-महावीर सांगलीकर
एखादी व्यक्ती फेसबुकवर एखाद्या विषयावर आपले मत मांडते. कांही लोक इतरांना न रुचणारी मते मांडतात. अशा मतांवर येणा-या विरोधी कॉमेंट्स ह्या ब-याचदा बेजबाबदार, पातळी सोडून आणि आक्षेपार्ह भाषेत असतात. मी इंग्रजी आणि हिंदी भाषेतही इतरांना न रुचणारे लिखाण करतो, पण तिथे मिळणा-या विरोधी कॉमेंट्स अपवाद वगळता सभ्य भाषेत दिलेल्या असतात. पण मराठी भाषिकांच्या विरोधी कॉमेंट्स बहुतेक वेळा 'मराठी मानसिकता' दाखवणा-याच असतात.
कॉमेंट्स देण्याच्या बाबतीत काय आहे मराठी मानसिकता?
ब-याचदा असे दिसते की लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे, ते त्याने नेमक्या शब्दात, सोप्या भाषेत आणि स्पष्ट पणे लिहिलेले असले तरी अनेक वाचकांना ते नीट कळत नाही. 'समज' कमी असणे हे त्याचे मुख्य कारण आहे. 'समाज' सुधारणेच्या गप्पा मारण्यापेक्षा आपली समज कशी सुधारेल हे वाचकांनी पहाणे आवश्यक आहे, खास करून कोणत्या तरी 'इजम'ला बळी पडलेले वाचक, व्यक्तिपूजक वाचक यांनी आपली समज सुधारून घेण्याची आवश्यकता आहे.
माझे एक मित्र आहेत. ते मोठे लेखक आहेत. त्यांचे लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण असते. पण ब-याच वेळा त्यांच्या लिखाणावर गदारोळ होतो. त्यावर कांही वाचक असभ्य भाषेत टीका-टिपण्णी करतात. लेखकालाच शहाणपणा शिकवतात. एकदा या लेखकाने अशा एका वाचकाला पुढील शब्दात झापले: 'अरे तुझे वय काय? तुझी समज किती ? तुझा आय. क्यू. किती आहे हे कधी तपासून बघितले आहेस का?'
अशा वाचकांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे ज्या विषयातील त्यांना कांही कळत नाही, तेथे ते आपले विरोधी मत सांगून टाकतात.
लेखकाने आपला विचार मांडतांना अनेक मुद्दे उपस्थित केले असतात. कांही वाचक त्यातील एखादाच मुद्दा घेवून त्यावर वाद घालत बसतात. याचा अर्थ असा होतो की बाकीचे मुद्दे त्यांना पटलेले आहेत किंवा त्यांचे खंडण करणे त्यांना शक्य नसते.
कांही वाचक तर मूळ मुद्दा सोडून भलतेच कांही बडबडत रहातात. त्याचा मूळ विषयाशी कसलाच संबंध नसतो.
कांही महाभाग मुद्यावर कॉमेंट करण्यापेक्षा स्पेलिंग मिस्टेक, तथाकथित शुद्धलेखनाच्या चुका, व्याकरणाच्या चुका लेखकाच्या लक्षात आणून देतात. अशा वाचकांची पात्रता फार तर प्रूफ रीडर होण्याची असते. प्रूफ रीडरला कोठे असते विषयाशी देणे-घेणे?
संदर्भ मागणारे वाचक
कांही वाचक लेखकाच्या एखाद्या मुद्यावर संदर्भ मागतात. ही संदर्भ मागण्याची पद्धत 'आदेश' प्रकारात मोडते. त्यात त्या वाचकाला संदर्भ नकोच असतो, तर त्याला लेखकावर अविश्वास दाखवायचा असतो. म्हणजे 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' असे त्याला म्हणायचे असते. लेखकाकडे त्याने मांडलेल्या अनेक मुद्यांचे संदर्भ असतातच आणि तो ते खरेच ज्याला ज्ञान मिळवायचे आहे त्याला आनंदाने देवू शकतो. पण ज्या वाचकांचा हेतूच मुळी लेखकाला विरोध करणे हा आहे, त्यांना तो संदर्भ कशाला देईल? तेही फेसबुकवर? ज्ञान आणि दान हे सत्पात्री उर्फ लायक लोकांना द्यायचे असते, तसेच संदर्भ हे सत्पात्री वाचकांनाच द्यायचे असतात. शिवाय लेखकाने अनेकदा स्वत: नवे कांही मांडलेले असते, तशी मांडणी, विश्लेषण त्याच्या आधी दुस-या कोणीच केलेली नसते. अशावेळी संदर्भाचा संबंधच काय? हे म्हणजे आइनस्टाइनला त्याच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला संदर्भ मागण्या सारखे आहे.
तसाही संदर्भाला फारसा कांही अर्थ नसतो. खास करून सामान्य वाचकांसाठी जेंव्हा लिखाण केले जाते तेंव्हा.
