सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Sunday, July 15, 2012

बहुजन तरुणांनी आत्मपरीक्षण करावे.....

-महावीर सांगलीकर

परवाच मी कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा प्रसिद्ध धबधबा बघायला गेलो होतो. ही ऑफ सिझन ट्रीप होती, पाऊस नसल्याने हा धबधबा ज्या घटप्रभा नदीवर आहे, ती कोरडीच होती. त्यामुळे धबधब्यालाही एवढी शोभा नव्हती. पण गेलो ते बरे झाले, कारण मला कोरड्या नदीच्या खडकाळ पात्राचे सुंदर फोटो काढता आले.

पण माझा हा लेख कांही त्या धबधब्यासंबंधी, नदी संबंधी अथवा फोटोग्राफीसंबंधी नाही. हा लेख बहुजनांच्या विचित्र वागणुकीसंदर्भात आहे.

आपण झुलत्या पुलावरून नदीचे पात्र ओलांडून पलीकडे गेलो की तेथे एका उंच टेकाडावर एक शिवाचे मंदीर आहे. आणखी उंच गेलो की आणखी एक मंदीर आहे, तेही शिवाचेच आहे. ही दोन्ही मंदिरे हेमाडपंथी पद्धतीची असून किमान ७००-८०० वर्षे जुनी असावीत. ऐतिहासिक ठेवा असणारी ही दोन्ही मंदिरे ट्रीपला येणा-या अनेक तरुणांनी आपली व आपल्या प्रेयश्यांची नावे लिहून विद्रूप करून टाकली आहेत. विशेष म्हणजे ही नावे पक्क्या पांढ-या रंगात लिहिलेली आहेत. अशी नावे लिहिणारे हे तरुण नेमक्या कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत?

अशी नावे लिहून मंदीर विद्रूप करणारे हे तरुण नेमक्या कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत? ते ब्राम्हण असू शकत नाहीत, कारण ब्राम्हण तरुण आणखी कांहीही उद्योग करतील, पण मंदीर विद्रूप करणार नाहीत. अर्थातच हा उद्योग करणारे तरुण बहुजन समाजातील आहेत. हे नुसतेच बहुजन तरुण नाहीत, तर मराठी भाषिक बहुजन तरुण आहेत, कारण कर्नाटकात असणा-या या मंदिरावर कन्नड भाषेत एकही नाव लिहिलेले नाही, सगळी नावे मराठी भाषेत लिहिली आहेत. म्हणजेच हा उद्योग महाराष्ट्रातून येणा-या बहुजन समाजातील तरुणांनी केलेला आहे, करत असतात, हे कुणीही सांगू शकेल.

असाच प्रकार मी महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवरही बघितला आहे. तेथे तर त्यांनी एकही ऐतिहासिक वास्तू सोडली नाही.

ज्या लोकांच्या तावडीतून मंदिरे, किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू देखील सुटत नाहीत, त्यांच्याविषयी काय बोलावे? त्यांचे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे, आणि आपली काय योग्यता आहे हे जाणून घ्यावे.

2 comments:

  1. Malvika Maurya
    वैदिक भट-बामण सध्या भारतामध्ये ठिकठिकाणी ''पाउस पडावा'' म्हणून अश्या पद्धतीचा ''जलपूजन विधी'' करीत आहेत.
    ३ जुलै रोजी अहमदाबादेत अश्याच पद्धतीचा जलपूजन विधी पार पडला.
    ज्यांना असा विधी बघायचा असेल त्यांनी उद्या घोरादेश्वर च्या बौद्ध लेण्यांमध्ये उपस्तीत राहावे. विश्वहिंदू परिषद संचालित बजरंग दल मावळ प्रखंड समितीच्या वतीने उद्या सकाळी सोमवारी 8 वाजता देहू जवळील घोरादेश्वरच्या बौद्ध लेण्यांमध्ये पर्जन्य यज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रखंड मंत्री अजित शेलार व बजरंग दल संयोजक अमोल पगडे यांनी सकाळला दिली....!!!!!!
    विशेष म्हणजे आय्यापण मंदिर आणि मुरगन मंदिरे अशी देहुरोड जवळील ठिकाणे सोडून यांना पाऊस लेण्यांवरच पडायचा आहे..!!

    ReplyDelete
  2. hi post atishay chukichi aahe sanglikar... bahujan tarunach asle udyog kartat, brahman nahi ase mhanane ha shuddha wedepana aahe.. brahman samajat suddha ashe kityek hire sapadtil tumhala .. tumhi buddhiwadi aahat.. changla lihita mag asa madhech wedyasarkha kaay aahe he.. totally meaningless..

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week