नाहीत, आणि बामन माझा शर्ट काढून जानवे शोधू पाहतात.' तुम्ही किती बामणांची वकिली केली तरी शेवटी बामन तुमचा शर्ट वर करून जानवे शोधायला जातीलच. छातीवर जानवे नसलेले पाहून ते तुम्हाला ठोकर मारतील. ही काळ्या दगडावरची रेघ समजा.

    ReplyDelete
  4. तुमचे म्हणणे बामणांनी ऐकले पाहिजे!

    महावीर साहेब,
    तुम्ही ढिग म्हणाल हो, ब्राह्मण विदेशी नाहीत म्हणू, पण बामणांनी ते ऐकले पाहिजे ना? आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले, हे सिद्ध करण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी ‘द आक्र्टिक होम ऑफ वेदाज' हे अख्खे पुस्तक लिहिले. आर्यांची उत्पत्ती भारताबाहेर शोधणारा मॅक्समुल्लर बामणांना आपला भाऊबंद वाटतो. या तर फार दूरच्या गोष्टी झाल्या, गेला बाजार आजच्या इंटरनेटवरही हाच विचार ब्राह्मणांनी स्वीकारलेला आहे. विकिपीडियावर ब्राह्मणा या विषयाचा सर्च देऊन पाहा, तुमचा भ्रम गळून पडेल.

    टिळक स्वीकारायचा की, सोनवणी? या प्रश्नाचे उत्तर बामण टिळक असेच देतील. बामणांना नको असतानाही तुम्ही त्यांचे वकीलपत्र घेतले आहे, असेच यावरून दिसते.

    --समीर पाटील बोरखेडकर

    ReplyDelete
  5. मराठा समाजाने ब्राह्मणांचा द्वेष करू नये, असे मला वाटते. माझी भूमिका समजून घेण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या. ब्लॉगचे नाव आहे : सर्वसमाज. तसेच ब्लॉगची लिन्क आहे : http://sarvsamaj.blogspot.in/

    ReplyDelete
  6. खरतर कोणत्याच समुदायाने कुणाचच द्वेष करण्यात काही अर्थ नाही. इतिहासाचे चिंतन होणे गरजेचे आहे पण त्याचा मागोवा घेता घेता, "हा असा नि तो तसा" असे म्हणत बसण्यात काही अर्थ नाही. उलट घेण्यासारखे जे आहे ते घेऊन आधुनिक विचारांचे समर्थन करायला हवे.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week