कॉमेंट्सच्या बाबतीत हिंदी, इंग्रजी वाचक सभ्य आहेत हे कबूल करावेच लागेल. माझ्या एका हिंदी लेखावरील पुढील विरोधी कॉमेंट पहा:
'महावीरजी, आपका यह लेख बहोतही अच्छा उतरा है. आपने जो सवाल उठाये ही उनके जवाब देना मेरे बस की बात नहीं है. लेकिन मुझे लगता है की आपके दो मुद्दे बेबुनियाद हैं. .......'
याउलट मराठी भाषिकांच्या विरोधी कॉमेंट्स असभ्यपणाचे उत्कृष्ट नमुने असतात. उदाहरणे द्यायची गरज नाही, फेसबुक, इसकाळ वगैरे ठिकाणच्या मराठी कॉमेंट्स चाळाव्यात.
भांडखोर वाचक आणि सवाई लेखक
अनेक वाचकांचा असा समज झालेला दिसतो की Freedom of Expression म्हणजे शिवीगाळ, बदनामी करण्याचे स्वातंत्र्य आहे.
कांही वाचक तर अक्षरश: हमरी-तुमरी वर येतात. शिवीगाळ करतात. धमक्या देतात. लेखकाला बदनाम देखील करतात. पण बहुतेक वेळा असे करणे त्या वाचकांच्या अंगलट येते. माझ्या एका मित्र लेखकाची फेस बुकवरील एका वाचकाने जाहीर बदनामी केली. त्या लेखकाने त्या वाचकाला एस.एम.एस. पाठवून त्याच्यावर पोलिस केस करत असल्याचे कळवले. तो वाचक हादरला. त्याने लेखकाला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण लेखकाने त्याचा फोन घेतला नाही. मग त्या वाचकाने लेखकाला एक एस.एम.एस. पाठवला. तो एस.एम.एस. मी वाचला आहे....
"साहेब, मी एका गरीब घरातला मुलगा आहे. मी फेसबुकवर तुमच्या बाबतीत नको ते लिहिले. त्याबद्दल मला आपला वाट चुकलेला मुलगा समजून माफ करा. माझ्यावर मेहरबानी करून पोलिस केस करू नका. ......" वगैरे वगैरे.
त्या लेखकाने आजपर्यंत अशा अनेक मूर्ख वाचकांची कायेदशीर कारवाई करून वाट लावली आहे. अनेकजण तर फेसबुकवरचा आपला गाशा गुंडाळून कायमचे गायब झाले आहेत. एका महाभागाने तर त्या लेखकाची बदनामी करणारा एक ब्लॉग लिहिला होता. त्या लेखकाने कायदेशीर कारवाईची तयारी करताच त्या वाचकाची पळता भुई थोडी झाली. त्याने लेखकाची जाहीर माफी तर मागितलीच, शिवाय त्याचा ब्लॉग, ज्यावर Copy -Paste केलेले अनेक लेख होते, पूर्ण पणे डिलीट करून टाकला. तो महाभाग आता फेसबुकवर अजिबात दिसत नाही, निदान स्वत:च्या नावाने तरी.
मलाही ब-याचदा असे वाचक गाठ पडत असतात. वरील लेखकाप्रमाणे मीही अनेक मूर्ख वाचकांची वाट लावून टाकली आहे. असे वाचक एकीकडे 'मोडेन पण वाकणार नाही' असे म्हणत असले तरी एकदम डरपोक असतात. असाच एक वाचक फेसबुकवर मला शहाणपणा शिकवत होता. तो एक संघटनेच्या विचारसरणीला बळी पडला होता. मी त्याला इमेल पाठवून खडसावले आणि 'महावीर सांगलीकर' यांच्याबद्दल तुझ्या संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची मते काय आहेत ते माहीत करून घे, नाहीतर मला तुझ्याबद्दल त्यांना सांगावे लागेल. पुढे दुसरे काय होणार? तो वाचक फेसबुकवरून गायब झाला.
पण हे सगळे करत बसणे ही एक कटकटच असते. लेखकाचा मूळ उद्देश्य बाजूला राहून त्याचा वेळ मूर्खांना धडे शिकवण्यात जातो. त्यापेक्षा अशा वाचकांकडे, त्यांच्या कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करणे हाच चांगला उपाय आहे. आपण आपले लिखाण करावे, कोण काय म्हणतात याची पर्वा अजिबात करू नये. आपली मते पटणारे वाचक फार मोठ्या संख्येने असतात. मग विरोधी वाचकांची पर्वा कशाला करायची? अर्थात ज्यांना आपली मते पटत नाहीत असे कांही वाचक जर विरोधी पण सभ्य कॉमेंट्स देत असतील तर त्यांची दाखल घ्यायलाच पाहिजे हेही खरे.
हेही वाचा:
चिकित्सा नको असणारे लोक
सुनीताची गगनभरारी आणि भारतीयांची मानसिकता
माणसाला धर्माची गरज आहे काय?
