सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, December 20, 2011

हिंग्लिश नव्हे, हिंदीच

-महावीर सांगलीकर

सध्या 'हिंग्लिश' या तथाकथित भाषेची जोरदार चर्चा सुरू आहे. हिंदी भाषेत इंग्रजी शब्द वापरल्याने हिंदी ही हिंग्लिश कशी काय होईल? प्रत्येक भाषेत दुस-या भाषेतील अनेक शब्द वापरण्यात येत असतात. त्यामुळे कांही त्या भाषेचे नाव बदलत नसते. खुद्द मराठी भाषेत आपण अनेक इंग्रजी शब्द वापरत असतो, म्हणून तिला आपण मरांग्लीश किंवा इंग्राठी असे म्हणतो काय? मराठीत फारशी भाषेतील शब्द हजारोंच्या संख्येने आहेत म्हणून मराठी काय फाराठी होईल?

'हिंग्लिश'ची चर्चा सुरू होण्यामागे केंद्र सरकारचे नवीन पत्रक कारणीभूत आहे. या पत्रकात कोठेही 'हिंग्लिश' भाषा वापरावी असे सांगितलेले नाही. हिंदी वापरताना सगळ्यांना कळतील असे सोपे शब्द वापरण्याची, प्रसंगी इंग्रजीसह इतर भाषांतील शब्द वापरण्याची सूचना या पत्रकात केली आहे. खरे म्हणजे भाषाशुद्धीच्या नावावर हिंदीत घुसवण्यात आलेले कृत्रिम संस्कृत शब्द वापरू नयेत असे हे पत्रक आडवाटेने सुचवते.

भारतीय भाषांवर संस्कृतचे झालेले आक्रमण परतवण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे पहिले पाउल आहे. केंद्र सरकारचे अभिनंदन. महाराष्ट्र सरकारनेही आता मराठीतील संस्कृत शब्दांची हकाल पट्टी करण्यासाठी लगेच पाउले उचलायला पाहिजेत. संस्कृतचे भारतीय भाषांवर झालेले आक्रमण या विषयावर मी माझ्या संस्कृत भाषेचे गौडबंगाल या पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे.

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week