-महावीर सांगलीकर
बहुजन चळवळीतले लोक ब्राम्हणांना बहुजनांचा सर्वात मोठा शत्रू मानतात. त्यांनी ब्राम्हणांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. पण बहुजनवाद्यांचे ब्राम्हणांविषयी आकलन फारच तोकडे असते. कोणत्याही युद्धात जर शत्रूची नीट माहिती नसेल तर शत्रूचा विजय नक्की असतो. आणखी पाच हजार वर्षे ब्राम्हणांशी लढलात तरी बहुजनांचा विजय होवू शकत नाही. त्यामुळे बहुजनवाद्यांनी दिवास्वप्नातून बाहेर यावे. बहुजनांच्या बामसेफी डरकाळ्यांनी ब्राह्मणांचे कांहीच नुकसान होत नाही, फार तर त्यांची करमणूक होत असते.
हा लेख वाचून बहुजनवादी वाचक माझ्यावर मी ब्राम्हणवादी असल्याचा आरोप करतील. करोत बापडे, कारण त्यांचे माझ्या बाबतीतील आकलनही तोकडेच आहे. पण मी जसा बहुजनवादी नाही, तसा ब्राम्हणवादीही नाही. किंबहुना मी या दोन्हीपैकी एकाही गटात मोडत नाही याचा मला अभिमान आहे. हे दोन्ही गट आपल्या देशाला लागलेले कलंक आहेत, आणि त्यांच्यामुळे या दोन्ही गटातील समाजांचेच नुकसान होणार आहे. अर्थातच त्याचा फायदा या दोन्ही गटांबाहेरील समाजांना होणार आहे. अर्थात ही गोष्ट देशाच्या दृष्टीने चांगलीच आहे. असो.
बहुजनवाद्यांचे ब्राम्हणांविषयी आकलन
बहुजनवादी नेते आणि त्यांचे अनुयायी ब्राम्हण समाज हा संघटीत आणि एकगठ्ठा आहे असे समजतात. त्यांना ब्राम्हणांच्या मधील भेद, जाती, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध याविषयी कसलीच माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यातील मतभेदांचा फायदा घेवून समाज कारण करणे बहुजनवादी नेत्यांना कधी जमणे शक्य नाही.
बहुजनवादी नेते जे ब्राम्हण ब्राम्हणवादाच्या विरोधात लढत असतात, विधायक काम करत असतात, त्यानांही आपले शत्रू मानत असतात. महावीर, गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या मोहिमेत ब्राम्हणांना देखील सहभागी करून घेतले होते. पण आजचे बहुजनवादी नेते स्वत:ला या महापुरुषांपेक्षा शहाणे समजू लागले आहेत. त्यामुळे त्यांना ब्राम्हणांची सावलीदेखील नकोशी झाली आहे.
बहुजनवाद्यांचा ब्राम्हणांविषयी असा समज आहे की सगळे ब्राम्हण, त्यांच्या जाती या पुरोहित असतात. पण प्रत्यक्षात पुरोहितगिरीशी कसलाच संबध नसणा-या अनेक ब्राम्हण जाती भारतभर आहेत. शेतकरी संघटनेचा नेता ब्राम्हण असल्यास ती गोष्ट बहुजनवादी नेत्यांना खटकते, ब्राम्हणांचा शेतीशी काय संबध असे ते विचारतात, पण त्यांना हे माहीत नसते की परंपरेने शेती करणा-या ब्राम्हणांच्या अनेक शेतकरी जाती आहेत.
तीच गोष्ट लढाऊपणाची. बहुजनवाद्यांचा एक गोड गैरसमज असा आहे की ब्राम्हण लढू शकत नाहीत. प्रत्यक्षात ब्राम्हणांच्या अनेक लढावू जाती आहेत. त्यांची रेजिमेंट नसली म्हणून काय झाले? शिवाय ब्रम्हक्षत्रिय हाही एक प्रकार भारतभर आहेच. हे लोक ब्राम्हण, पण क्षत्रियाचे काम करतात, म्हणून त्यांना ब्रम्हक्षत्रिय म्हणतात.
आता हे खरे आहे की ब्राम्हणवादी ब्राम्हण हे एक संकटच आहे, पण त्यांच्याशी लढतांना बहुजनवादी नेते सगळ्याच ब्राम्हणांना टार्गेट करत असतील तर तो एक मूर्खपणाच आहे.
(हा लेख वाचून ब्राम्हणवादी वाचकांनी हुरळून जायचे कारण नाही, कारण पुढच्या लेखात मी तुमच्याबद्दल लिहिणार आहे)
हेही वाचा:
मी बहुजनवादापासून दूर का झालो?
मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
महावीर सर, छान लेख लिहिला आहे. बहुजनवाद,मुळनिवासीवाद या सारख्या वादांना ब्राहमणवादा सारखे वादच जबाबदार आहेत.मी स्वत: एक ब्राहमण आहे पण ब्राहमणवादाचा कट्टर विरोधक आहे.हे सर्व वाद सोडुन जर आपण भारतीयवाद जोपासला तर निश्चितच सर्व समाजाचा उत्कर्ष होईल व देशाची ही प्रगती होईल.......
ReplyDeletekhup chhan lekh,u r absolutely right Mahavirji..........khupach chhan...........Ek brahman
ReplyDeleteमुळात स्वत:ला बहुजनवादी म्हणवून घेणारे हे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आहेत हे मानण्याचे कारण काय?
ReplyDeleteसर, अगदी बरोबर। खुप छान लेख आहे, हे मुळनिवासीवाद, बहुजनवाद, ब्राह्मणवाद हे सर्व देशाला लागलेला कलंक आहेत, ह्यांच्यावर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे,
ReplyDeleteहे बामसेफ नि आर एस एस एकाच नाण्याच्या 2 बाजु नसुन एकाच माळेचे मणी असावेत।
Piyush Khobragade
तुमच्या सारखी माणसे अल्प आहेत हीच खरी शोकांतिका.
ReplyDeleteDEAR MAHAWIR
ReplyDeleteGELYA 10 DIWASAT EK BATMI WACHALI,PUDHILPRAMANE,
'RASHTRAWADI CONGRES CHYA NAVYA MUMBAI KARYALAYACHE
UDGHATAN.'YA BATAMI SOBAT EK PHOTO HOTA JYAT
DON BHAT-JI N CHYA UPASTIT DHARMIC KAYAKRAM PAR
ZALYACHE DISALE.
RASHTRAWADI WA TATSAM ITAR PUSHANCHA BRAHMAN WIRODH
KITI KHARA AHE HE YA WARUN LAKSHAT GHYAWE.