सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, May 7, 2013

ऋतिक रोशन कोठे आहे?

-महावीर सांगलीकर

ऋतिक रोशन महान कलाकार आहे. तो कद्रू प्रवृत्तीचा नाही. पण केवळ तो मुसलमान नाही म्हणून त्याच्याविषयी प्रेम वाटणा-यांसाठी,  त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खानांवर गोळ्या झाडणा-यांसाठी आणि हिंदी सिनेमात मराठी कलाकार दुय्यम का ठरतात याच्यावर विचार करण्यापेक्षा इतरांवर जळण्यात मश्गुल असणा-यांसाठी हा लेख आहे. 

ऋतिक रोशन याने जेंव्हा बॉलीवूड मध्ये पाउल ठेवले आणि त्याचा पहिलाच सिनेमा हिट झाला तेंव्हा कांही लोकांना भलताच आनंद झाला होत. हा आनंद निर्भेळ नव्हता तर ऋतिक रोशन सगळ्या 'खानां'ना हिंदी सिनेमातून संपवणार या भावनेतून आला होता. अनेकांनी तसे बोलूनही दाखवले होते. पण लवकरच त्यांचा भ्रमनिरास झाला, कारण त्याच्या दुस-याच सिनेमात त्याने एका मुस्लिम दहशतवाद्याची भूमिका साकारली. पुढे ऋतिक रोशनने एका मुस्लिम मुलीशी लग्न केले, तेंव्हा तर यांचे चेहरे पारच उतरले. 

आज ऋतिक रोशन कोठे आहे? आणि ते तीन खान कोठे आहेत?  हे लिहिण्याचे कारण म्हणजे ई-सकाळ  सारख्या दर्जेदार (?) मराठी पेपर मध्ये वाचकांच्या आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान यांच्याविषयी येणा-या  कुजकट कॉमेंट्स. अशा कॉमेंट्स देणारे हे विसरतात की हिंदी सिनेमाची राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असूनही एकही मराठी हिरो हिंदी सिनेमाचा सुपरस्टार  होवू शकत नाही, किंबहुना अपवाद वगळता मराठी अभिनेत्यांची  योग्यता हिंदी सिनेमात 'एक्स्ट्रा', नोकर किंवा जोकर यांचे काम करण्याचीच असते.  

मागे भरत जाधव एका मुलाखतीत सांगितले होते की हिंदी सिनेमात मला नोकराच्या भूमिकेची ऑफर आली तर मी ती स्वीकारणार नाही. चांगले विचार, पण मग आज मराठी सिनेमात जे हिरो असतात, त्यांना हिंदी सिनेमात दुसरी कसली कामे मिळू शकतात? अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या जागी भारत जाधव, मकरंद अनासपुरे शोभून दिसतील का?

मध्ये रोहित शेट्टी यांचा सिंघम हा सिनेमा आला होता. रोहित शेट्टी यांनी त्या सिनेमात अनेक मराठी कलाकारांना काम दिले होते. त्यावेळी मराठी मेडियाने रोहित शेट्टी यांचे नसले तरी त्या कलाकारांचे वारेमाप कौतुक  केले होते. पण हे सगळेच कलाकार 'एक्स्ट्रा ऑर्डीनरी' नव्हे तर 'ऑर्डीनरी एक्स्ट्रा' होते. या सिनेमातील हिरो, हिरोईन आणि मुख्य व्हिलन हे तिघेही 'परप्रांतीय अमराठी' होते. ज्या सचिन खेडकर या मराठी अभिनेत्याने Bose: The Forgotten Hero  या सिनेमात सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारली होती, तो अभिनेता सिंघम मध्ये 'बावळट गोट्या' झाला होता. आता तर त्याने  'कोकणस्थ' या मराठी सिनेमात काम केले आहे. यापेक्षा मोठा डाऊन फॉल काय असू शकतो?

मराठी कलाकारांचा डाऊन फॉल होत असतो  हे माहीत असल्यानेच की काय, कांही जणांमध्ये  सतत वरची पायरी गाठणा-या खानांवर जळणे हा मनोविकार तयार होतो.   

खानांना ऋतिक रोशनने संपवण्याची भाषा करणे म्हणजे पाहुण्याच्या हातून साप मारण्याची टिपिकल कद्रू मराठी प्रवृत्ती नव्हे काय?  

हेही वाचा:

4 comments:

  1. ठीक आहे. पण असे कद्रू लोक फार कमी आहेत. खान त्रयींचे सिनेमे असोत कि अक्षय, अजय, रितिक, अभिषेक चे असोत, चांगले सिनेमे मग ते हिंदी असोत कि मराठी असोत, फक्त मनोरंजनाच्या भावनेतून पाहणारे बरेच आहेत! नाना पाटेकरला पद्मश्री मिळण्याआधी बर्याच सोम्यागोम्याना असे राष्टीय सन्मान मिळाले! तसही सिनेमा जगताने समाजाचे काय भले केले आहे, ते परमेश्वरच जाणो ! माझ्या मते सिनेजगत आणि सिने स्टार यांना आपल्या देशात आणि समाजात अवास्तव महत्व दिले जाते. सिनेमा, क्रिकेट, IPL इ. गोष्टींचे स्तोम माजवून आपण देशाची आणि समाजाची दिशाभूल करत आहोत असे माझे प्रामाणिक मत आहे!

    ReplyDelete
  2. ekadam barobar sangalikar sir.....bollywood cha superstar yusuf khan hya muslimala dilip kumar hya hindu navane bollywood madhe entry karavi lagate hyavarun bharat dharmnirapeksh kasa manaycha?ajunahi shahrukh khan ha hindutvwadyanche target asatoch hyala kay mhanayche?

    ReplyDelete
  3. Marathi mule handsome nasatat asa bhram karu naye. kityek jagatik kirtiche models maharastrian ahet.milind soman,dharmadhikari hi kahi udhaharane ahet je chitrapatat kontyaki parpraantiy kalakarala lajvel asi personality ani pratibha balgtat.

    ReplyDelete
  4. Dear Mahavir bhai,
    Read your above article. I liked it and I totally agree with your observations. However, I would like to add that as Bollywood is based in Mumbai,we feel that it should have many Marathi actors in the lead roles. We ignore the fact that as the films are made in Hindi they are dominated by North Indian actors (even producers and directors are mostly North Indians). Why Marathi, even South Indian actors, with few exceptions, have failed to make their mark in Hindi film indusrty. Even they have to be content with secondary roles.
    However, I agree with your contention that we generally tend to be communal when it comes to success and celebrities. It will do even if he is a non-Marathi! Similarly, even if he is a Marathi but not Hindu, he will not be favoured.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week