सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, August 18, 2012

कविता: भविष्यात एक दिवस

भविष्यात एक दिवस
असा आला या देशात
एकही मुसलमान
शिल्लक नाही राहिला
मग ते लाठीधारी हिंदुत्ववादी
फोडू लागले डोकी हिंदूंचीच

भविष्यात एक दिवस
असा आला या देशात
सगळे ब्राम्हण गेले
निघून अमेरिकेला
मग बहुजनांत लागली
स्पर्धा ब्राम्हण होण्याची

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week