- महावीर सांगलीकर
महाराष्ट्रातील कांही राज कारणी मंडळी जनतेमध्ये परप्रांतीयांविरुद्ध द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत. हे लोक एकाचवेळी मराठीवादी आणि हिंदुत्ववादी असतात. या लोकांचा सर्वात जास्त राग युपी-बिहारवाल्यांवर असतो.
गंमत म्हणजे या लोकांचे सर्व देव युपी-बिहारवाले किंवा परप्रांतीय असतात, मग तो राम असो की कृष्ण. गणपती, शिवशंकर तर हिमालयातले देव. इकडे विठ्ठ्ल हा तर कानडा. मारुती अजून दक्षिणी! बुद्ध-महावीर हे तर अट्टल बिहारी! महाराष्ट्रातील स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे बहुतेक लोक आणि सगळेच वैदिक लोक गोदावरी-कृष्णा या नद्यांपेक्षा गंगा-यमुना या नद्यांना पवित्र मानतात ही गोष्ट त्यांचे मूळ कोठे आहे हे दाखवते.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ज्याअर्थी आपले देव परप्रांतीय आहेत त्याअर्थी आपले पुर्वज हे देखील परप्रांतीय होते. त्यातील बहुतेक सगळे युपी-बिहारवाले होते, तर कांही आंध्र-कर्नाटकवाले होते. त्यामुळे परप्रांतीयांचा द्वेष करणे म्हणजे आपल्याच भाऊबंधांचा द्वेष करणे होय. आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की परप्रांतियांविरुद्ध वातावरण तापवणारे लोक राजकारणी आहेत. त्यांचे मूळ काढायला गेलो तर ते देखील महाराष्ट्रात उपरेच आहेत. परप्रांतियांविरूद्ध वातवरण कलुषित करण्यात त्यांचा राजकीय व वैयक्तिक फायदा आहे. नुकसान फक्त आपलेच आहे.
परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलून द्यायचेच असेल तर सगळ्यात अगोदर परप्रांतीय देवांचे काय करायचे ते ठरवावे लागेल!
आपल्या मते महाराष्ट्राला स्वताचे देव सुद्धा नाहीत? का त्यांचे देव देखील कोणीतरी संपवले...
ReplyDeleteप्रथम , मी स्वःत एक नास्तिक आहे . आणी महाराष्ट्राकङे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे , ज्ञानेश्वर तुकाराम , फुले-आंबेङकर यांसारखे जितेजागते दैवत असताना अशा पुरावा नसलेल्या मुर्तीबाज देवांवर(?) विश्वास ठेवायची गरज ती काय?
ReplyDelete