-महावीर सांगलीकर
'Common Sense is the Most Uncommon Thing'
भारतीय घटनेने भारताच्या नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. कांही लोक याचा अर्थ असा घेतात की भारतीय घटना लागू होण्यापूर्वी या देशात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यच नव्हते. पण प्रत्यक्षात भारतात फार प्राचीन कालापासून अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य होते आणि ते भारतीय घटना लागू होण्यापूर्वीपर्यंत होईपर्यंत चालूच होते. भारतीय घटनेने हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य पुढे चालू ठेवले एवढेच. ते हिरावून घेणे घटना समितीला शक्य नव्हते.
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना १००-१५० वर्षात भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक नेत्यांनी, क्रांतीकारकांनी थेट इंग्रज सरकारच्या विरोधात प्रचंड लिखाण केले, भाषणे केली. त्यात टिळक, भगतसिंह, महात्मा गांधी, सावरकर आणि इतर हजारो लोक होते. (सगळ्या जातींच्या नेत्यांची व क्रांतीकारकांची नावे येथे घेता येणे मला शक्य नाही, कारण माझा तेवढा 'जातीय' अभ्यास नाही. ).
इथे मी टिळक आणि सावरकर यांची नावे घेतली म्हणून कांही वाचकांना मला ब्राम्हणवादी ठरवण्याची संधी मिळेल. त्यांनी तशी संधी अवश्य घ्यावी, आणि शिवीगाळ करावी. इथे माझा हेतू इंग्रजाच्या काळातही अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते हे दाखवून देणे हा आहे, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच.
इंग्रजांच्या काळात भारतातील अनेक दैनिकांनी स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली. याचा अर्थ इंग्रजांच्या काळातही आपल्या इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतेच.
प्राचीन भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा या लेखाचा उद्देश नाही. त्यावर एक वेगळा लेख लिहिता येईल. इथे मुद्दा हा आहे की जे लोक असे समजतात की भारतीय घटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले अर्थात त्या आधी आम्हाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यच नव्हते, त्यांनी व्यक्तिपूजा आणि ग्रंथपूजा यातून बाहेर येवून 'सम्यक' विचार करायला पाहिजे. भारतीय घटनेत नागरिकांना अनेक मुलभूत अधिकार दिले गेले आहेत. पण ते आधी नव्हतेच असे मानणारे लोक भोळे किंवा Common Senseचा वापर न करणारे लोक आहेत.
भारतीय घटनेने दिलेले बहुतांश मुलभूत अधिकार या देशात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. एक उदाहरण म्हणजे भारतीय घटनेनुसार भारतातील कोणत्याही नागरिकाला देशाच्या कोणत्याही भागात जावून राहण्याचा अधिकार आहे. घटना लागू होण्याच्या आधी आम्हाला हा अधिकार नव्हता का? खरे म्हणजे भारताच्या ज्ञात इतिहासात गेली ५ हझार वर्षे प्रत्येक भागातील लोक देशाच्या दुस-या भागात जावून वास्तव्य करत आले आहेत. त्यावेळी कोठे होती घटना?
या मूलभूत अधिकारांमध्ये उपासना स्वातंत्र्यही आहे. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की घटना लागू होण्यापूर्वी भारतात उपासना स्वातंत्र्य नव्हते की काय? भारताचा धार्मिक इतिहास पाहिल्यास भारतीय लोक गेली हजारो वर्षे उपासना स्वातंत्र्य उपभोगत आहेत हे दिसून येते.
हीच गोष्ट शिक्षणाच्या बाबतीत देखील आहे. (कृपया माझा बहुजनवाद: शिक्षणबंदीचे सत्यशोधन हा लेख वाचा).
भारतीय घटना कांही संविधान सभेच्या सुमारे तीन वर्षांच्या काळात बनली नाही, तिच्या मागे शेकडो वर्षांची पूर्वपीठिका आहे. तसेच तिने भारतीयांना आधीपासून मिळत असलेल्या अधिकारांमध्ये फार मोठी भर घातली असेही कांही नाही. भारतीय घटनेने समाजात आधीपासून चालत आलेल्या अधिकारांना घटनात्मक रूप दिले एवढेच.
घटनेचे खरे योगदान हे केंद्र सरकारचे अधिकार, राज्य सरकारचे अधिकार अशा शासकीय बाबतीतले आहे. त्या गोष्टींचा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांशी फारसा कांही संबंध नाही.
हेही वाचा:
मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात
भारतीय घटनेचे शिल्पकार...........
मी बहुजनवादापासून दूर का झालो?
महावीर सांगलीकरांना नेमकी कशाची समीक्षा कारायाव्ही आहे हेच काळात नाही....
ReplyDeleteघटना कोण लिहिली इथपासून त्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या इथपर्यंत आपण लिहिता मग हे लिखाण करताना ...तुम्ही आंबेडकरांचे श्रेष्ठत्व का मान्य करत नाहीत हेच कळत नाही ?
१)सांगलीकर साहेब जर इंग्रजांच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते तर मग सरकारच्या विरोधात लिखाण केल्यावर किंवा बोलल्यावर त्यांना जेल मध्ये का टाकले जायचे ?
२)आपले हे म्हणणे मान्य आहे कि बऱ्याच गोष्टींचा विचार करून घटना तयार केली...मग हे सगळ एका घटनेमध्ये बसवून त्याला कायद्याचं रूप देण हे काय महत्वाचा नव्हत का ?
३)आपण हे लिहित असताना आंबेडकरांचा द्वेष करत आहात अस वाटत नाही का ?
तुमच वारंवार म्हणणं असं असतं की "घटनेला महत्व द्या घटना कोणी लिहिली याला महत्व देवू नका"
हे कसं शक्य आहे...एवढी चांगली घटना लिहिली म्हणून तर सारं जग आंबेडकरांना महत्व
देत हे आपणास पटत नाही का ?
कालच आपले सरन्यायाधीश कपाडिया साहेब औरंगाबाद मध्ये बोलताना म्हणाले कि आंबेडकरांच्या घटनेमुळेच एक पारसी या अल्पसंख्यांक समाजातील माणूस भारताचा सरन्यायाधीश झाला मग हे त्यांचे मतचुकीचे आहे का ?
सगळं जग मानत असताना आपण उगीच व्याक्तीडोशातून काहीतरी लिहिणे योग्य आहे का ?