-महावीर सांगलीकर
माझा उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य हा लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर फेसबुकवर अनेक लोकांनी तो लाईक केला, तसेच कांही लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. त्यातील कांही प्रतिक्रिया माझ्या विचारांना अनुकूल होत्या, तर कांही प्रतिकूल. प्रतिकूल प्रतिक्रिया देणारे बहुतेक लोक बामसेफी विचाराचे आहेत.
बामसेफ ही संघटना मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजांच्या कर्मचा-यांची संघटना आहे. या संघटनेचे पूर्ण नाव Backward and Minority Community Employees Federationअसे आहे या संघटनेत सर्व धर्मांचे लोक आहेत. असे असताना ही संघटना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी काम करणारी संघटना असावी याप्रमाणे वागत असते. हिंदू धर्माला सतत टार्गेट करत असते. तसेच मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन या धर्मावर ही संघटना टीका करत नसली तरी या धर्मांना बौद्ध धर्मापुढे दुय्यम ठरवून त्यांना अनुलेखाने मारत असते.
माझ्या उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य या लेखावर फेसबुकवर प्रतिक्रिया देताना बामसेफचे एक विचारवंत विलास खरात यांनी मूळ मुद्दा सोडून जैन धर्मात घुसलेल्या ब्राम्हणांना हाकलून देण्याची, जैन धर्म नि:ब्राम्हण करण्याची जाहीर प्रतिज्ञा केली आहे. माझा लेख दलितांना जैन धर्म हाही एक पर्याय आहे या विषयावर होता, पण त्या मुद्याला खरात यांनी बगल दिली आहे. खरे म्हणजे विलास खरात यांनी अशी प्रतिज्ञा बौद्ध धर्माच्या बाबतीत करायाला पाहिजे, कारण बौद्ध धर्मात ब्राम्हणाची घुसखोरी फार झाली आहे, अगदी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष पदावर देखील एक ब्राम्हण आहे. जैन धर्मात एकतर ब्राम्हण नाहीत आणि जे चुकून-माकून तिथे आले आहेत, त्यांचे काय करायचे ते जैन समाज पाहून घेईल. विलास खरात यांनी त्याची पंचायत करू नये, ते अंगलट येवू शकते.
माझे विलास खरात यांना आवाहन आहे की त्यांनी बामसेफच्या धर्मविषयी धोरणाचे स्पष्टीकरण द्यावे. बामसेफ ही संघटना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आहे काय? हिंदू धर्मातील मागासवर्गीयांचे बौद्ध धर्मांतर घडवून आणणे हा बामसेफचा हेतू आहे काय? घटनेने हिंदू धर्मियांनादेखील धर्मस्वातंत्र्य दिले आहे, मग ही संघटना हिंदू धर्माची टिंगल-टवाळी का करत असते? ज्या हिंदू मागासवर्गीयांना स्वखुशीने धर्मांतर करायचे आहे, त्यांना फक्त बौद्ध धर्म हा एकच पर्याय आहे काय? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, उडीसा या प्रांतात अनेक दलित व आदिवासी जाती-जमातींनी जैन धर्म स्वीकारला आहे व ही संख्या बौद्ध धर्म स्वीकारणा-या दलित व आदीवासींपेक्षा खूपच जास्त आहे. या धर्मांतराविषयी आपले काय म्हणणे आहे. मागासवर्गीय हिंदूंचे, आदिवासींचे मुस्लीम व ख्रिश्चन धर्मात धर्मांतर होते त्याविषयी आपले काय म्हणणे आहे?
विलास खरात यांच्या सकट कांही बामसेफींनी मी आर.एस.एस.चा एजंट असल्याचा माझ्यावर आरोप केला आहे. आर.एस.एस.चे एजंट कोण आहेत हे मी माझ्या आर.एस.एस. आणि बामसेफ: एकाच नाण्याच्या दोन बाजू या लेखात दाखवून दिलेले आहेच. प्रश्न हा आहे की बामसेफ ही संघटना जर घटना (खरोखरीच) मानत असेल, ती जर सेक्युलर संघटना असेल तर ती संघटना बौद्ध धर्माला इतके महत्व का देते?
माझा कांही बौद्ध धर्मावर राग नाही, उलट या धर्माचे राजकीयकरण झाल्याने मला वाईट वाटते. त्यातही बामसेफ सारख्या संघटनेने बौद्ध धर्माचे जे विकृतीकरण चालवले आहे त्याचा मला मनापासून राग येतो. हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की बामसेफने आपले धर्मविषयक धोरण जाहीर करावे.
हेही वाचा:
हिंदू धर्माला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे
गांधीजींची महानता आणि कावळ्यांची काव-काव
vitthal khot khas lihile tumhi amhala facebook var bheta ruturaj deshmukh mhanun famous account aahe majhe
ReplyDeleteविठ्ठल खोत आज देशाचे राष्ट्रपती कोण, सर्वात जास्त प्रधान मंत्री (पंत) ब्राहमण का? सुप्रीम कोर्टात २३ जज्ज ब्राहमण का? फिल्म सिटीत मराठी, हिंदीत सर्व ब्राहमण का? कर्नल पुरोहित मालेगावात बॉम स्पोट का करतो,
ReplyDeleteगवळी व धनगर समाजात ब्राह्माण का चालत नव्हता याचा इतिहास कधी पहिला आहे का? इतिहास पाहून गडे मुर्दे का उखडावे असे सांगू नका कारण इतिहासाने गडे मुर्दे का उखडायचे नसते तर प्रत्येक विध्यापिठात इतिहास विषय शिकविला गेला नसता. तसेच महापुरुषांनी सांगितले आहे कि, जो कोम आपना इतिहास नही जाणती वो आपना भविष्य निर्माण नही कर सकती. तसेच ब्राह्मानाचा या देशावर कसा कब्जा केला आहे. त्यासाठी भारत सरकारचा मंडळ आयोग रिपोर्ट वाचा मग बोला काय ते ... भरपूर आहे परंतु वेळ नाही.
vitthal khot sahi re bhau...aajkaal facebook var hyacha kiti dhingana chalala aahe te paahun veet yeto facebook var join vhya,abhayabhay@gmail.com,abhay patil
ReplyDeleteविठ्ठल खोत उत्तम लेख आपला हिंदु धर्म जगात सगळ्यात उत्तम आहे ब्रिगेडी बामसेफी जाती व्यवस्थेच्या नावाखाली भडकवतात हे सगळ्या जगाला ओरडुन सांगा. Join me on facebook/jayesh.patil.9210256@facebook.com
ReplyDeleteसर,आपणास एकच विनंती आहे की,हिंदू धर्माचा उदय ,कसा,कधी,केव्हा झाला या विषयी स्पष्टीकरण दिले तर खुप बरं होईल?
ReplyDelete