-महावीर सांगलीकर
अलिकडे कांही लोक मराठा इतिहास या शब्दाऐवजी मराठी इतिहास हा शब्द जाणीवपूर्वक वापरू लागले आहेत. अगदी पानीपतला मराठी लोक लढायला गेले होते असे म्हणायला लागले आहेत. मराठा हा शब्द त्यांना सहन होईनासा झाला आहे. त्यामुळे इलेक्टॉनिक व प्रिंट मेडीया, इंटरनेट, भाषणे, गप्पागोष्टी यातून मराठा हा शब्द हद्द्पार होत आहे. या शब्दाचा जो कांही उल्लेख हा कंपू करत असतो, तो या शब्दाला बदनाम करण्यासाठीच.
खरे पहाता मराठा हा शब्द प्रादेशिक आहे. छ. शिवाजी महाराजांनी आपल्या मुस्लीम सैनिकांसकट सगळ्यांनाच मराठा म्हंटले आहे. त्यांच्याही पूर्वी महाराष्ट्रातील सर्वांनाच मराठा म्हंटले जायचे. प्राचीन काळी मराठा या शब्दाला मरहट्टा हा शब्द होता. पुढे तो मर्हाटा झाला व त्याचेच रूप म्हणजे मराठा हे होय. मरहट्ट्यांची भाषा ती मरहट्टी. तिचेच आजचे रूप मराठी हे आहे. कोणत्याही भाषेचे नाव ती भाषा कोणते लोक बोलतात यावरून पडते. जसे इंग्रजांची ती इंग्रजी. तसेच मराठ्य़ांची ती मराठी. त्यामूळे जे लोक मराठा हा शब्द टाळतात त्यांचा खरा हेतू वेगळाच आहे. तो म्हणजे मराठा समाजाला डिवचणे. पण खरे म्हणजे मराठा नावाची जातच अस्तित्वात नाही व आपण सगळेच मराठा आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जर ५०-१०० वर्षापुर्वीची कागदपत्रे पाहिली तर तुम्हाला मराठा कुणबी, मराठा परीट, मराठा सुतार, मराठा धनगर अशा नोंदी सापडतील. (पण आज मराठा शब्द जावून तेथे हिंदू हा ’परकीय’ शब्द आला आहे!).
आज ज्यांना मराठा हा शब्द नकोसा झाला आहे, त्यांनी हे विसरू नये की पेशवे देखील स्वत:ला मराठा म्हणवून घेत असत. महाराष्ट्राबाहेरील लोक महाराष्ट्रातील लोकांना मराठाच म्हणतात. त्यामुळे मराठी इतिहास, मराठी लोक हे शब्द वापरणे ताबडतोब बंद केले पाहिजे.
100% AGREED :)
ReplyDeleteखरे तर याला आर्थिक कारण आणि राखीव जागांचे राजकारण आहे.मराठा समाजातील अनेक लोक ओबीसी आरक्षित जागांचे लाभ मिळावे, म्हणून आता `मराठा' हा शब्द जाणीवपूर्वक टाळतात. सध्याच्या पुरोगामी काळात योग्य आर्थिक लाभासाठी असे करण्यात काहीही गैर नाही. शिवाय यामुळे जातीयवाद कमी होईल, हा मोठा फायदा आहे.अनिल गोरे
ReplyDeletetumchyashi me purnapane sahamat aahe. rajkiy poli bhajun ghenyasathi pan kahi lokanchya kya markatlila chalu aahet.
ReplyDelete- ANIl Desale (9764690653)
मी मराठाच
ReplyDeleteapan sarvani tyanchya pekshahi mothya avajat pratek thikani maratha ya shabdhachacha uchar karava , vapr karava je napusak ahet te marathi baki sarv maratha ...
ReplyDeletejai hari !
ReplyDeletefarch chhan lekh ahe ani apale likhanhi sanshodhanatmak asate ....
Atishay Sunadar lekh aahe ..
ReplyDelete