सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, February 2, 2011

धर्म ही अफूची गोळी नव्हे | Religion is not Opium

-महावीर सांगलीकर



कार्ल मार्क्स या प्रसिद्ध विचारवंताने धर्माला अफूची गोळी म्हंटलेले आहे. (Religion is Opium).  पण मला त्याचे हे म्हण्णे फारसे पटत नाही.

कार्ल मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्हणताना केवळ ख्रिस्ती आणि ज्यू या धर्मांचा विचार केला असावा. त्याने याबाबतीत भारतीय धर्मांचाही विचार करायला पाहिजे होता. तसे केले असते तर त्याने धर्माला अफूची गोळी मुळीच म्हंटले नसते!

अफुची गोळी ही फक्त गुंगी आणते. ही गोळी घेतलेला माणूस कोणाल त्रास वगैरे देत नाही.
 याउलट धर्म हा माणसाची विचारशक्ती मारून टाकणारा एक मनोविकार आहे. ही विचारशक्ती गमावलेले लोक अंधश्रद्धा, बुवाबाजी यांना बळी पडतात. हा मनोविकार झालेले लोक आपला धर्म जगातील सर्वश्रेष्ट आणि इतर सर्व धर्म तुच्छ मानायला लागतात. हा मनोविकार शेवट्च्या टप्प्यात गेला तर तो मनोरुग्ण असे मानायला लागतो की सगळ्या जगात फक्त त्याचाच धर्म राहिला पाहिजे, इतर सर्व धर्म नष्ट व्हायला पाहिजेत.

जगाच्या इतिहासात सर्वात जास्त कलह, युद्धे, वंशसहार धर्मामुळे झालेले आहेत. धर्मामुळे माणूस माणसापासून दूर जातो. कांही जणांना तर माणसापेक्षा प्राणी जवळचे वाटायला लागतात.

कवी इकबाल आपल्या एक गीतात म्हणतात, मजहब नही सिखाता आपस में बैर रखना
पण प्रत्यक्षात मजहब ही सिखाता है आपस में बैर रखना असे म्हणावे  लागते.

त्यामुळे धर्माला अफूची गोळी म्हणण्यापेक्षा मनोविकार अथवा मनुविकार म्हणणे जास्त बरोबर वाटते.

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week