-महावीर सांगलीकर
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि भारतात बहुजन या दोन शब्दांची खूप चलती आहे. पण जसे मराठी म्हणजे नक्की कोण हे ज्याच्या-त्याच्या सोयीनुसार, गरजेनुसार आणि समजुतीनुसार ठरते तसेच बहुजन या शब्दाचेही आहे.सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता -संत तुकाराम
मराठी माणूस म्हणजे ज्याची मायबोली मराठी आहे तो असा या शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे. पण अनेक लोक महाराष्ट्रीय म्हणजे मराठी असे समजतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक हे 'मराठी ' असत नाहीत. तसेच 'मराठी-मराठी' अशी ओरड करणा-यांचे प्रमाण महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजात जास्त आहे. त्यांच्या दृष्टीने मराठी माणूस या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे 'मराठी ब्राम्हण' असाच असतो.
असाच घोळ बहुजन शब्दाबाबत आहे. हा शब्द पाली भाषेतील साहित्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. भगवान गौतम बुद्धांनी हा शब्द अनेकदा वापरलेला दिसतो. त्यांनी खुद्द भगवान महावीर यांच्याबद्दल 'बहुजन सम्मत' हा शब्द वापरलेला आहे.
आज बहुजन हा शब्दाचा अर्थ मराठी या शब्दाप्रमाणेच ज्याच्या-त्याच्या सोयीनुसार, गरजेनुसार आणि समजुतीनुसार घेतला जातो. ब्राम्हण सोडून इतर सगळे बहुजन अशी बहुजन या शब्दाची आजची एक लोकप्रिय व्याख्या आहे. पण दुसरीकडे कांही लोक मराठ्यांना बहुजन मानायला तयार नाहीत. पण ब्राम्हण हे बहुजनात मोडत नाहीत यावर मात्र सगळ्यांचे एकमत आहे.
भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध हे दोघेही बहुजनांचे धार्मिक नेते होते. पण बहुजन या शब्दाचा अर्थ आज जो घेतला होता तोच अर्थ भगवान बुद्ध घेत असत का, पाली भाषेच्या शब्दकोशात या शब्दाचा काय अर्थ आहे हे आपण तपासले पाहिजे.
बहुजन या शब्दाचा खरा अर्थ 'बहुतांश लोक' (Majority of the people) असाच आहे, ब्राम्हणेतर असा मूळीच नाही. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध या दोघांच्या प्रमुख शिष्यांमध्ये ब्राम्हण शिष्यांची संख्या फार मोठी होती. इतकी मोठी की बहुजन शब्दाचा खरा अर्थ घेतला तर ब्राम्हण हेच बहुजन ठरावेत. (या दोघा महापुरुषांच्या ब्राम्हण शिष्यांवर मी स्वतंत्र लेख लवकरच लिहीत आहे).
हे दोघे महापुरुष समतावादी होते आणि त्यांचे धर्म सर्वांसाठी होते. त्यात ब्राम्हणांना बंदी नव्हती. बहुजन या शब्दाच्या आज घेतल्या जाणा-या अर्थाच्या संदर्भात बोलायचे तर त्यांचे धर्म सर्व जन हिताय होते, बहुजन हिताय नव्हे.
खरे म्हणजे बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्माच्या प्रचार प्रसारात ब्राह्मणांचे फार मोठे योगदान आहे. ही गोष्ट या दोन्ही धर्मांच्या अनुयायांना फारशी माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे ते या विषयावर फारसे बोलत नाहीत. खरे म्हणजे समाजातील 'वरची' जागा सोडून समान पातळीवर येणा-या त्या ब्राह्मणांचे कौतुकच करायला पाहिजे. दुसरीकडे आजचा ब्राम्हण समाजही याबाबतीत अज्ञानी आहे, कारण त्या समाजाला वैदिक धर्मापलीकडचा त्यांचा स्वत:चा इतिहास फारसा माहीत नाही.
अनेक शब्दांचे अर्थ काळाच्या ओघात बदलत असतात. बहुजन या शब्दाचेही तसेच झाले आहे. पण त्या शब्दाचा आजचा अर्थ त्याच्या मूळ अर्थावर लादणे चुकीचे आहे.
बहुजन या शब्दाचा खरा अर्थ 'बहुतांश लोक' (Majority of the people) असाच आहे....
ReplyDeleteआजचा ब्राम्हण समाजही याबाबतीत अज्ञानी आहे, कारण त्या समाजाला वैदिक धर्मापलीकडचा त्यांचा स्वत:चा इतिहास फारसा माहीत नाही.
खूपच मोलाची माहिती दिलीत. धन्यवाद!
ओबामा चा मुलगा हा भारतात मोठा झाला आणि तेणे ब्रामान लोकांशी लग्न केले....
Deleteहै सर्व काही खोटे आहै ब्रामन यांचे वर्चस्व दाखवण्या चे बरे प्रयन्त आहै पण जे है मानणार है मुर्ख असणार कारण कि ज्याने है लिहिले तो ब्रामन तो कसा काय सोताचा जातीला खाली दाखविणार है तुमाला समजल पाहिजे. मी इतिहास मध्ये phd केली आहे आनी govm. मध्ये बुद्ध यांचा वर रिसर्च करत आहे.
अनेक शब्दांचे अर्थ काळाच्या ओघात बदलत असतात. बहुजन या शब्दाचेही तसेच झाले आहे. आजच्या आधुनिक काळात बहुजन या शब्दाचा खरा अर्थ प्रस्तापिताकडून शोषिले जाणारे "शोषित लोक" असा घेतला जाऊ शकतो. मग ते शोषित लोक संखेने बहुसंख्याक असोत अथवा अल्पसंख्याक....
ReplyDeleteBahujan he vaitaglele lok ahet mag te konihi aso.
ReplyDeletexactely sirjee we need such type of explanation and not hate speeches delivered by fake bahujan-wadi thnx
ReplyDeleteमस्त..! छान स्पष्टीकरण मांडले
ReplyDelete