सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, December 29, 2012

समज सुधारणेची गरज

-महावीर सांगलीकर 

या लेखाचे टायटल वाचल्यावर स्पेलिंग मिस्टेक झाली आहे असे (विशेष करून भाषाशुद्धीवाल्यांना)  वाटेल, पण नाही, हे टायटल एकदम बरोबर आहे. कारण मी या लेखात समाज सुधारणेबद्दल लिहित नसून 'समज' सुधारणेबद्दल लिहीत आहे. 

एखादा लेखक किंवा वक्ता एकदम सोप्या भाषेत लिहितो किंवा बोलतो, पण ब-याच वेळा त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे अनेकांना कळत नाही. याचे कारण त्यांची समज किंवा आकलन शक्ती कमी असते हे आहे.

अनेकदा कांही वक्ते वातावरण हलके-फुलके करण्यासाठी एखादा हलका-फुलका विनोद सांगतात, पण तो विनोद ऐकणा-यांच्या डोक्यात शिरला नाही तर वक्त्याच्या डोक्याला ताप होतो.  ब-याच वेळा वक्त्यांना भाषण करत असताना आपण गाढवांपुढे गीता वाचत आहोत की काय असे वाटत असते. पण तरीही तो आपले भाषण रेटून नेतो, कारण समोर बसलेले सगळेच गाढव नाहीत अशी  त्याला आशा असते. असो.

मुद्दे कळायला आणि साधे विनोद कळायला माणसाजवळ समज/आकलन शक्ती, विनोदबुद्धी अशा गोष्टी असण्याची गरज असते. पण खेदाची गोष्ट ही आहे की अशा गोष्टी आपल्या येथे ब-याच लोकांकडे नाही आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्या येथील, म्हणजे भारतातील लोकांचा सरासरी बुद्ध्यांक जागतिक सरासरीपेक्षा फारच कमी आहे.

सरासरी बुद्ध्यांक

व्यक्तीचा बुद्ध्यांक जसा महत्वाचा असतो, तसाच एखाद्या देशातील लोकांचा सरासरी बुद्ध्यांकही महत्वाचा असतो. हा बुद्ध्यांक त्या-त्या देशातील वेगवेगळ्या भागातील, समाजातील सर्व स्तरातील लोकांचा स्यांपल सर्व्हे घेवून काढला जातो.  सरासरी बुद्ध्यांकाच्या बाबतीत हाँगकाँग हा देश जगात सगळ्यात पुढे आहे. तेथील लोकांचा सरासरी बुद्ध्यांक १०७ आहे. बुद्ध्यांकाची जागतिक सरासरी ९० आहे, तर भारतातील लोकांचा सरासरी बुद्ध्यांक सुमारे ८० म्हणजे जागतिक सरासरीपेक्षाही कमी आहे.

७० किंवा त्यापेक्षा कमी बुद्ध्यांक असणारे लोक मतीमंद समजले जातात.  म्हणजे भारतीय लोकांचा सरासरी बुद्ध्यांक जागतिक सरासरीपेक्षा दहाने कमी आणि मतीमंद मुलांच्या उच्च बुद्ध्यांकापेक्षा फक्त दहाने जास्त आहे. इथे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीयांचा सरासरी बुद्ध्यांक ८० आहे आणि ज्या अर्थी भारतात जास्त बुद्ध्यांकाचे (११०-१५०) लोकही कांही प्रमाणात दिसतात, त्याअर्थी इथे ८० पेक्षा कमी बुद्ध्यांकाचे म्हणजे मतीमंद लोकही  फारच मोठ्या प्रमाणावर आहेत.

भारतीयांचा बुद्ध्यांक कमी असण्याची जी कारणे आहेत, त्यात कुपोषण, आयोडीन आणि इतर घटकांची कमतरता, भक्तीवाद या गोष्टी मुख्य आहेत. 


माझ्या या लेखामुळे कांही वाचकांना नक्कीच राग येत असेल, पण Facts are Facts. भारतीयांच्या आणि त्यामुळे भारताच्या अवनतीचे कारण त्यांची समज कमी असणे हेच आहे. जशी आपल्याला समाज सुधारणेची गरज आहे, तशीच समज सुधारणेचीही गरज आहे.

ब्राम्हण-बनियांना कोणी कितीही नावे ठेवत असले तरी त्यांचा सरासरी बुद्ध्यांक (११५) भारताच्या सरासरी बुद्ध्यांकापेक्षा खूपच जास्त आहे. अर्थात त्यांच्यातही मतीमंद लोक असतात. तसेच भारतातील शेतकरी आणि कारागीर समाजाचा सरासरी बुद्ध्यांकही आता ११५ झाला आहे. हे लोक बुद्ध्यांकाच्या बाबतीत  ब्राम्हण-बनियांना लवकरच मागे टाकतील असे वाटते, कारण गेल्या कांही दशकातील त्यांच्या बुद्ध्यांकाच्या वाढीचा वेग इतर कोणाहीपेक्षा जास्त आहे.

 हेही वाचा:
चिकित्सा नको असणारे लोक
सुनीताची गगनभरारी आणि भारतीयांची मानसिकता
शारीरिक कष्टाचे कौतुक अजून किती दिवस ?

2 comments:

  1. [तसेच भारतातील शेतकरी आणि कारागीर समाजाचा सरासरी बुद्ध्यांकही आता ११५ झाला आहे. हे लोक बुद्ध्यांकाच्या बाबतीत ब्राम्हण-बनियांना लवकरच मागे टाकतील असे वाटते]
    ही मनोवृत्ती सर्व जातीत हवी, आणि फक्त बुद्ध्यांक नव्हे तर, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व बाबीत सर्वश्रेष्ठ होण्याचे स्वप्न सगळ्या (फक्त ब्राम्हण बनिया सोडून शेतकरी कारागीर नव्हे तर दलित, भटके सुद्धा) जातींनी लोकांनी बघितले पाहिजे, आणि स्वप्नपुर्तीकारता प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यातूनच जातीयवादाचा अंत होईल. हे कित्येक जातीयवादी संघटनांना नको आहे, कारण असे झाले तर त्यांची पोळी कशी भाजली जाणार?

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week