सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Thursday, February 24, 2011

आपण सारे भ्रष्टाचारी............

-महावीर सांगलीकर

भारतात बोकाळलेल्या प्रचंड भ्रष्टाचारास आपण राजकारणी लोक व सरकारी नोकरास जबाबदार धरतो. पण हे राजकारणी लोक व सरकारी नोकर म्हणजे कोणा शत्रूप्रदेशातून भारतात आलेले लोक नसून ते तुमच्या-आमच्यापैकीच लोक आहेत. ते भ्रष्ट आहेत याला कारण म्हणजे आपण भ्रष्टाचारी आहोत. भ्रष्टाचार आम्हा भारतीयांच्या रक्तात मुरलेली गोष्ट आहे. ते पैसे खातात कारण त्यांना तशी संधी मिळालेली आहे. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तर त्यांनीही ही संधी सोडली नसती.

 ज्या देशात आई आपल्या मुलाला परीक्षेत पास होण्यासाठी मारूतीला नारळ फोड आणि एक रुपया त्याच्या पायाशी ठेवअसे सांगते, जेथे अनेक व्यापारी लोक आपला धंदा बरकतीत यावा यासाठी बालाजीसारख्या देवाशी पार्टनरशीप करतात, जेथे लोक वाह्तुकीचे नियम मोडण्यात धन्यता मानतात आणि पोलिसांनी पकडले तर दंडाची पावती फाडण्याऐवजी तडजोड करतात त्या लोकांची मानसिकताच मुळात भ्रष्ट आहे. या भ्रष्ट लोकांपैकीच कांही लोक ’वरच्या’ पदाला जाऊन राजकारणी व सरकारी नोकर बनतात. त्यामुळे राजकारणी लोक व सरकारी नोकर भ्रष्ट असतात असे म्हणणे म्हणजे भारतीय जनतेत असलेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रकार आहे.

आपण बघतोच की अनेक रिक्षावाले मीटरमध्ये फेरफार करून, लांबच्या रस्त्याने नेऊन प्रवाशाला लुटत असतात. अनेक बस कंडक्टर प्रवाशांचे ’उरलेले’ पैसे बु्डवतात. अनेक विद्यार्थी कॉपी करून पास होतात.देवाला नवस करणे हा देखील लाच देण्याच्याच एक प्रकार आहे. लाचेचा हा प्रकार तर घरोघरी चाललेला असतो. हे सर्व सामान्यजनच असतात ना? की नेत्यांच्या आणि सरकारी नोकरांच्या घरी जन्माला आलेले असतात?

लाच घेणार्‍याएवढाच लाच देणाराही भ्रष्टाचाराला तेवढाच जबाबदार असतो. आपल्या येथे लाच मागण्याआधीच लाच ऑफर करणारे लोक आहेत. लाच घेणार्‍यांची अवस्था देणार्‍याचे हात हजार, भरली माझी झोळी अशीच झालेली असते.

कांही थोडे लोक भ्रष्टाचारापासून दूर असतात, पण अशांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे त्यांना विचारतय कोण?

 अशा या भ्रष्ट समाजात भ्रष्टाचार बोकाळलेला असणे यात विशेष ते काय? जसे लोक, तशी त्यांना व्यवस्था मिळते.

7 comments:

  1. sagla dosh sarkariyantranela kinva nokarshahila devun bhagnar nahin.tar dainandin jivnat aplyapasun nirmulnan jhale pahije.dharma var pasun khali murato tasa bhashtrachar suddha.bhashtrachar lapavnyache kinva kaydhyachi palvat shodhnyache prakar khup hotat!
    'yatha raja thatha praja' hi mhan sadhyaparistit kinva 'yatha praja tatha raja'ya doni baju kharya thartat.samajatlya kahin jantya mansani ekatra yevun samajjagruti karne avashyak aahe ani bhashtra acharala ala ghalne avashyak aahe.

    ReplyDelete
  2. mahiticha kayadyani thodi prashshnamadhe dahashat basavali aahe.ajun mahitichya kaydyacha kayada ani tyachi amalbajavani changli jhali tar corruption barech kami hoil

    ReplyDelete
  3. Mazya mata pramane jyacha Raja brasta tyachi Praja brashta...

    ReplyDelete
  4. Raja bolel n prajene te karayla'ch pahije hi sthiti sadhya nahiye tyamule pratekanech baki kunala dosh det basnyapekshya suruvat hi swata pasun karayla pahije,
    Krn aplya samajat swatachya chuka chakun dusryachya krutyavar bot dakhvnare'ch jast ahet tyamule dusre badaltil hi vayfal apekshya thevnyapekshya apan swata badlnyachi garaj ahe.aplyakde baghun kiman 1 Manus badla tari pushkal ahe n hi sakhali ashich chalat rahili tr ek divas apla desh nakkich bhrashtachar mukt boil.

    ReplyDelete
  5. this speech was very helpful for me.just the one i wanted

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week