-महावीर सांगलीकर
नासामधील ५० टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत.......नासाने केली २००० संस्कृत तज्ञाची नेमणूक......गौतम बुद्ध, महावीर, अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सीटीने मेकर्स ऑफ युनिव्हर्स जाहीर केले.... या तीन गोष्टी आपल्या कानावर आल्याच असतील. या तीन गोष्टीत एक मोठे साम्य आहे, त्या म्हणजे या निव्वळ अफवा आहेत. यातील पहिल्या दोन अफवा सोडणारे आणि तिसरी अफवा सोडणारे लोक वेगवेगळ्या गटातले आहेत एवढाच काय तो फरक.
आपण नासाच्या वेबसाईटवर जावून सर्च केल्यास तेथे भारतीय शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर तर सोडाच, छोट्या प्रमाणावर देखील सापडणार नाहीत. तसेच नासाने संस्कृत तज्ञांची नेमणूक केल्याची बातमीही तेथे सापडणार नाही. पण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला अनेक भारतीय वेबसाईट्स वाचायला मिळतील. कांही दैनिकांच्या वेब साईट्सनी देखील अशा बातम्यांची शहानिशा न करता त्या प्रकाशित केलेल्या दिसतात. या खोट्या बातम्यांचे निर्माते अर्थातच 'उजव्या' विचारसरनीचे लोक असतात.
वर दिलेल्या अफवांपैकी तिसरी अफवा 'गौतम बुद्ध, महावीर, अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सीटीने मेकर्स ऑफ युनिवर्स जाहीर केले' ही देखील अशीच मजेशीर आहे. मेकर्स ऑफ युनिवर्सच्या जगातील शंभर लोकांच्या यादीत हे चार जण आहेत, तेही पहिल्या चार स्थानांवर. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सीटीची ही बातमी तिच्या वेबसाईटवर कोठेच नाही. पण वरील दोन अफवांप्रमाणे ही अफवा देखील अनेक भारतीय वेबसाईट्स आणि इंटर नेटवरील कांही भारतीय वर्तमान पत्रे यांनीच प्रकाशित केली आहेत. या बातमीचा निर्माता बहुजनवाद्यांचा एक गट आहे.
ऑक्सफोर्ड किंवा इतर कोणत्याही पाश्च्यात युनिव्हर्सीटीने १०० मेकर्स ऑफ युनिवर्स जाहीर केले तर त्यात पहिल्या चार स्थानात येशू ख्रिस्त, महमद पैगंबर, महात्मा गांधी या तिघांची नावे हमखास येतील. गौतम बुद्ध, महावीर, अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान असले तरी आणि १०० लोकांच्या यादीत समावेश होण्यासारखे असले तरी ते पहिल्या चार स्थानावर येवू शकत नाहीत, कारण त्यांचा जागतिक प्रभाव फारसा नाही. अफवा सोडणा-यांनी शंका येवू नये म्हणून यात महावीरांचे नाव घुसडलेले दिसते, पण या चौघांना पहिले चार ठरवून शंकेला जागा ठेवली.
उजव्या विचारसरनीचे काय किंवा बहुजनवादी काय, असल्या अफवा का सोडतात? तर त्याचे कारण असे आहे की त्यांना आपला इगो कुरवळायचा असतो. त्यांच्यामध्ये हा इगो न्यूनगंडातून तयार झालेला असतो. ज्या गोष्टी प्रत्यक्षात येवूच शकत नाहीत, त्यांची ते स्वप्ने बघतात. आपले स्वप्न पुरे होवू शकणार नाही हे त्यांना आधी पासूनच माहीत असते, त्यामुळे कोणत्या तरी एका क्षणी ते अफवांचा आश्रय घेतात. मग या अफवा त्या त्या गटाच्या अनुयायांमध्ये वा-यासारख्या पसरत जातात. अनुयायीच ते, कसलीही शहानिशा न करता ते अशा अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात, तिचा प्रचारही करत सुटतात. कारण ती अफवा नसून बातमी आहे असेच त्यांना वाटते.
हेही वाचा:
वैचारिक विकासातील मानसिक अडथळे
चिकित्सा नको असणारे लोक
सुनीताची गगनभरारी आणि भारतीयांची मानसिकता
वैचारिक विकासातील मानसिक अडथळे
काय तरी फालतू पणा आहे, ऑक्सफर्ड काय किवा नासा काय हि बांडगुळे काय ठरवणार जगाचे निर्माते, मी म्हणतो तुमच्या आदर्शाची नावे त्यांनी घावी हा अट्टाहास का? उजवे असो किवा दावे असो सगळे खोटारडे असतात. आता तुम्ही म्हणता त्यांच्या यादी मध्ये येशू आणि प्मुहम्मद पैगंबर यांना स्तःन आहे. अर्थात असणार कारण यांच्या नावाने स्वताला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून घेतलेले जगात जास्त आहेत somebody has said that if you want cure for Christianity read BIBLE it is full of lies....a common person will know....I tell you it starts from GOD created world then he created land than water then trees and men and then women etc it too some 15 or around days to create the world to GOD. (then he must have seen the world and said to himslef ohh I am awesome I have made so awesome thing, isnt it?) age of earth is not more than 7000 years as per BIBLE....now if it is written by Jesus himself or not is a question.........so please do not glorify.......Chrtianity or Islam to fire slavo at your enemies in India...even though you are telling truth that there are very less Indian people NASA.
ReplyDeletehttps://www.facebook.com/photo.php?v=635985189826826&saved
Delete