-महावीर सांगलीकर
माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्या फेसबुकवर टाकल्यावर हा लेख केवळ दोन दिवसात एक हजार पेक्षा जास्त वाचकांनी वाचला. या लेखावर फेसबुक आणि ब्लॉग या दोन्ही ठिकाणी अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. लेखाच्या विरोधात ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यात विचारपूर्वक लिहिलेल्या, मी मांडलेल्या मुद्यांचे सभ्य भाषेत खंडण करणा-या प्रतिक्रिया फारच कमी होत्या. या उलट बहुतेक प्रतिक्रिया या शिवीगाळ करणा-या, धमक्या देणा-या होत्या. अशा प्रतिक्रिया देणारे स्वत:ला डॉक्टर आंबेडकरांचे आणि बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणवून घेतात याची त्यांना नसली तरी मला लाज वाटते.
गंमत म्हणजे वयाने कमी असणारे लोक, म्हणजे पोरे-टोरे खालच्या दर्जाला जावून प्रतिक्रिया देतात, तेंव्हा त्यांना संस्काहीन म्हणून त्यांच्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येते, पण या लेखावरील प्रतिक्रियांच्या बाबतीत सांगायचे तर वयाने आणि शिक्षणाने वाढलेली कांही मंडळी खालच्या दर्जाला गेलेली दिसली. यात एक स्वत:ला उद्योजक म्हणवून घेणारा आणि एक प्रोफेसरही होता. हे लोक फारच दांभिक आहेत असे मला दिसून आले. यांच्या कंपूतील कांही लोक महात्मा गांधी, नेहरू आणि अगदी छ. शिवाजी महाराज यांची निंदा-नालस्ती करत असतात, पण कोणी अगदी सभ्य भाषेत भारतीय घटनेची आणि डॉक्टर आंबेडकर यांची चिकित्सा करायला लागले तर अक्षरश: पिसाळतात. अर्थात त्यांचे पिसाळणे आणि शिवीगाळ करणे या गोष्टी त्यांच्या पराभवाची लक्षणे आहेत. मुद्दे खोडता आले नाहीत तर कांही लोक गुद्यांची भाषा बोलू लागतात.
मागे मी याच ब्लॉगवर या कंपूतील डॉक्टर विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव या पुस्तकाचे परीक्षण लिहिले होते, व ते फेसबुकवर प्रमोटही केले होते. छ. शिवाजी महाराजांविषयी अत्यंत तुच्छता पूर्वक भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा, त्याच्या लेखकाचा किंवा प्रकाशकाचा सध्या माझ्यावर तुटून पडलेल्या या कंपूतील एकाही महाभागाने निषेध केला नाही, किंवा त्याचे खंडन केले नाही. कारण एकच. त्या पुस्तकाचा लेखक व प्रकाशक 'त्यांचा' माणूस आहे.
त्यांना जर डॉक्टर आंबेडकर, बौद्ध धर्म वगैरेची चिकित्सा होणे मान्य नसेल तर त्यांनी अगोदर इतरांची चिकित्सा करणे बंद केले पाहिजे.
माझ्या भारतीय घटनेचे शिल्पकार........... या लेखावर जे प्रमुख आक्षेप आहेत त्यांची उत्तरे मी पुढील लेखात देत आहे.
बाबासाहेबांनी ह्यांना विचार करायला सांगितला होता. हे भक्ती करत सुटलेत. निदान शिवाजी महाराजांवर असे काही लिहिण्याआधी ह्याचा परिणाम काय होईल ह्याचा विचार तरी करायला हवा होता. असे लिहून आणि त्यावर मौन बाळगून काय साध्य झाले? जे लोक ह्यांच्या बाजूने विचार करत असतील त्यांनाही ह्यांच्या विरोधात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
ReplyDeleteसांगलीकरांचा मुद्दा बरोबर आहे. ह्यांचे विचारवंत उठसूट इतरांच्या महापुरुषांवर चिखलफेक करत असतात. तेव्हा ह्यांची दातखीळ का बसते? आता बाबासाहेबांचे उदात्तीकरण कसे होते हे सांगितले तर लगेच ह्यांची जळायला लागली. म्हणजे ह्यांना इतरांच्या तोंडावर शेण मारायला हवे आणि इतरांनी ते शेण ह्यांच्याच अंगणात टाकले तर मात्र हे स्वच्छतेच्या नावाने बोंबलत सुटणार!
rajkaran karanarya lonkachi vrutti hi sarv samanyacchi asatech ase naahi.
ReplyDeletemhanun neharu,gandhi,shivaji maharaj,kinva dr.ambedkar yanna swatala jatit bandhayache navhatech.
aani amacha va umacha ha bhed sudhnya lonkanni karu naye.
shivajinna jase shivsenene palvun nele hote tase bharkatalelya ambedakrwadyanni ambedkaranche karu naye hi vinanti.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आदर बाळगून लिहिलेल्या माझ्या खालील लेखावर त्यांची महात्मा गांधीशी तुलना केली म्हणून अनेकांचे माथे ठणकले होते. अशा ज्या माथेफिरूनी असे पुन्हा लिहू नका म्हणून धमकावले होते त्यात राज्य पातळीवरच्या एका कामगार पुढाऱ्याचा समावेश होता. असे आंधळे अनुयायीच महामानवाचा पराभव करीत असतात.
