सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, July 31, 2012

कविता: प्रतिक्रिया विरोधकांच्या

जेंव्हा मी सत्य सांगतो
तेंव्हा ते अनेकांना खटकते
माझे मुद्दे येत नाहीत
खोडता त्यांना

मग विषयांतर करून
ते ठरवतात मला
कुणाचा तरी दलाल

काहींना तर कळतच नाही
मला काय म्हणायचे आहे ते
काहींना ते कळते चांगलेच

कांहीजण देतात शिव्या
त्यांच्याकडे देण्यासारखे
दुसरे कांहीच नसते

क्वचित कुणी देतात
धमकी फोनवर
लगेच काटतात फोन
घाबरून मला

मुद्यावरून गुद्यावर
मलाही येता येते
पण संस्कृती माझी
मला आडवते

-महावीर सांगलीकर

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week