सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, March 26, 2013

नमस्कार, हॅलो, सलाम आलेकुम

-महावीर सांगलीकर 

एकमेकांना भेटल्यावर 'नमस्ते/नमस्कार' म्हणण्याची आपल्या येथे पद्दत आहे. या शब्दाचे वैशिष्ठ्य असे की हा अतिशय प्राचीन शब्द असून तो ख-या अर्थाने सेक्युलर शब्द आहे. तो कोणत्याही धर्माशी अथवा जातीशी संबंधीत शब्द नाही आहे. तसेच तो भारतातील जवळ-जवळ सर्व भाषांमध्ये वापरला जातो. जैन, बौद्ध आणि वैदिक या तीनही परंपरेतील प्राचीन भारतीय साहित्यात हा शब्द अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी वापरला गेलेला दिसतो.

इंग्रजीमध्ये अभिवादनासाठी हॅलो हा शब्द वापरण्यात येतो, तसाच नमस्ते/नमस्कार हा शब्द आहे. हॅलो हा शब्दही नमस्कार या शब्दाप्रमाणेच सेक्युलर असून त्याचा कोणत्याही धर्माशी अथवा जातीशी संबंध नाही. तीच गोष्ट सलाम आलेकुम या शब्दाची. हा शब्द प्रामुख्याने मुस्लिम जगतात वापरला जात असला तरी या शब्दाचा धर्माशी अथवा जातीशी संबंध नाही आहे. या शब्दाचा  मूळ अर्थ 'तुम्हाला शांती लाभो' असा आहे. पण हाही शब्द नमस्कार, ह्यालो, शुभ दिवस या अर्थाने वापरला जातो.  अरबी भाषेतला नमस्कार.

नमस्ते/नमस्कार, हॅलो, सलाम आलेकुम या तीनही शब्दांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हे शब्द कोणत्याही व्यक्तींशी संबंधीत नाहीत.पण अलीकडे अनेक लोक आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी अभिवादनासाठी हे श्रेष्ठ शब्द वापरण्याऐवजी व्यक्तिवाचक शब्द मोठ्या प्रमाणावर वापरू लागले आहेत. 'जय भोलेनाथ', 'जय श्रीकृष्ण',  'जय श्रीराम', 'जय भीम', 'जय जिजाऊ', 'जय मल्हार' वगैरे वगैरे. 'जय जिनेन्द्र' हा शब्द व्यक्तिवाचक नसला, पदवाचक असला तरी शेवटी तो अनेक का होईना, व्यक्तींशीच संबंधीत आहे.

कांही लोक 'जय महाराष्ट्र' असा प्रदेशवाचक शब्द अभिवादनासाठी वापरतात. ('जय हिंद' केवळ सैनिक आणि पोलिसच म्हणतात).

या सगळ्या शब्दांना जात, धर्म, समूह, प्रदेश यांच्या मर्यादा आहेत. त्या-त्या घटकात अभिवादनासाठी या शब्दांचे महत्व असले तरी हे शब्द सार्वत्रिक नाहीत. याउलट नमस्ते/नमस्कार, हॅलो, सलाम आलेकुम हे तीनही शब्द या मर्यादा ओलांडून सार्वत्रिक झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक जीवनात अभिवादनासाठी हेच शब्द वापरायला पाहिजेत असे मला वाटते. हे शब्द वापरण्यामुळे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. याउलट वरील व्यक्तिवाचक अभिवादने त्या-त्या समूहात वापरण्याऐवजी आपण दुस-या समूहातील व्यक्तीपुढे वापरल्यास अनेकदा घोटाळा होण्याचा संभाव असतो. जसे आपण 'जय श्रीराम' हे अभिवादन 'जय भीम' म्हणाणा-या व्यक्तीपुढे वापरले, किंवा त्याच्या उलटे'जय भीम' हे अभिवादन'जय श्रीराम' म्हणाणा-या व्यक्तीपुढे वापरले तर त्यांना ते फारच खटकते. बामसेफसारखी जातीवादी संघटना तर अभिवादनासाठी घटनाविरोधी 'जय मूळनिवासी' हे शब्द वापरते. 'जय भीम' वाल्यांना 'जय मूळनिवासी' हे अभिवादन खटकते, पण ते घटना विरोधी आहे म्हणून नव्हे, तर 'जयभीम' हे अभिवादन टाळले म्हणून.

व्यक्तिवाचक अभिवादन हा व्यक्तिपूजेचाच एक प्रकार आहे. आपल्या महान पूर्वसुरींचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे, पण त्यांची पूजा करणे म्हणजे त्यांचे विचार संपवणे. शिवाय ही व्यक्तिपूजा जात पाहून होते ही  तर आणखीनच भयानक गोष्ट. प्रदेशवाचक, जाती-समूह वाचक अभिवादने यांनाही मर्यादा आहेत.

तेंव्हा आपला नमस्ते/नमस्कार/ हॅलो/ सलाम आलेकुमच बरा .............

5 comments:

  1. आपल्या या विचारांशी मी तंतोतंत सहमत आहे. प्रत्यक्षात नमस्कार सारखा निधर्मी शब्दआस्तित्वात असतांना बाबासाहेब आम्बेडकरयांच्या सारख्या व्यक्तिपूजा विरोधाकाने जय भीम या शब्दाला स्वतः वापरून प्रोत्साहित केले याचे मला नवल वाटते .

    ReplyDelete
    Replies
    1. Babasahebani Jaibhim la protsahit kele yacha kahi purava aahe ka tumachya kade. Jaibhim ha babasahebanchya nidananantar jast prasarit zala.

      Delete
  2. jai jinendra, jai shri krishna,jai jijau ,jai bhim he mulnivasi vaparu shaktat alternatively kinva randomly yat khatkayache karan nasale pahije.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week