ReplyDeleteBlog: common non sense
Post: गरज आंबेडकर आणि गांधींचीही
Link: http://myblog-common-nonsense.blogspot.com/2012/07/blog-post_3743.html
महावीरजी चिकित्सा नको असणारे लोक दिवसेंदिवस वाढतच जाताहेत. काही आणखी निरीक्षणं... ’भावना’ फक्त दुर्बलांच्याच असतात का? सबल आणि/किंवा सवर्ण नेहमीच चुकीचे असतात? गाडी आणि सायकलवाल्याच्या टक्करीत नेहमी गाडीवालाच दोषी असतो? गर्दीच्या हमरस्त्यात एखादी गाडी आली की पादचारी त्याच्याकडे चिडून बघतात पण फेरीवाल्याचं रस्त्यावरच अतिक्रमण मात्र, तो गरीब बिच्चारा म्हणून सहन करतात.... माझ्या देवाबद्दल कोणी नाही बोलायचं... दुसर्यांच्या देवावर मात्र मी थुंकणार... इतर कोणालाही जातीवाचक बोलता येत नाही.... पण बामण आणि भटाला मात्र तुच्छतेनं बोलेलं चालतं...गांधी तर एकदम सॉफ्ट टारगेट आहेत... त्यांना अगदी राम मानणार्यांपासून ते बुध्द मानणार्यांपर्यंत कोणीही वाट्टेल ते बोलण्याची मुभा आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे त्या महात्म्याच्या मागे फक्त सरकारी कचर्यांच्या भिंतीच आहेत
ReplyDeleteमहावीरजी.... मला माहीत नाही की तुम्ही कोणता चिकिस्तात्मक लेख बाबासाहेबांनवर लिहला होता? मगच्या लेखाला चिकिस्ता म्हणायचे म्हणजे चिकिस्तेला काय म्हणायचे... बाबासाहेबांनवरची जी काही चिकिस्तेच्या नावावर लिहले होते ते शिळ्या कढीला आलेला उत होता... त्यामुळे स्वतःला चिकिस्ता बहादर म्हणून घेवू नये... लोकांनी शिव्या दिल्या ते वाईटच आहे... पण त्यांनी शिव्यादिल्या म्हणजे तुम्ही बरोबर आणि ते चुक होत नाहीत... वा तुमचा लेख चिकिस्तेच्या कसोटीवर उतरत नाही... कृपया आता तुम्ही शिवाजीं महाराजांचे नाव घेऊन तुम्ही कसे बरोबर आहात हे सांगू नका...
ReplyDeleteतुमचे जवळजवळ सगळेच लेख कोणाला तरी उत्तर म्हणून असतात... किंवा मुलनिवासीवादी वा दलित समाजाने कसे वागावे वा कसे विचार करावे वा आंबेडकरांना नेमके काय म्हणायचे आहे... असे काहीतरी लिहणे म्हणजे... नमके काय चिकित्सा?…
एक गोष्ट इथे नमुद करतो... पददलित समाज आता कुठे तुमच्या डोळ्या डोळ्या घलुन उभे राहायला शिकला आहे... आता कुठे तो आपली बाजु ठणकावुन मांडायला लागला आहे... आणि तुमचा वाट लागली... बाबासाहेबनंतर फक्त 65 वर्षे झाली आहेत... विचार करा आणखी 50 वर्षांनी काय होईल?
प्रस्थापित देवांना शरण जाण्यापेक्षा बाबासाहेबच्या विचारांना मानणे कधीही चांगले... तुम्ही खुशाल म्हणा बाबासाहेबांचा देव झाला... आणि तुम्ही स्वतः करा दगडांची पुजा...
असो.... बाकी तुमचा सिनेमांवर आभ्यास चांगला दिसतो... चालू ठेवा...
बाबासाहेबनंतर फक्त 65 वर्षे झाली...तर खैरलांजी घडले आणि ह्यांची वाट लागली...विचार करा आणखी 50 वर्षांनी काय होईल?
ReplyDeleteSangali kar sir aapale vichar thik aahet......
ReplyDeletePan jara aapan masuda samiti madhil baba saheb yanchya vyarikt ji sadasya hoti aani tyatil kiti lokkanni masuda samiti madhun rajinama dila....kon kan tya weli itar karyant vyast hote...
Hya goshti war jara baghun vachun ghyave......
Saral shabdant jar aaplyal patel tar....
Shetkari pik ugawato shetat gham galun (samza ha zala kachha maal)
mag bajarat magani pramane bhaw var khali honarach (bahutek bajaratil dalal yanchya maji ne)....
Aani sir rajendra prasad ji ani jawahr neharu ji yanche sambandh tar aapanas thaukach asatil....... Waad nako