सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Monday, June 11, 2012

आता कसं मोकळं मोकळं वाटतंय...........

-महावीर सांगलीकर

गेली कित्येक महिने मी माझ्या महाविचार या ब्लॉग वरून माझे विचार मांडत आहे. हे विचार मांडताना बहुजन समाजाचे प्रबोधन व्हावे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवला होता. तो हेतू ब-यापैकी साध्य झाला असे मला वाटते. या काळात मला अनेक नवे मित्र आणि नवे शत्रू मिळाले. अनेकांनी इमेल व फोन वरून माझ्या लेखांचे कौतुक केले. अनेकांच्या प्रत्यक्ष ओळखीही झाल्या. अनेक धमक्याही आल्या. धमक्या देणा-यांकडे मी माझ्या पद्धतीने, एकट्याने पाहून घेतले.

पण ज्यांच्या प्रबोधनासाठी मी हे लिखाण केले, त्या बहुजन समाजातील कांही लोक निव्वळ मूर्ख आणि विचारशून्य असतात हेही मी समजून चुकलो. खरे तर अशा लोकांची संख्या बहुजन समाजात फार कमी आहे, पण ज्याप्रमाणे एक सडका आंबा इतर चांगल्या आंब्याना सडवून टाकतो, तसाच कांही प्रकार बहुजनांच्या बाबतीत झाला आहे.

'बहुजन' हे नाव घेणा-या कांही संघटना समाजात विखारी विचार पसरवण्याचे काम नेटाने करत आहेत. खेदाची गोष्ट ही आहे की बहुजन समाजातील अनेक तरुण अशा संघटनांच्या विखारी प्रचाराला बळी पडत आहेत. या संघटना बहुजन समाजातील लोकांना त्यांच्या-त्यांच्या जातीच्या आधारावर संघटीत करत आहेत. जातीव्यवस्था मजबूत करण्याचे काम या संघटनांकडून इमाने-इतबारे चालले आहे. अशा संघटनांमुळेच कधी नसेल एवढी आज जातीव्यवस्था मजबूत झाली आहे.

या संघटना कोणतेही विधायक काम करत नाहीत, त्यांचा सगळा भर आंबेडकर हे गांधींपेक्षा कसे श्रेष्ठ, गांधी कसा रंगीला होता, हिंदू धर्म कसा वाईट आहे, ब्राम्हण कसे बदमाश असतात अशा उच्च विचारांवर चर्चा करण्यावरच असतो. त्यांच्या हाती फेसबुक नावाचे आयते कोलीत मिळाले आहे. त्याच्यावर एक नजर टाकली तरी आपल्याला या विकारवंतांच्या विकारांची चुणूक बघायला मिळते.

मला सगळ्यात वाईट वाटले ते या गोष्टीचे की हे विकारवंत लोक फेसबुकवर जेंव्हा गांधीजींना बदनाम करतात, तेंव्हा मराठा व इतर बहुजन समाजातील कांही व आंबेडकरी समाजातील बरीच फेसबूकी पोरे या बदनामीला लाईक करतात, शेअर करतात. मी या पोरांची वये तपासली तेंव्हा मला असे दिसले की हे सगळेजण अजाण, संकारक्षम वयातील, स्वत:चे विचार नसणारी मुले आहेत. त्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने हे तर फारच धोकादायक आहे. ज्या वयात आपले करीअर घडविण्याला, भव्य दिव्य कांहीतरी करून दाखवण्याचे स्वप्ने बघण्याला महत्व द्यायला पाहिजे, त्या वयात ही मुले नाझीवादी संघटनांच्या आणि विचारांच्या कचाट्यात सापडली आहेत. हिंदुत्ववादी मुलांच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल.

अशा विचारांच्या नादी लागून खरोखरच वेडे झालेले, घरदार उद्ध्वस्त झालेले लोक मी पाहिले आहेत.

द्वेष, तिरस्कार, असूया हे रोग आहेत, त्याने आपला तोटाच होतो हे जेंव्हा यांच्या लक्षात येईल, तेंव्हाच हे लोक या नवनाझींच्या कचाट्यातून सुटतील.

आता कसं मोकळं मोकळं वाटतंय...........

ज्याना चांगले काय आणि वाईट काय हे कळत नाही, ज्यांनी कळत नसल्याचे सोंग घेतले आहे, त्यांचे प्रबोधन कोणीच करू शकत नाही, याची जाणीव झाल्यावर मी माझ्या धोरणात मोठा बदल केला आहे. त्यातील सगळ्यात पहिली पायरी म्हणजे मी माझ्या फेसबुक अकौंटवरून अनेक लोकांना, जे समाजात द्वेष पसरवण्याचे करत आहेत त्यांना अनफ्रेंड केले आहे. मला जे फोटो ट्याग केले जातात, ते मी मंजूर केल्याशिवाय माझ्या वालवर येत नाहीत. मला त्याचा एक फायदा असा झाला आहे की माझ्या वालवरचा कचरा आता गायब झाला आहे. सारे कसे स्वच्छ स्वच्छ...

आता कसं मोकळं मोकळं वाटतंय...........

2 comments:

  1. very correct.negative attitude is harmful for growth and prospority for self.
    One must try to focuss on what one should do right in spite concerntrating on fault of others as lord buddha said.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week