REALY TRUE SIR
ReplyDeleteसफाईचे काम करताना कचरा अंगावर उडणारच. त्याची तमा बाळगायचे कारण नाही. प्रत्येक सुधारकाला हा त्रास सहन करावा लागलाच आहे. पण विवादास्पद विषयांवर लेखन करताना असे होणारच हे भान लेखकांनीही जपले पाहिजे. जनतेसमोर एखादा मुद्दा मांडताना त्या विषयाचा संदर्भ देणे हे आवश्यकच आहे. नाहीतर उद्या कोणीही उठून वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बरळू लागेल. सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धास्थानांबद्दल लिहिताना जर संदर्भ दयायचे नसतील तर मग जबाबदार लेखक कोणाला म्हणावे? आपली मते पटणाऱ्या वाचकांसाठीच जर लिहायचे असेल तर मग विरोधी वाचकांच्या कॉमेंट्स प्रकाशित तरी कशाला करायच्या? बरेच लेखक त्यांना निरुत्तर करणाऱ्या कॉमेंट्स प्रकाशित करत नाहीत. ज्यांच्यात सुधारणा घडवून आणायची आहे ते नवीन विचारांना विरोध करणारच. तो विरोध सहन केल्याशिवाय सुधारणा घडणार नाहीत. म्हणूनच बहुसंख्य वाचकांना लेखकाची मते पटत असली तरी विरोधी वाचकांची पर्वा करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
ReplyDeleteमला तर असे वाटते लेखकाने आपली पातळी जपूनच लिखाण करावयास हवे...मुद्दाम वादग्रस्त लिखाण केल्यास, या गोष्टी आल्याच.....एखाद्यावर पोलिस केस करणे म्हणजे आज काल खूप मोठी गोष्ट नाही...आणि ती व्यक्ती जर रोज पोलिस चौकीच्या फेऱ्या मारणारी असेल तर त्याला काय फरक पडणार आहे, फरक पडेल तो लेखकाला एखाद्या सनकी व्यक्ती ने एकांतात गाठून त्या एकांताचा फायदा उचलला तर ते लेखकाच्या मानसिक, शाररीक आणि इभ्रतीला मारक असेच ठरेल, तेव्हा मला असे वाटते...चांगल्या लेखकांनी असल्या भानगडीत न पडता...आपले लेखन चालू ठेवावे, वादग्रस्त लिखाण टाळलेलेच बरे...आपले नाव खराब करून घेऊ नये.....!
ReplyDeleteraj khup chan uttar dile ahe maze uttar pan tuzashi milate julte ahe
Delete"सफाईचे काम करताना कचरा अंगावर उडणारच. त्याची तमा बाळगायचे कारण नाही. प्रत्येक सुधारकाला हा त्रास सहन करावा लागलाच आहे. पण विवादास्पद विषयांवर लेखन करताना असे होणारच हे भान लेखकांनीही जपले पाहिजे. जनतेसमोर एखादा मुद्दा मांडताना त्या विषयाचा संदर्भ देणे हे आवश्यकच आहे. नाहीतर उद्या कोणीही उठून वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बरळू लागेल. सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धास्थानांबद्दल लिहिताना जर संदर्भ दयायचे नसतील तर मग जबाबदार लेखक कोणाला म्हणावे? आपली मते पटणाऱ्या वाचकांसाठीच जर लिहायचे असेल तर मग विरोधी वाचकांच्या कॉमेंट्स प्रकाशित तरी कशाला करायच्या? बरेच लेखक त्यांना निरुत्तर करणाऱ्या कॉमेंट्स प्रकाशित करत नाहीत. ज्यांच्यात सुधारणा घडवून आणायची आहे ते नवीन विचारांना विरोध करणारच. तो विरोध सहन केल्याशिवाय सुधारणा घडणार नाहीत. म्हणूनच बहुसंख्य वाचकांना लेखकाची मते पटत असली तरी विरोधी वाचकांची पर्वा करणे हे अत्यंत आवश्यक आहे."...
ReplyDeleteExact my words. Adding more..
कोणी संदर्भ मागितल्यास तो दिला जावा. पोलीस केस करण्यालाही हरकत नाही योग्य कारण असेल तर. (त्यातही ज्याच्या नावाने कॉमेंट्स आल्या आहेत त्या व्यक्तीने त्या दिल्या आहेत का ह्याचीही खात्री केली पाहिजे. कशी? ते मात्र ह्या माया जालावर सांगता येत नाही.) परंतु वादग्रस्त विषय मांडला असेल तर त्यावरील प्रश्नांना उत्तरे दिली गेलीच पाहिजेत. विषयावर चर्चा होणे गरजेचे. "आम्ही म्हणू ती पूर्व दिशा" असे होत नसते.
Security settings modify करून "Anonymous" comments टाळल्या जातील. जेणेकरून फेक comments चे प्रमाण कमी होईल.